मी जिवंत आहे…! मोदी-पुतिन आणि जिनपिंग यांच्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य चर्चेत, का ते जाणून घ्या
अमेरिकेच्या टॅरिफ नीतिनंतर संपूर्ण जगाचं लक्ष ट्रम्प यांच्या पुढच्या पावलाकडे लागून आहे. राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी धडाधड निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे इतर देशांची आर्थिक स्थिती अडचणीत आली आहे. असं असताना एका चर्चेचं पेव फुटलं होतं. अखेर यावर पडदा पडला आहे.

अमेरिकेच्या टॅरिफ धोरणानंतर इतर बलाढ्य देशांनी मोर्चा उघडला आहे. रशियाकडून तेल आयात करण्याचं कारण देत अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला होता. या दबावानंतर भारत झुकेल असं वाटलं होतं. पण त्याच्या विरुद्ध फासे पडताना दिसत आहे. भारताची रशिया आणि चीनसोबत जवळीक वाढताना दिसत आहे. शांघाई सहयोग संघटन समिटमध्ये हे तीन देश एका व्यासपीठावर आले. यामुळे अमेरिकेचे धाबे दणाणले आहेत. असं असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल मिडिया पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मी जिंवत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे नेमकं काय झालं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याला कारणंही सोशल मीडियाच आहे. गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत अफवा उडाल्या होत्या. तसेच एक्स मिडिया प्लॅटफॉर्मवर ‘डोनाल्ड ट्रम्प डेड’ हे ट्रेण्ड होत होतं. त्यामुळे अफवांचं पेव फुटलं होतं. अखेर यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पडदा टाकला आहे.
सोशल मीडियावर सुरु असलेल्या अफवांना डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन शब्दात पूर्णविराम दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल मीडियावर ‘मी जिवंत आहे’ अशी पोस्ट केली आणि चर्चा थांबवल्या आहेत. वॉशिंग्टनस्थित रोल कॉलच्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प 30 आणि 31 ऑगस्टला सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेणार नाही, असं सांगितलं होतं. अनेकांनी याचा संदर्भ थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीशी जोडला आणि अफवा पसरवण्यास सुरवात केली.
There is obviously something going on with Trump that the White House is covering up. This is literally Biden 2.
— Nicholas J. Fuentes (@NickJFuentes) September 1, 2025
“ट्रम्प यांच्यासोबत असे काहीतरी घडत आहे जे व्हाईट हाऊस लपवत आहे,” असे फ्युएन्टेस यांनी एक्सवर संशय व्यक्त केला. अध्यक्षांचे अलीकडील मौन आणि अस्थिर सार्वजनिक उपस्थिती जो बिडेन यांच्या कथित गुप्तता प्रतिबिंबित करते, असा संशय त्याने वर्तवला.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी पोस्ट केली आहे. यात त्यांनी भारताला पुन्हा एकदा टार्गेट केलं आहे. ‘खूप कमी लोकांना माहिती आहे की आपण भारतासोबत खूप कमी व्यापार करतो. परंतु ते अमेरिकेसोबत खूप व्यापार करतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, ते त्यांचे सर्वात मोठे ग्राहक म्हणून आम्हाला मोठ्या प्रमाणात वस्तू विकतात, परंतु आम्ही त्या खूप कमी प्रमाणात विकतो.’
