जगातील पहिलं असं गाव जिथे फक्त महिलांचं राज्य, पुरुषांना पाय ठेवण्यासही मनाई

| Updated on: Feb 06, 2021 | 10:30 AM

या गावात फक्त महिला राहातात. या गावात पुरुषांना पाय ठेवण्यासंही मनाई आहे.

जगातील पहिलं असं गाव जिथे फक्त महिलांचं राज्य, पुरुषांना पाय ठेवण्यासही मनाई
Umoja Women’s Village In Kenya
Follow us on

All Women Umoja Village | जगभरात महिला आणि पुरुष हे समान आहेत, अशी कितीही बतावणी केली (Umoja Women’s Village In Kenya) जात असली तरी कुठे ना कुठे महिलांना आजही समान हक्कांसाठी आजही संघर्ष करत आहेत. तर पुरुषवादी समाज स्वत:ला स्वतंत्र करण्याच्या प्रयत्नात आहेत. काही देशांमध्ये महिलांना समानतेचा हक्क मिळाला आहे, तर काही देशांमध्ये परिस्थिती अद्यापही जैसे थेच आहे. पण महिला आता आपल्या आयुष्याला महत्त्व द्यायला शिकल्या आहेत. याचंच जिवंत उदाहरण म्हणजे आफ्रिकी देश केनिया (Umoja Women’s Village In Kenya) मधील एक गांव.

उमोजा (Umoja village) नावाचं हे गाव उत्तरी केनियाच्या समबुरुमध्ये (Umoja village Samburu county Kenya) आहे. स्वाहिलीमध्ये उमोजाचा अर्थ एकता होतो. या गावात फक्त महिला राहातात. या गावात पुरुषांना पाय ठेवण्यासंही मनाई आहे. गावाला सुरक्षित ठेवण्यासाठी या चारी बाजुंनी काटेरी कुंपण लावण्यात आले आहेत. या गावात सुरुवातीला फक्त 15 महिला होत्या. ज्यांच्यावर 1990 मध्ये ब्रिटिश सैनिकांनी बलात्कार आणि लैंगिक शोषण केलं होतं. पण आज हेच गाव पीडित महिलांसाठी एक सुरक्षित छत्र बनलं आहे. जिथे त्या आनंदाने आपलं जीवन जगतात आणि विना रोक-टोक जीवनाचा आनंद घेतात.

Umoja Women’s Village In Kenya

समबुरू समुदायावर पितृसत्तेचं वर्चस्व

या गावात त्या महिला राहतात ज्या खतना, लैंगिक शोषण आणि बलात्कार, हिंसा किंवा बाल विवाह झाला असेल. समबुरु समुदायबाबत बोलायचं झालं तर इथले लोक बहुविवाहमध्ये विश्वास ठेवतात. या समुदायावर पितृसत्तेचं वर्चस्व आहे. सध्या या गावात जवळपास 50 महिला राहतात. यांच्यासोबत त्यांची मुलंही राहतात. या मुलांची संख्या 200 च्या जवळपास आहे.

कोणावरही निर्भर न राहता या महिला स्वत: आपली उपजीविका भागवतात. यामध्ये त्यांचे मुलंही त्यांना मदत करतात. त्यामुळे यांची रोजची गरज भागते. यामध्ये जर कोणी मुलगा असेल तर त्याला 18 वर्षांचं होताच गाव सोडावं लागतं. आता हे गाव इतकं प्रसिद्ध झालं आहे की या गावाला बघायला जगभरातील पर्यटक येतात (Umoja Women’s Village In Kenya).

दागिने बनवून विकतात

कमाई करण्यासाठी या महिला मोतींचे दागिने बनवून विकतात. यामध्ये नेकलेस, बांगड्या, पैंजण यांचा समावेश आहे. तसेच मोठ्या महिला तरुणींना खतना, जबरदस्ती गर्भपात करणे काय असतं याबाबत माहिती देतात. या महिलांनी गावातच एक शाळाही उघडली आहे.

आपल्यासाठी एक वेगळ गाव बनवणे आणि पुरुषांपासून स्वत:ला दूर ठेवण्याला अर्थ हा नाही की उमोजाच्या महिला समाजापासून वेगळ्या झाल्या आहेत. या महिला बनवलेले सामान विकण्यासाठी शेजारील गावात जातात. या गावाचं जगभरात उदाहरण दिलं जातं.

Umoja Women’s Village In Kenya

संबंधित बातम्या :

Special Story | जगाला हादरवणारा अणू बॉम्ब 7200 फुटांवरुन कोसळला आणि गायब झाला, 63 वर्षांनंतर अद्यापही रहस्य गुलदस्त्यात

पाकिस्तानमध्ये महागाईचा कहर, शहरांनंतर आता गावही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

‘या’ देशात ना लॉकडाऊन, ना सोशल डिस्टन्सिंग, कोरोनाचे सर्व नियमही रद्द, लोकांकडून जल्लोष