
MQM-172 Arrowhead: ग्रिफॉन एअरोस्पेस कंपनीने नवीन ड्रोन MQM-172 Arrowhead सादर केले आहे. ही अमेरिकन कंपनी आहे. MQM-172 Arrowhead या ड्रोनचा वापर हा प्रशिक्षण आणि हल्ला या दोन्हींसाठी केला जाऊ शकतो. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊयात. अमेरिकेतील अलाबामा स्थित ड्रोन निर्माता कंपनी ग्रिफॉन एरोस्पेसने MQM-172 Arrowhead नावाची नवीन मानवरहित विमान सिस्टिम सादर केली आहे. हे एक ड्रोन आहे जे प्रशिक्षणासाठी आणि हल्ल्यासाठी उच्च-कार्यक्षमता लक्ष्य म्हणून वापरले जाऊ शकते.
MQM-172 Arrowhead हा ड्रोन इराणच्या ‘शाहेद’ ड्रोनसारखा दिसतो. लष्करी सरावादरम्यान प्रशिक्षणासाठीही याचा वापर केला जाऊ शकतो. याचा वापर आत्मघातकी ड्रोन म्हणूनही केला जाऊ शकतो, जो एकदा वापरल्यानंतर नष्ट केला जातो. ही दुहेरी क्षमता मानवरहित हवाई वाहनांच्या (UAV) वाढत्या गरजेचा पुरावा आहे जे प्रशिक्षण आणि ऑपरेशनल मोहिमा पार पाडू शकतात, असे कंपनीने म्हटले आहे.
MQM-172 Arrowhead मध्ये मॉड्युलर पेलोड बे आहे, ज्यामध्ये 100 पौंडपर्यंत वजन ठेवता येते. मोहिमेच्या गरजेनुसार ड्रोनमध्ये वेगवेगळे सेन्सर किंवा वॉरहेड (स्फोटके) बसवता येतात. ग्रिफॉन एअरोस्पेसने दिलेल्या माहितीनुसार, एरोहेडचे डिझाइन खूप मजबूत आहे. डॅनियल बेक यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने एरोहेडपूर्णपणे इन-हाऊस (म्हणजे स्वतःच्या कारखान्यात) डिझाइन, चाचणी आणि उत्पादन केले आहे. कंपनीला 12 हजारांहून अधिक विमानांच्या निर्मितीचा अनुभव आहे.
MQM-172 Arrowhead या ड्रोनला मागणी का आहे?
अमेरिकेच्या संरक्षण कंपन्या युद्ध आणि प्रशिक्षण या दोन्हींसाठी स्वस्त, चांगल्या आणि टिकाऊ ड्रोनवर लक्ष केंद्रित करत असताना एरोहेडचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. लष्कराच्या गरजा भागवण्यासाठी हे ड्रोन डिझाइन करण्यात आले असून वेगवेगळ्या परिस्थितीत त्याचा वापर केला जाऊ शकतो, असे कंपनीचे म्हणणे आहे.
एरोहेड ड्रोनचा वापर प्रशिक्षण प्रणाली म्हणून वारंवार केला जाऊ शकतो. याचा वापर हल्ल्यासाठीही केला जाऊ शकतो. कंपनीला या दुहेरी क्षमतेचा फायदा होऊ शकतो आणि ड्रोन मार्केटमध्ये कंपनीचे स्थान मजबूत होईल. मानवरहित विमान असल्याने देशी-विदेशी खरेदीदारांना आकर्षित करू शकते. आधुनिक युद्धात ड्रोन किती आवश्यक बनले आहेत, हे युक्रेन युद्धाने सिद्ध केले आहे. युरोप, आशिया आणि मध्यपूर्वेसारखे जगभरातील देश आपली हवाई क्षमता वाढवण्यासाठी मानवरहित विमानांमध्ये गुंतवणूक करत आहेत. अशा ड्रोनचा वापर वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी केला जाऊ शकतो आणि युद्धात हल्ले करण्यासाठीही त्याचा वापर केला जाऊ शकतो.