AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : ट्रम्प यांच्या टीममध्ये भारतीयांचा बोलबाला, व्हाईट हाऊसमध्ये कोणाची एंट्री ?

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या टीममध्ये आणखी एका भारतीय वंशाच्या अमेरिकन व्यक्तीचा समावेश केला आहे. त्यांच्या टीममध्ये भारतीयांचा बराच बोलबाला असून आता नवीन समावेश झालेली ही व्यक्ती कोण?

Donald Trump : ट्रम्प यांच्या टीममध्ये भारतीयांचा बोलबाला, व्हाईट हाऊसमध्ये कोणाची एंट्री ?
डोनाल्ड ट्रम्प
| Updated on: Jan 25, 2025 | 12:59 PM
Share

अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच शपथ घेतली. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या अनेक व्यक्तींवर विश्वास दाखवला आहे. त्याच दरम्यान ट्रम्प यांनी त्यांच्या टीममध्ये आणखी एका भारतीय वंशाच्या व्यक्तीचा समावेश केला आहे. अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी आता भारतीय-अमेरिकन माजी पत्रकार कुश देसाई यांची उप प्रेस सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. व्हाईट हाऊसतर्फे ही घोषणा केली आहे.

देसाई यांनी यापूर्वी रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनसाठी उपसंचार संचालक आणि आयोवा रिपब्लिकन पक्षाचे संप्रेषण संचालक म्हणून काम केले आहे. रिपब्लिकन नॅशनल कमिटीमध्ये ते डेप्युटी बॅटलग्राउंड स्टेट्स आणि पेनसिल्व्हेनिया कम्युनिकेशन डायरेक्टर देखील होते. या पदावर असताना त्यांनी मुख्य बॅटलग्राऊंड स्टेट्समध्ये(राज्यांमध्ये) विशेषतः पेनसिल्व्हेनिया येथे मध्ये मैसेजिंग आणि नॅरेटिव्ह सेट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ट्रम्प यांनी बॅटलग्राऊंडमधील सर्व सात राज्यांत विजय मिळवला.

दरम्यान यापूर्वी ट्रम्प यांनी स्टीव्हन च्युंग यांची सचिव आणि व्हाईट हाऊसचे कम्युनिकेशन डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली होती. याशिवाय कॅरोलिन लेविट यांची सचिव आणि प्रेस सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. व्हाईट हाऊस कम्युनिकेशन्स ऑफिसची देखरेख हे व्हाईट हाऊसचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ आणि कॅबिनेट सचिव टेलर बुडोविच करतील.

ट्रम्प यांच्या कॅबिनेटमध्ये कोणा कोणाचा समावेश ?

काश पटेल – ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या काश पटेल यांची अमेरिकेचे नवे एफबीआय प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

विवेक रामास्वामी – ट्रम्प यांनी विवेक रामास्वामी यांची नवीन शासकीय कार्यक्षमता विभागासाठी (DOGE) निवड केली आहे. सरकारला सल्ला देण्याचे कार्य रामास्वामी हे करतील.

जय भट्टाचार्य – जय भट्टाचार्य यांची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) चे संचालक म्हणून ट्रम्प यांनी नियुक्ती केली आहे.

तुलसी गबार्ड – तर तुलसी गबार्ड यांची राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालकपदी ट्रम्प यांनी नियुक्ती केली आहे. त्यांनी अलीकडेच डेमोक्रॅटिक पक्ष सोडून रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला होता.

हरमीत के धिल्लन – ट्रम्प यांनी न्याय विभागातील नागरी हक्कांसाठी असिस्टंट ॲटर्नी जनरल म्हणून ढिल्लन यांची नियुक्ती केली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून ही त्यांची दुसरी टर्म आहे. ते 2016-20 पर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष होते. सत्तेवर येताच ट्रम्प यांनी अनेक मोठे आणि कठोर निर्णय घेतले.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.