AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रम्प यांना जगात कुणीच इतकं सुनावलं नव्हतं, त्यांच्याच भारतीय वंशाच्या खासदाराने एवढं…

Donald Trump On India : भारताला नरकाचा दरवाजा म्हणणारं एक पत्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपोस्ट केल्याने प्रचंड खळबळ उडाली. त्यांच्या या विधानावरून गदारोळ उडाला असून चहुबाजूंनी त्यांच्यावर टीका होत आहे.. त्यातच आता ट्रम्पना घरचा आहेर मिळाला आहे.

ट्रम्प यांना जगात कुणीच इतकं सुनावलं नव्हतं, त्यांच्याच भारतीय वंशाच्या खासदाराने एवढं…
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरल्यानंतरी चहूकडून टीकाImage Credit source: Getty Images
| Updated on: Apr 24, 2026 | 9:37 AM
Share

जगातील बलाढ्य देशांपैकी एक असलेल्या अमेरिकेसारख्या देशाचे राष्ट्राध्यक्ष असूनही डोनाल्ड ट्रम्प कसे वागतील, कुठे काय बोलतील याचा काही नेम नाही. त्यांची विचिर, विविध वक्त्वय ही जगासाठी डोकेदुखी ठरू शकतात. त्यातच त्यांनी नुकतंच भारतासह इतर काही देशांना नरक म्हणमारी पोस्ट शेअर केली आणि त्यामुळे नवा गदारोळ निर्माण झाला. जगभरातूनच नव्हे तर खुद्द त्यांच्या देशातूनही ट्रम्प यांचा टीकेचा , आलोचनेचा सामना करावा लागत आहे. भारताने तर त्यांच्या विधानाचा निषेध करत त्यांना खडेबोल सुनावलेच, पण आता त्यांच्या देशातील खासदारानेही ट्रम्प यांना चांगलंच फटकारलं आहे.

भारतीय-अमेरिकन काँग्रेस सदस्य अमी बेरा यांनी, ट्रम्प यांच्या या पोस्टवर,या विधानावर दुःख व्यक्त केलं असून, मला आपल्या वारशाचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. ‘ श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या ट्रम्प यांना कोणत्याही गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला नाही’ असं म्हणत त्यांनी ट्रम्प यांना घरचा आहेर दिला आहे. अतिशय वादग्रस्त विधानानंतर चहुकडून टीकेची झो़ड उठल्यानंतर ट्रम्प यांनी आपल्याला उपरती झाल्याचा आव आणला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत भारताला एक महान देश म्हटलं आहे.

बेरा यांनी सुनावलं

ट्रम्प यांच्या विधानानंतर अमी बेरा यांनी प्रतिक्रिया देत आपल्या वारशाचा अभिमान असल्याचं सांगत, ट्रम्पवर टीकास्त्र सोडलं. “भारतातून आलेल्या स्थलांतरितांचा मुलगा म्हणून, मला माझ्या वारशाचा आणि ज्या देशाने माझ्या कुटुंबाला एक चांगले जीवन घडवण्याची संधी दिली, त्या देशाचा मनापासून अभिमान आहे. माझे आई-वडीलही तीच संधी मिळवण्यासाठी कायदेशीररित्या अमेरिकेत आले होते. माझ्या आईने 35 वर्षे सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून काम केलं. माझे वडील इंजिनीअर होते. कठोर परिश्रम करणे, समाजाची सेवा करणे आणि ज्या देशाने आपले स्वागत केले त्याचे ऋण फेडणे महत्त्वाचे आहे, या दृढ विश्वासाने त्यांनी मला आणि माझ्या भावांना वाढवले,” असे अमेरिकेतील भारतीय-अमेरिकन काँग्रेस सदस्य बेरा म्हणाले.

यावेळी त्यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली. “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेली वक्तव्यं ही आक्षेपार्ह, अज्ञानी आणि त्यांच्या पदाला न शोभणारी आहेत. (त्यांच्या या विझधानातून) एक राष्ट्र म्हणून आपण कोण आहोत, याबद्दलच्या त्यांच्या समजेचा पूर्ण अभाव दिसून येतो. या (अमेरिका) देशात येऊन, कठोर परिश्रम करून आणि आपल्या देशासाठी योगदान देणाऱ्या स्थलांतरितांच्या पिढ्यांमुळे अमेरिका नेहमीच मजबूत झाली आहे. ते अमेरिकेला कमकुवत करत नाहीत; उलट ते तिला अधिक मजबूत बनवतात” असं बेरा म्हणाले.

कडाडून टीका

” सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या (श्रीमंती आणि सुखसोयींमध्ये जन्मलेल्या) राष्ट्राध्यक् डोनाल्ड ट्रम्प यांना अनेक स्थलांतरित कुटुंबांप्रमाणे संघर्ष करावा लागला नाही. शून्यातून आयुष्य घडवण्यासाठी जे धैर्य लागतं, जो त्याग आणि दृढनिश्चय करावा लागतो, तो त्यांना समजत नाही. त्यांना समाजसेवा समजत नाही आणि अमेरिकेला जगातील सर्वात महान देश बनवणारी मूल्येही त्यांना समजत नाहीत,” असं म्हणत बेरा यांनी ट्रम्पना घरचा आहेर दिला.

काय आहे प्रकरण ?

डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच रेडियो होस्ट माइकल सॅवेजचं एक पत्र रिपोस्ट केलं होतं, ज्यामध्ये त्यांनी भारत, चीन आणि अन्य देशांना ‘नरकाचा दरवाजा’ संबोधलं. आशियातील काही देशातील लोक अमेरिकेत येतात आणि 9 महिन्यात बाळाला जन्म देतात. त्यामुळे अवघ्या 9 महिन्यात ते बाळ अमेरिकन नागरिक होतं, ही पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपोस्ट केली होती. त्या पत्रात भारतीय आणि चिनी स्थलांतरितांसाठी अपमानजनक शब्दांचाही वापर करण्यात आला होता, ज्यामुळे वाद अधिकच वाढला. मात्र यामुळे प्रचंड गदारोळ निर्माण झाला असून खळबळ माजली आहे. ट्रम्प यांच्या विधानाचा चहूकडून निषेध होत आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसताच ट्रम्प यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले