भारतीयांनो आजच्या आज कीव सोडा, भारतीय दूतावासाकडून अलर्ट! परिस्थिती आणखी चिघळणार?

युक्रेनमधून आत्तापर्यंत अनेक विद्यार्थी परत विमानाने आल्याचे आपण पाहतोय. कारण रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाला आता 5 दिवस झाल्यामुळे तिथली परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता असल्याने तिथं वास्तव करीत असलेल्या अनेक लोकांनी देश सोडला आहे.

भारतीयांनो आजच्या आज कीव सोडा, भारतीय दूतावासाकडून अलर्ट! परिस्थिती आणखी चिघळणार?
युक्रेनहून भारतात परतत असताना विद्यार्थी Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 1:25 PM

रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात सध्याची परिस्थिता युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्यामुळे युक्रेनमध्ये वास्तव करीत असलेल्या भारतीयांना तात्काळ युक्रेन सोडण्याचा सल्ला युक्रेनचे भारतीय दुतावासाने दिले आहे. त्यामुळे तिथली परिस्थिती अधिक बिकट होईल असं वाटतंय. कारण आत्तापर्यंत रशियाने युक्रेनवरती आक्रमण केल्यापासून युक्रेनच्या अनेक भागात बॉम्ब हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे कीव (kiev) राजधानीतील परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे अनेकांचे तिथले नागरिक व्हिडीओच्या माध्यमातून सांगत आहेत. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी आणि नोकरीनिमित्त असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत युक्रेन सोडलं असून ते भारतात परतले आहेत. तर अजून काहीजण तिथं अडकले असल्याची माहिती मिळत आहे. भारतासह अनेक देशांचे नागरिक तिथं राहत असून अनेकांनी आत्तापर्यंत देश सोडलाय तर अनेकजण देश सोडण्यासाठी मार्ग शोधत आहेत.

18,000 हून अधिक भारतीय युक्रेनमध्ये वास्तव्यास होते

युक्रेनमधून आत्तापर्यंत अनेक विद्यार्थी परत विमानाने आल्याचे आपण पाहतोय. कारण रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाला आता 5 दिवस झाल्यामुळे तिथली परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता असल्याने तिथं वास्तव करीत असलेल्या अनेक लोकांनी देश सोडला आहे. युक्रेनच्या अनेक भागात रशियाने आक्रमण केल्याने तिथली परिस्थिती भयान असल्याची व्हिडीओच्या माध्यमातून समजते आहे. युक्रेनमध्ये 18,000 लोक वास्तव करीत असल्याची माहिती टाईम्सने दिली आहे. त्यानुसार आत्तापर्यंत भारतात परलेल्या लोकांची यादी अत्यंत कमी आहे. युक्रेनच्या शेजारी असलेल्या देशात विद्यार्थ्यांना किंवा नोकदारांना बोलावलं जात आहे आणि त्यानंतर तिथून त्यांना भारतात आणण्याच काम भारत सरकार करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. युक्रेनमध्ये सध्या असलेल्या प्रत्येक नागरिकाला आम्ही परत आणण्याचा प्रयत्न करू असं भारत सरकारने जाहीर केलं आहे. त्यामुळे तिथ किती विद्यार्थी आणि नोकर अडकले आहेत हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.

1568 जण युक्रेनमधून आत्तापर्यंत परतले

रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून तिथं शिक्षणासाठी असलेल्या अनेक भारतीयांनी युक्रेन सोडलं असून ते तिथल्या शेजारच्या देशात जाऊन भारतात परतले आहेत. कोणत्या जिल्ह्यातील किती लोक युक्रेनमध्ये अडकले असल्याची माहिती प्रशासनाने जमा केली आहे त्यानुसार त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत असल्याचे समजते. 18 हजार लोकांपैकी आत्तापर्यंत 1568 लोकांना भारतात आणण्यातं सरकारला यश मिळालं आहे. आजचा युद्धाचा 5 वा दिवस असून त्यांनी आत्तापर्यंत रशियाने युक्रेनच्या महत्त्वाच्या स्थळांवरती बॉम्ब हल्ला केला असल्याने तिथली परिस्थिती चिघळली असल्याचं समजतंय. आज सकाळी 182 विद्यार्थी विमानाने परतले आहेत. तसेच कीव शहर सोडण्याचं फर्मान निघाल्याने तिथली परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Russia Ukraine War Live : भारतीयांना तात्काळ युक्रेन सोडण्याचं फर्मान, रशिया युक्रेनमधील युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता

Video : गाड्यांच्या हालचालीत रस्त्याच्या मधोमध खारकीवमध्ये मिसाईल हल्ला! थरकाप उडवणारी दृश्यं CCTV कॅमेऱ्यात कैद

तर उद्धव ठाकरेंना शंभर टक्के पाठिंबा देऊ; आशिष शेलार यांच्याकडून मलिकांच्या हकालपट्टीची मागणी

Non Stop LIVE Update
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?.
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.