AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढे भारत झुकणार? परत ठेवणार विश्वास? अमेरिकेच्या अर्थशास्त्रांनी..

अमेरिकेच्या अर्थशास्त्रांनी मोठा खुलासा केलाय. यासोबतच त्यांनी काही धक्कादायक खुलासे देखील केली आहेत. अर्थशास्त्री जेफरी सॅक्स हे या टॅरिफच्या वादावर बोलताना दिसले. त्यांनी भारताला अत्यंत मोठा सल्ला दिला आहे. पडद्यामागील घडामोडींना वेग आलाय.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढे भारत झुकणार? परत ठेवणार विश्वास? अमेरिकेच्या अर्थशास्त्रांनी..
donald trump and pm modi
| Updated on: Aug 14, 2025 | 1:26 PM
Share

भारत आणि अमेरिकेमध्ये टॅरिफवरून वाद सुरू असतानाच आता अमेरिकेच्या अर्थशास्त्रांनी मोठा खुलासा केलाय. यासोबतच त्यांनी काही धक्कादायक खुलासे देखील केली आहेत. अर्थशास्त्री जेफरी सॅक्स यांनी म्हटले की, भारताने आता अमेरिकेवर जास्त अवलंबून राहू नये. आता हीच योग्य वेळ आहे, भारताने ब्रिक्ससोबत जोडले पाहिजे. कारण आता सध्याच्या आणि पुढच्या परिस्थितीमध्ये अमेरिका ही भारताकडून अगोदरसारखे एक्सपोर्ट करणार नाही, हे अगदी स्पष्ट आहे. जेफरी सॅक्स यांनी एकप्रकारे भारताला मोठा सल्ला दिलाय.

अमेरिका भविष्यात भारतापेक्षा चीनकडून गोष्टी जास्त प्रमाणात एक्सपोर्ट करेल. भारतीय रशियन तेल आयातीवर 50 टक्के कर लादण्याबाबत सॅक्स म्हणाले की, ट्रम्प हे फार तर्कसंगत व्यक्ती नाहीत किंवा फार धोरणात्मक व्यक्ती नाहीत. मुळात म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना वाटले होते की, भारत लगेचच त्यांच्या मागण्या मान्य करेल आणि सर्व अटी देखील. डोनाल्ड ट्रम्प यांना वाटले होते की, त्यांच्या टॅरिफच्या अटीनंतर भारत रशियन तेल खरेदी लगेचच बंद करेल.

परंतू भारताने असे अजिबात केले नाही आणि अमेरिकेसमोर भारत झुकला नाही. भारताने अमेरिकेच्या धमकीकडे लक्ष दिले नाही. मुळात म्हणजे भारतावर टॅरिफ लादण्याची रणनीती फार काही विचार करून घेण्यात करण्यात आली नाही. ट्रम्प हे फार जास्त विचार करून गोष्टी करत नाहीत. मुळात म्हणजे भारताने अमेरिकेवर जास्त विश्वास ठेऊ नये. पुढे बोलताना जेफरी सॅक्स म्हणाले की, भारताला आपल्या स्वतंत्र नितीची आवश्यकता आहे.

अमेरिकेच्या अटी शर्यती आणि अॅक्शनवर भारताने सावधानतेची भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. मुळात म्हणजे विषय तोच आहे, भारताकडून चीन इतके अमेरिका एक्सपोर्ट करणार नाहीये. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. तब्बल 50 टक्के भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय अमेरिकेकडून घेण्यात आला. अमेरिकेच्या अटी मान्य करण्यासाठी भारतावर दबाव टाकला जात आहे. पाकिस्तानच्या आडून अमेरिका भारताचा गेम करत आहे. मात्र, असे असले तरीही भारत हा अमेरिकेपुढे झुकला नाहीये.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.