पुतिन डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीला पोहोचताच अलास्का एअर बेसवर ही घटना, अमेरिकेच्या डोक्यात नेमकं काय?

संपूर्ण जगाचे लक्ष असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची बैठक बार पडली. मात्र, ज्यावेळी पुतिन हे अमेरिकेला पोहोचले त्यावेळी एक मोठी घटना घडली. ज्यानंतर आता विविध चर्चांना उधाण आले आहे.

पुतिन डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीला पोहोचताच अलास्का एअर बेसवर ही घटना, अमेरिकेच्या डोक्यात नेमकं काय?
Donald Trump and Vladimir Putin
| Updated on: Aug 16, 2025 | 12:46 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात 15 ऑगस्ट 2025 रोजी बैठक झाली. पुतिन हे अमेरिकेत पोहोचले. मागील काही वर्षांपासून अमेरिका आणि रशियातील संबंध ताणले गेलेले असतानाच डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन यांच्या भेटीकडे सर्वांच्या नजरा होत्या. या भेटीचा मुख्य अजेंडा युक्रेन युद्ध होते. मात्र, यावर काहीच निर्णय झाला नाही. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफबद्दलची भाषा बदलली आहे. रशियाकडून कच्चे तेल विकत घेणाऱ्या देशांवर मोठा टॅरिफ अमेरिकेकडून लादण्यात आला. संपूर्ण जगाच्या डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन या भेटीकडून नजरा होत्या.

डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीदरम्यान आकाशात अमेरिकन बी-2 बॉम्बर्स आणि एफ-22 रॅप्टर्स दिसू लागले. अमेरिकेने पुतिन यांच्यासमोर आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे पुतिन हे विमानतळावर येण्याच्या काही वेळ अगोदरत त्यांचे स्वागत करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प येऊन पोहोचले होते. त्यानंतर दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी हात मिळून भेटील सुरूवात केली. अलास्कामध्ये पुतिन यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या एअर फोर्स वन विमानाने एल्मेनडॉर्फ-रिचर्डसन येथील जॉइंट बेसवर पोहोचले होते. त्या एअरबेसवर अमेरिकेचे प्राणघातक लढाऊ विमाने तैनात होती. पुतिन हे येण्याच्यावेळी त्या बेसवर फक्त आणि फक्त सर्वत्र लढाऊ विमाने दिसत होती. पुतिन त्यांच्या विमानातून खाली उतरताच ट्रम्प यांनी हात मिळून त्यांचे स्वागत केले.

अमेरिकन बी-2 स्टेल्थ बॉम्बर्स आणि एफ-३५ जेट्स आकाशात फिरत होती. दोन्ही बाजूला एफ-22 लढाऊ विमाने उभी होती. हे रशियन राष्ट्राध्यक्षांचे स्वागत होते तर दुसरीकडे अमेरिका जोरदार शक्ती प्रदर्शन करत होती. शिखर परिषदेपूर्वी दोन बी-2 बॉम्बर्स अलास्का बेसवर आणण्यात आले होते, तर जवळच्या आयल्सन एअर फोर्स बेसवरून चार एफ-35 जेट्सने उड्डाण केले होते. एफ-22 विमाने आधीच एल्मेनडॉर्फ बेसवर उपस्थित होती. मात्र, या बैठकीतून कोणत्याही प्रकारचा निर्णय हा युक्रेन युद्धाबद्दल होऊ शकला नाहीये.