AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! युद्ध पुन्हा पेटलं, अमेरिकेचा इराणवर सर्वात मोठा हल्ला, जगभरात मोठी खळबळ

मध्य पूर्वेतून मोठी बातमी समोर आली आहे, पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात झाली आहे, अमेरिकेनं इराणवर भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे इराणने देखील जॉर्डन आणि कुवेतवर हल्ला केला आहे.

मोठी बातमी! युद्ध पुन्हा पेटलं, अमेरिकेचा इराणवर सर्वात मोठा हल्ला, जगभरात मोठी खळबळ
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 09, 2026 | 7:25 PM
Share

अमेरिकेनं पुन्हा एकदा इराणवर भीषण हल्ला केला आहे. यावेळी इराणच्या पोर्ट सिटी बंदर अब्बासला निशाणा बनवण्यात आलं आहे. अब्बास बंदरामध्ये अनेक स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. इराणी सैन्याच्या पायाभूत सुविधांना अमेरिकेकडून लक्ष्य करण्यात आलं आहे. दरम्यान अमेरिकेकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून इराणने आता अमेरिकेचे सहकारी असलेले देश जॉर्डन, बहरीन आणि कुवेत या देशांवर एअर स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यांमध्ये इराणचं पुन्हा एकदा प्रचंड नुकसान झालं आहे, त्यामुळे आता हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.

इराणच्या मेहर न्यूज एजेन्सीने दिलेल्या माहितीनुसार होर्मुज स्ट्रेटवर असलेल्या इराणी पोर्ट सिटी बंदर अब्बासवर हल्ला करण्यात आला आहे. हल्ला झाल्यानंतर घटनास्थळावरून प्रचंड आगीचे लोट उठल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. बंदर अब्बास इराणच्या होर्मोज्गान प्रांताची राजधानी आणि फारसच्या खाडीदरम्यान स्थित आहे. बंदर अब्बास हे इराणच्या आर्थिक, सैन्य तसेच व्यापारी दृष्टीकोणातून महत्त्वाचं ठिकाण आहे. नेमकं याच बंदाराला अमेरिकेकडून आता लक्ष्य करण्यात आलं आहे. या हल्ल्यामध्ये इराणच्या 14 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

इराणकडून प्रति हल्ला

दरम्यान दुसरीकडे अमेरिकेनं अब्बास बंदरावर हल्ला केल्यानंतर आता इराणने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे, इराणने अमेरिकेचे सहकारी असलेल्या बहरीन, जॉर्डन आणि कुवेत या देशांवर एअर स्ट्राईक केला आहे. या देशांमध्ये अमेरिकन सैन्यांचे तळं आहेत. इराणकडून सुरू झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर जॉर्डनमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, सायरन वाजवण्यात आला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा झाली होती, परंतु आता पुन्हा एकदा युद्ध भडकण्याची चिन्ह आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम व्हावा यासाठी पाकिस्तानकडून मध्यस्थी करण्यात आली होती, परंतु आता पुन्हा एकदा युद्ध पेटलं आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ल्याला सुरुवात झाली  आहे. यामुळे पुन्हा एकदा मध्यपूर्वेत तणाव निर्माण झाला आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ