AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा पाकिस्तानला मोठा दणका, थेट कोणत्याही क्षणी होऊ शकतो हाहाकार, तब्बल दोन..

पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांपासून सतत तणावात आहेत. त्यामध्येच भारत गेल्या काही दिवसांपासून धक्कादायक पाऊले उचलताना दिसत आहे. भारताने पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले आहे.

भारताचा पाकिस्तानला मोठा दणका, थेट कोणत्याही क्षणी होऊ शकतो हाहाकार, तब्बल दोन..
Indus Water Treaty
| Updated on: May 16, 2026 | 8:43 AM
Share

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावात आहेत. भारतावर अत्यंत मोठा हल्ला पाकिस्तानने केला. पहलगाममध्ये पर्यटकांना टार्गेट करत हल्ला करण्यात आला. त्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कडक भूमिका घेतली. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला एकाकी पाडण्याचे काम भारताकडून केले जात असतानाच भारताने सिंधू पाणी करार निलंबित करण्याचा निर्णय घेतला. त्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला. केंद्र सरकारकडून पाकिस्तानला स्पष्टपणे संकेत देण्यात आला की, भारत सीमापार दहशतवाद आणि जलसुरक्षा मुद्द्यावर कोणताही समझोता करणार नाही. पाकिस्तानचे पाणीच थेट भारताकडून बंद करण्यात आले. याविरोधात पाकिस्तान सतत आंतरराष्ट्रीय पातळीवर वाद घालतोय. मात्र, त्यांना कोणीही प्रतिसाद देत नाही.

भारत सरकार नद्यांवरील जल व्यवस्थापन आणि जलविद्युत पायाभूत सुविधांवर बळकट करण्याचे काम करत आहे. याचा उद्देश भारताच्या वाट्याला येणाऱ्या पाण्याचा वापर सुनिश्चित करणे आणि भविष्यातील गरजांसाठी जलसाठा क्षमता वाढवणे हा आहे. पाकिस्तानमध्ये जाणारे पाणी पूर्णपणे रोखण्याची भारताची योजना आहे. त्याकरिता मोठे धरणही बांधले जात आहे.

हे पाणी पाकिस्तानमध्ये जाण्यापासून रोखायचे आणि त्याचा मार्ग बदलून राजस्थानकडे वळवण्याचा सरकारचा प्लॅन आहे. हा अत्यंत मोठा प्रकल्प आहे. याला पाकिस्तानचा विरोध आहे. भारताने सिंधू पाणी करार निलंबित केल्याने पाकिस्तानमध्ये पाण्याची मोठी समस्या आहे. काही भागात उपासमारीची वेळ आलीये. पाकिस्तान भारतावर आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव टाकण्याचे काम करत आहे. यासोबतच दोन नवीन बोगदे बांधण्याचे काम भारत करत असून, त्यामुळे पाकिस्तानसाठी महापुराचा धोका निर्माण झाला आहे.

हेच नाही तर सलाल धरणातील मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचे काम सध्या सुरू आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनएचपीसी गाळ काढण्याच्या कामाला सुरूवात झाली. ही मोहीम पुढील तीन ते चार वर्षे सुरू राहण्याची शक्यता आहे. भारत पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला एका मागून एक मोठे धक्के देताना दिसत आहे. त्यामध्येच आता पाकिस्तानचे पाणीही बंद करण्याची भारताची पूर्ण योजना असल्याचेही स्पष्ट होत आहे. पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून मोठ्या अडचणीचा सामना करत आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप