AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होर्मुजच्या खाडीत भयानक घडलं, शांतता चर्चेसाठी पायघड्या घालणाऱ्या पाकलाच अमेरिकेचा मोठा दणका, 2 जहाजं

इराणने २० पाकिस्तानी जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. मंगळवारी, जेव्हा दोन पाकिस्तानी जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ पोहोचली, तेव्हा अमेरिकेने त्यांना परत फिरण्याचा आदेश दिला.

होर्मुजच्या खाडीत भयानक घडलं, शांतता चर्चेसाठी पायघड्या घालणाऱ्या पाकलाच अमेरिकेचा मोठा दणका, 2 जहाजं
पाकला मोठा दणका (Photo- Dept Of War)
| Updated on: Apr 15, 2026 | 1:41 PM
Share

इराण-अमेरिकेत 40 दिवसांच्या संघर्षानंतर सध्या 2 आठवड्यांचा युद्धविराम असून, दोन्ही देशांमध्ये या आठवड्याअखेरीस पुन्हा चर्चा होणार आहे. गेल्या आठवड्यात इस्लामाबादमध्ये अमेरिका-इराणमध्ये झालेली चर्चा फिस्कटल्यानंतर राष्ट्र्ध्यक्ष ट्रम्पनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी होर्मुजच्या सामुद्रधुनीची लगेच नाकेबंदी केली, ज्यामुळे अनेक देशांची वाहतूक रोखली गेली आणि त्यांना फटका बसला. मात्र याबाबत आता आणखी एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. इराण-अमेरिका युद्धविरामात आणि शांतता चर्चेसाठी ज्यांनी महत्वाची भूमिका निभावली, त्या पाकिस्तानलाच आता अमेरिकेने मोठा झटका दिला आहे.

अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दोन पाकिस्तानी जहाजांना परत पाठवले आहे. हा पाकिस्तानसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. कारण पाकिस्तानने, इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार घडवून आणण्यात सक्रियपणे सहभाग नोंदवला होता. चीनसह अनेक देशांची 20 जहाजे कोणत्याही भीतीशिवाय होर्मुझच्या सामुद्रधुनीतून गेली असताना, अमेरिकेने दोन पाकिस्तानी जहाजे परत पाठवली. मात्र पाकिस्तानी सरकारने यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

पाकिस्तानची जहाज पाठवली माघारी

अल अरबियाच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी ध्वज लावलेल्या दोन जहाजांनी मंगळवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, परंतु अमेरिकी सैन्याने त्यांना परत पाठवलं. एकीकडे चीन आणि इतर देशांची जहाजे त्याच मार्गावरून प्रवास करत होती. मात्र त्याचवेली पाकिस्तानच्या जहाजांना मात्र पुढे जाता आलं नाही.

पाकिस्तानच्या जहाजांना मिळाले पास

खरंतर इराणने पाकिस्तानला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या वाहतुकीसाठी 20 पास मार्ग दिले आहेत. या मार्गांमधून पाकिस्तानी जहाजे सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे आश्वासन इराणने दिलं होतं. पाकिस्तानने यापैकी चार मार्गांचा वापर आधीच केला आहे, पण आता अमेरिकेने पाकला मोठा धक्का दिला आहे.

पाकिस्तानच्या जहाज वाहतूक विभागातील एका अधिकाऱ्याने अल अरबियाला दिलेल्या माहितीनुसार, “इराणने मार्ग रोखला होता तेव्हाही आम्हाला फारशी चिंता वाटली नव्हती. माच्र आता अमेरिकेने आमची जहाजे परत पाठवली आहेत.”

‘इतर देशांप्रमाणेच पाकिस्तानही अडचणींचा सामना करत आहे. आम्ही सातत्याने संवाद साधत असून समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत’, असं पाकिस्तानचे नौकानयन मंत्री जुनैद अन्वर चौधरी म्हणाले .

होर्मुजमधून बेधडक निघाली 20 जहाजं

गेल्या आठवड्यात इराणशी बोलणी फिस्कटल्यानंतर अमेरिकेने होर्मुझच्या बाहेर नाकेबंदी जाहीर केली. त्याचाच एक भाग म्हणून, अमेरिकेने ओमानच्या आखातात आणि अरबी समुद्रात10 हजारांचं सैन्य तैनात केलंय. असं असूनही, नाकेबंदीच्या पहिल्याच दिवशी 20 जहाजे कोणत्याही भीतीशिवाय या मार्गावरून गेली. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, अमेरिकन सैन्याने केवळ सहा जहाजं अडवली. विशेष म्हणजे, यापैकी दोन जहाजे पाकिस्तानची होती अशी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानसाठीही हा एक मोठा धक्का मानला जात आहे, कारण अवघ्या दोन दिवसांनी इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करारावर पुन्हा चर्चा होणार आहे.

अमेरिकेच्या या कृतीनंतर, जहाजं अडवली गेल्यानंतर आता पाकची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल.

Follow Us
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?
आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; रोहित पवारांचा एल्गार
Rohit Pawar : आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर रोहित पवारांचा एल्गार
बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूर....
Yashomati Thakur : बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूरांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाल्या...