AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अत्यंत मोठी चूक, भारताचे नाव घेत थेट..

अमेरिका भारतावर मोठा टॅरिफ लावण्याच्या तयारीत आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर टॅरिफ लावण्याच्या तयारीत अमेरिका आहे. त्यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अत्यंत मोठी चूक करण्यात आली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अत्यंत मोठी चूक, भारताचे नाव घेत थेट..
Donald Trump
| Updated on: Oct 05, 2026 | 11:51 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय पायलट स्मित मच्छार यांचे काैतुक केले. स्मित मच्छार यांनी 180 लोकांचा जीव वाचवला आणि 9\11 सारखा हल्ला होण्यापासून रोखले. फक्त भारतच नाही तर जगभरातून स्मित मच्छार याचे काैतुक केले जातंय. स्वत: गंभीर जखमी असतानाही स्मित मच्छार यांनी जिवाची परवा न करता कॉकपिटचा दरवाजा उघडला. त्यानंतर हल्लेखोर को पायलट असलेल्या ओमानच्या पायलटला लोकांनी पकडून ठेवले. त्यानंतर भारतीय पायलटने सुरक्षित विमान उतरवले. त्यातच आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अत्यंत मोठी चूक झाली. ब्राझीलमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका सुरू आहेत. यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली, परंतु त्यानंतर ते टीकेची धनी ठरले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये ब्राझीलचे नाव घ्यायचे तर त्यांनी थेट भारताचे नाव घेतले. ब्राझील ऐवजी त्यांनी भारत लिहिले. या चुकीमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ट्रम्प यांनी यापूर्वीही अशाच प्रकारच्या चुका केल्या आहेत. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केली आहेत.

त्यांनी अमेरिकेच्या निवडणूक प्रणालीवरही टीका केली. ट्रुथवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, आज भारताच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पहिल्या फेरीत 12 कोटी 50 लाख लोकांनी मतदान केले. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच निकाल जाहीर होतील. डेट्रॉईट, फिलाडेल्फिया, कॅलिफोर्निया आणि अमेरिकेतील इतर अनेक शहरे व राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी आहे.

या माध्यमातून ते अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेवर टीका करताना दिसले. मात्र, ब्राझील नाही तर भारताच्या नावाचा उल्लेख त्यांनी केला. ही पोस्ट केली. भारतावर मोठा टॅरिफ लावण्याच्या तयारीत अमेरिका आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना कुठेही फक्त आणि फक्त भारतच दिसत आहे. अमेरिकेने जर भारतावर मोठा टॅरिफ लावला तर भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात येतील. चीनवरही टॅरिफचे मोठे संकट आहे.

Follow Us
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?