AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ISIS चा 2 नंबरचा नेता खल्लास, अमेरिकेची मोठी कारवाई ! ट्रम्प यांनी डायरेक्ट..

नायजेरियातील ISISचा दुसरा सर्वोच्च नेता अबू-बिलाल अल-मिनुकी याला ठार केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई अमेरिकन आणि नायजेरियन सैन्याने संयुक्तपणे केली होती. अल-मिनुकी हा ISISचा एक सर्वोच्च कमांडर मानला जात होता.

ISIS चा 2 नंबरचा नेता खल्लास, अमेरिकेची मोठी कारवाई ! ट्रम्प यांनी डायरेक्ट..
Image Credit source: Getty Images
| Updated on: May 16, 2026 | 1:14 PM
Share

अमेरिकेकडून एक सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. नायजेरियामध्ये ISISचा दुसरा सर्वोच्च नेता, अबू-बिलाल अल-मिनुकी याला ठार मारल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईची घोषणा केली असून ही कारवाई अमेरिकन सैन्य आणि नायजेरियन सैन्याने संयुक्तपणे पार पाडल्याचे नमूद केलं. आदेशानुसार, अमेरिकन सैन्य आणि नायजेरियन सैन्याने एक अत्यंत कठीण आणि गुप्त मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली, असं ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं.

ट्रम्प यांच्या सांगण्यानुसार, आयसिसचा दुसरा सर्वोच्च नेता अबू-बिलाल अल-मिनुकी हा नायजेरियात लपला होता. आपण तिथे सुरक्षुत आहोत असं त्याला वाटत होतं, पण अमेरिकी एजन्सीजना त्याच्या प्रत्येक हालचालीची खबर पोहोचत होती.अल-मिनुकी हा जगातील सर्वात सक्रिय दहशतवाद्यांपैकी एक होता, असं ट्रम्प म्हणाले. त्याच्या मृत्यूनंतर तो आफ्रिकन लोकांमध्ये भीती पसरवू शकणार नाही किंवा अमेरिकन लोकांविरुद्ध हल्ल्यांचे कट रचू शकणार नाही, असा दावाही त्यांनी केला. या ऑपरेशनमुळे ISIS च्या जागतिक नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे ट्र्म्प म्हणाले. या कारवाईसाठी ट्रम्प यांनी नायजेरिया सरकारचे आभारही मानले.

कोण होता अबू-बिलाल ?

अबू-बिलाल अल-मिनुकी हा जागतिक स्तरावर ISISचा दुसरा सर्वोच्च नेता मानला जात होता. तो अबू बक्र इब्न मुहम्मद इब्न अली अल-मनुकी या टोपणनावानेही ओळखला जात असे. आफ्रिकेच्या साहेल प्रदेशात तो बऱ्याच काळापासून सक्रिय होता. साहेल हा आफ्रिकेचा एक विस्तीर्ण प्रदेश असून तो अटलांटिक महासागरापासून तांबड्या समुद्रापर्यंत पसरलेला आहे. सहारा वाळवंट आणि दक्षिण आफ्रिकेच्या हिरव्यागार प्रदेशांच्या दरम्यान हा वसलेला आहे. यामध्ये सेनेगल, मॉरिटानिया, माली, बुर्किना फासो, नायजर, नायजेरिया, चाड आणि सुदान यांसारख्या देशांचा समावेश आहे.

आयसिसच्या पश्चिम आफ्रिकन शाखेचा होता कमांडर

रिपोर्ट्सनुसार, अल-मिनुकी हा ISWAP (इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिका प्रोव्हिन्स) या ISIS च्या पश्चिम आफ्रिका शाखेचा वरिष्ठ कमांडर होता. तो चाड सरोवराच्या प्रदेशातील आयसिसच्या विविध कारवायांवर देखरेख करत असे. त्याने विविध दहशतवादी गटांना आर्थिक मदत, शस्त्रे आणि निर्देश पुरवल्याची माहिती समोर आली आहे.

3 वर्षांपूर्वी ग्लोबल दहशतवादी लिस्टमध्ये नाव

अमेरिका त्याला फार पूर्वीपासून एक मोठा दहशतवादी धोका मानत होती. जून 2023 मध्ये, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने त्याला ‘स्पेशली डेझिग्नेटेड ग्लोबल टेररिस्ट’ म्हणून घोषित केले. अमेरिका त्याला जगातील सर्वात धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक मानत होती. त्याच अल-मिनुकीचा मृत्यू हा आयसिससाठी एक मोठा धक्का आहे, असं अमेरिकेचं म्हणणं आहे. अलिकडच्या वर्षांत, ISIS आणि त्याच्याशी संलग्न दहशतवादी गटांनी आफ्रिकेत आपल्या कारवाया झपाट्याने वाढवल्या असून, नायजेरिया आणि आसपासच्या भागांमध्ये वारंवार हल्ले केले होते.

Follow Us
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक