AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणचं आता काही खरं नाही! ट्रम्प उचलणार टोकाचं पाऊल? नेमकं काय घडणार वाचा

इराणने अमेरिकेच्या काही बोटींवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी थेट इराणला धमकी दिली आहे. आता पुढे काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इराणचं आता काही खरं नाही! ट्रम्प उचलणार टोकाचं पाऊल? नेमकं काय घडणार वाचा
donald trumpImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 05, 2026 | 8:02 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा युद्ध भडकण्याची शक्यता आहे. कारण इराणने सीजफायर तोडून युएईवर हल्ला केला. तसेच होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये देखील काही बोटींवर हल्ला केला. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ट्रम्प यांनी इराणला थेट धमकी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी म्हटले आहे की, जर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये अडकलेल्या जहाजांना सुरक्षा पुरवणाऱ्या अमेरिकन जहाजांवर हल्ला केला, तर इराणचे नाव पृथ्वीच्या नकाशावरून पुसून टाकले जाईल.

ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकन सैन्याने इराणशी संबंधित सात लहान जहाजे नष्ट केली आहेत, ज्यामुळे प्रोजेक्ट फ्रीडम अंतर्गत होर्मुझ सामुद्रधुनीच्या आसपास तणाव वाढला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दावा केला होता की, इराणने काही जहाजांवर हल्ला केला आहे, ज्यामध्ये एका दक्षिण कोरियन मालवाहू जहाजाचाही समावेश आहे. २८ फेब्रुवारी रोजी इराणसोबत युद्ध सुरू झाल्यापासून हा मार्ग प्रभावीपणे बंद आहे.

इराणने केले लक्ष्य

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी पुढे म्हटले की, “इराणने प्रोजेक्ट फ्रीडम अंतर्गत जहाजांच्या हालचालींबाबत काही इतर देशांना लक्ष्य केले आहे, ज्यात दक्षिण कोरियन कार्गो जहाजाचा समावेश आहे. कदाचित आता दक्षिण कोरियासाठी या मोहिमेत सामील होण्याची वेळ आली आहे.”

लहान नौकांना बनवले निशाणा

ट्रम्प यांनी माहिती दिली की अमेरिकन सैन्याने सात लहान नौकांना लक्ष्य केले आहे आणि दक्षिण कोरियाला होर्मुझ सामुद्रधुनीतील या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले आहे. ट्रम्प म्हणाले, “आमच्याकडे पूर्वीपेक्षा अधिक प्रगत श्रेणीतील शस्त्रे आणि दारूगोळा आहे. आमच्याकडे उत्कृष्ट उपकरणे आहेत. आमचे अस्तित्व संपूर्ण जगात आहे आणि आमचे लष्करी तळ जगभर पसरलेले आहेत. हे सर्व तळ सामग्रीने सज्ज आहेत. आम्ही या सर्व गोष्टींचा वापर करू शकतो आणि गरज पडल्यास नक्कीच करू.”

होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव कायम

अमेरिकेने इराणने अमेरिकन नौदलाच्या जहाजावर हल्ला केल्याचे दावे फेटाळून लावले आहेत. दरम्यान, अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना मार्गदर्शनाची ऑफर दिली आहे. इराणसोबत युद्ध सुरू झाल्यापासून होर्मुझमध्ये शेकडो जहाजे अडकली आहेत. अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडने सांगितले की, अमेरिकन ध्वज असलेली दोन व्यापारी जहाजे यशस्वीरित्या होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडून गेली आहेत आणि पर्शियन आखातात तैनात असलेली नौदलाची गाइडेड-मिसाइल विनाशक जहाजे व्यापारी वाहतूक पूर्ववत करण्यात मदत करत आहेत.

कमांडने सोशल मीडियावर म्हटले आहे की, ही जहाजे प्रोजेक्ट फ्रीडम अंतर्गत होर्मुझ सामुद्रधुनीतून गेली आणि व्यापारी जहाजे सुरक्षितपणे त्यांच्या इच्छित स्थळाकडे जात आहेत. मात्र, नौदलाची जहाजे कधी पोहोचली किंवा व्यापारी जहाजे कधी रवाना झाली, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी