200 टक्के टॅरिफ… डोनाल्ड ट्रम्प यांची खळबळ उडवणारी बैठक, भारतातील शेतकरी संकटात, थेट..

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून संपूर्ण जगाला टॅरिफच्या धमक्या देताना दिसत आहेत. हेच नाही तर कोणत्या वस्तूवर ते टॅरिफ लावतील याचा अजिबातच नेम राहिला नाही. नुकताच अमेरिकेत खळबळ उडवणारी मिटिंग झालीये.

200 टक्के टॅरिफ... डोनाल्ड ट्रम्प यांची खळबळ उडवणारी बैठक, भारतातील शेतकरी संकटात, थेट..
US President Donald Trump
| Updated on: Dec 09, 2025 | 9:36 AM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एका मागून एक भारताला झटके देताना दिसत आहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याचे सांगून त्यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. त्यामध्येच भारतावर मोठा दबाव टाकला जातो. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर अमेरिकेत होणारी निर्यात कमी झाली. भारत या टॅरिफमधून मार्ग काढतच असताना अमेरिका अजून मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. भारत आणि अमेरिकेत सध्या व्यापार चर्चा सुरू आहेत. अंतिम टप्प्यात व्यापार करार आहेत. पुतिन यांच्या भारत दाैऱ्यानंतर अमेरिका टॅरिफमध्ये मोठी वाढ करणार असल्याचे सांगितले जाते. त्यामध्येच नुकताच अमेरिकेत एक बैठक पार पडली. या बैठकीत कृषी उत्पादनांबद्दल चर्चा झाली. हेच नाही तर परदेशी कृषी उत्पादनांमुळे अमेरिकेतील शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे सांगण्यात आले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी कृषी उत्पादनांवर टॅरिफ वाढवण्यावर भाष्य केले. हा अत्यंत मोठा झटका असणार आहे.
शेतकऱ्यांनी स्वस्त परदेशी उत्पादनांचा अमेरिकन बाजारपेठेवर होणाऱ्या परिणामाबद्दल तक्रार केली. अमेरिकन शेतकऱ्यांसाठी 12 अब्ज डॉलर्सच्या मदत पॅकेज दरम्यान ही बैठक घेण्यात आली होती. काही देश अमेरिकेच्या बाजारपेठेत कमी दरात तांदूळ विकत आहेत. त्यामुळे याचा परिणाम थेट अमेरिकेतील शेतकऱ्यांना बसत आहे आणि त्यांना नुकसान होतंय.

ट्रम्प यांनी म्हटले की, ते फसवणूक करत आहेत. याची चाैकशी व्हायला पाहिजे. लुईझियाना येथील केनेडी राईस मिल्सच्या सीईओने दावा केला की भारत, थायलंड आणि चीन या देशातून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात तांदळाची आयात होते. यामुळे आता अमेरिका तांदळावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावू शकते, तसे थेट संकेत आहेत. यामुळे फक्त भारतच नाही तर चीनलाही मोठा फटका बसू शकतो.

यूएस ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह (USTR) कार्यालयाचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ रिक स्वित्झर यांच्या नेतृत्वाखाली 10 आणि 11  डिसेंबरला भारत आणि अमेरिकेत व्यापार चर्चा होईल. ही व्यापार चर्चा सकारात्मक होण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न केली जात आहेत. मात्र, आता अमेरिका कृषी उत्पादनांवर जास्त प्रमाणात टॅरिफ लावण्याची शक्यता आहे. आम्ही आमच्या हितासाठी टॅरिफ वाढव्याबद्दल निर्णय घेऊन शकतो, असे सांगितले जातंय. 200 टक्के टॅरिफ अमेरिका कृषी उत्पादनांवर लावू शकते.