Russia vs America : फक्त टेक्निक, रशियन पायलट्सनी असं पाडलं अमेरिकेच शक्तीशाली ड्रोन, VIDEO

दीनानाथ मधुकर परब, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 17, 2023 | 7:54 AM

Russia vs America : अमेरिका सर्वात जास्त जाहीरात करते, त्याच शक्तीशाली MQ 9 रिपर ड्रोनला जलसमाधी देऊन रशियाने अमेरिकेच्या प्रतिष्ठेवर घाव घातलाय. अमेरिकेला त्याशिवाय ड्रोनच्या ढिगाऱ्याच सुद्धा टेन्शन आहे.

Russia vs America : फक्त टेक्निक, रशियन पायलट्सनी असं पाडलं अमेरिकेच शक्तीशाली ड्रोन, VIDEO
America vs Russia
Image Credit source: Screengrab

Russia vs America : सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार लढाई सुरु आहे. या युद्धा दरम्यान एक वेगळीच घटना घडली आहे. ज्यामुळे एकतर अमेरिका थेट युद्धा उतरेल किंवा युक्रेनला अजून घातक शस्त्रास्त्रांचा पुरवठा करेल. दोन दिवसांपूर्वी रशियन एअर फोर्सने ब्लॅक सी म्हणजे काळ्या समुद्रात अमेरिकेच शक्तीशाली MQ 9 रिपर ड्रोन पाडलं. ही एक मोठी घटना आहे. कारण दोन्ही देश आतापर्यंत परस्परांना धमकी देण्याची भाषा करत होते. पण रशियाने त्यापुढे जात थेट पहिला वार केलाय.

अमेरिका पडद्याआडून युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करतेय, त्यामुळे हे युद्ध लांबत चालतय. तोच राग रशियाच्या मनात आहे. ब्लॅक सी आपल्या प्रभावक्षेत्राखाली येतो, असा रशियाचा दावा आहे.

ड्रोन घटनेच फुटेज जारी

अमेरिकी ड्रोन आमच्या सागरी हद्दीत आल्याने आम्ही कारवाई केली, असं रशियाच म्हणणं आहे. त्याचवेळी अमेरिकेने आपलं ड्रोन आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत असल्याचा दावा केला आहे. दोन्ही बाजूकडून दावे-प्रतिदावे सुरु असताना अमेरिकन लष्कराने ड्रोन घटनेच फुटेज जारी केलय. रशियाच्या SU-27 फायटर जेटने मागच्या बाजूने धडक दिल्यामुळे अमेरिकेच रिपर ड्रोन समुद्रात कोसळलं.

‘हा चिथावणीचा प्रयत्न होता’

अमेरिकन एअर फोर्सच हे मानवरहीत ड्रोन होतं, असं अमेरिकन लष्कराने म्हटलं आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाने या घटनेबद्दल वेगळं मत मांडलय. ‘हा चिथावणीचा प्रयत्न होता’ असं अमेरिकेतील रशियन राजदूताने म्हटलय.

अमेरिकन एअर फोर्सचे जनरल काय म्हणाले?

रशियाच्या दोन SU-27 फायटर जेट्सनी अनप्रोफेशनल आणि असुरक्षित पद्धतीने इंटरसेप्ट करुन आमच MQ-9 ड्रोन पाडलं असं अमेरिकन लष्कराने म्हटलं आहे. MQ-9 ड्रोनने आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीत नियमित ऑपेरशनसाठी उड्डाण केलं होतं. त्याचवेळी रशियन फायटर विमान येऊन धडकली असं अमेरिकन एअर फोर्सचे जनरल जेम्स हेकर यांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI