
US No Kings Protests: तानाशाही, हुकूमशाही आणि युद्धखोरीविरोधात ट्रम्प यांना अमेरिकेतूनच मोठा विरोध सुरू झाला आहे. जवळपास 90 लाख लोकांनी इराणविरोधातील युद्ध थांबवण्याचे आणि ट्रम्प यांना हाकलण्याचा हाकारा दिला आहे. शनिवारी ट्रम्प यांच्याविरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली. वाढती महागाई, ट्रम्प यांची धोरणं, इराणसोबतचे युद्ध या मुद्दावरून नागरीक संतप्त झाले आहेत. अमेरिकेतील जवळपास प्रत्येक शहरातील रस्त्यावर लोक उतरले. मोठ्या शहरांसह अगदी छोट्या गावातही ट्रम्प यांच्याविरोधातील असंतोष उफाळून आला. आंदोलकांनी यावेळी ट्रम्प यांच्याविरोधात नारेबाजी केली. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि गाण्यातून ट्रम्प यांना हाकला असे हाकारे देण्यात आले. तर दुसरीकडे इस्त्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये सुद्धा लाखो लोक युद्धाविरोधात रस्त्यावर उतरली. त्यांनी नो वॉरची नारेबाजी केली. इराणविरोधात युद्ध नको यासाठी नागरिक रस्त्यावर उतरली.
ट्रम्प यांना हाकला
न्यूयॉर्क सिटीमध्ये मोठे आंदोलन झाले. लाखो लोक रस्त्यावर उतरली. मिडटाऊन मॅनहडन येथे मोठा मोर्चा काढण्यात आला. इमिग्रेशन नीती, ट्रम्प सरकार आणि इराण युद्धावरून लोकांमध्ये मोठा संताप दिसून आला. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये लोकांनी मोठा मोर्चा काढला आणि ट्रम्प यांना हाकलण्याचे आवाहन केले. यावेळी युक्रेन युद्ध थांबवण्यासह ट्रान्सजेंडरविषयी ट्रम्प यांच्या धोरणांचा मोठा विरोध केला. सेंट पॉल शहरातही मोठा मोर्चा काढण्यात आला. अनेक प्रसिद्ध बँड आणि गायकांनी या मोर्चात सादरीकरण केले. त्यांनी जनतेचे समर्थन केले. अमेरिकेच्या नवीन इमिग्रेशन धोरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तर इराण युद्ध तात्काळ थांबवण्याची मागणी जनतेने रस्त्यावर उतरत केली आहे. या युद्धाने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. ट्रम्प यांची धोरणं ही अमेरिकेसाठी मारक असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
इस्त्रायलमध्येही नो वॉरचे पोस्टर
तर दुसरीकडे या युद्धाचे नेतृत्व करणाऱ्या इस्त्रायलमध्ये सुद्धा इराण युद्ध तात्काळ थांबवण्याच्या मागणीसाठी लाखो लोक रस्त्यावर उतरली. इस्त्रायलची राजधानी तेल अविवमध्ये लाखो लोकांनी सरकारविरोधात नारेबाजी केली. नेतन्याहू यांनी युद्ध थांबवावे. देशात या युद्धाचे परिणाम होत असून महागाई भडकल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. सततच्या युद्धामुळे इस्त्रायलची जनताही विटली आहे. यावेळी आंदोलनात नो वॉरची पोस्टर झळकली. त्यामुळे इराण युद्ध हे ट्रम्प आणि नेतन्याहू यांनी लादल्याचे या आंदोलनातून समोर येत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. दोन्ही देशातील नागरीक या नेत्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरली आहेत.