
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जगाची डोकेदुखी वाढली आहे. एकीकडे ते भारताला एका मागून एक धक्का देण्याबद्दल बोलतात, तर दुसरीकडे त्यांची कंपनी भारतामध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे. भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेने लादला. आता ते भारताच्या तांदळावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याच्या तयारीत आहेत. भारताने जर अमेरिकेत निर्णयात करणे बंद केले तर अमेरिकेमध्ये मोठा हा:हाकार बघायला मिळेल. हेच नाही तर खाद्यपदार्थांसोबतच अनेक वस्तूंचे भाव गगणाला पोहोचतील. भारतापेक्षा जास्त धक्का अमेरिकेला बसेल. भारताने अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर पर्यायी शोध घेतले असून आपले नुकसान टाळले आहे. डोनाल्ड ट्रम्प कायमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल माझे जवळचे मित्र असल्याचे सांगताना दिसतात. मात्र, तरीही भारतावर टॅरिफ लावतात.
डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे डावपेच कळणे सर्वात कठीण काम आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या बिझनेस ग्रुपने तेलंगणामधील फ्युचर सिटी आणि इतर प्रकल्पांमध्ये ₹ 1 लाख कोटी पर्यंतच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप कॉर्पोरेशन (TMTG) चे संचालक एरिक स्विडर यांनी याबद्दलची घोषणा केली. नुकताच ही अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली. स्विडर यांनी ट्रुथ सोशलचे संस्थापक सीईओ म्हणूनही काम केले आहे.
एरिक स्विडर यांनी या गुंतवणुकीबद्दल घोषणा करत म्हटले की, भारत वेगाने प्रगती करत आहे आणि तंत्रज्ञानात जगाचे नेतृत्व करेल. डोनाल्ड ट्रम्प हे ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुपचे मालक आहेत. आता त्यांच्याच कंपनीने इतकी मोठी गुंतवणूक भारतात केली. तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये तंत्रज्ञान कोण विकसित करत आहे आणि कोण काम करत आहे हे पाहिले तेव्हा हे स्पष्ट झाले होते की, भारतातून बरेच लोक पुढे येत आहेत. टेक्नॉलॉजीमध्ये आता भारत थांबणार नसल्याचेही त्यांनी म्हटले.
स्विडर म्हणाले की, भारतात तंत्रज्ञानात गुंतवणुकीच्या उत्तम संधी आहेत. भारताची प्रगती कोणालाही थांबवता येणार नाही. तंत्रज्ञानात भारत जगाचे नेतृत्व करेल. आता थेट डोनाल्ड ट्रम्प यांनीच भारतात ही गुंतवणूक केल्याने जगाने भुवया उंचावल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून भारताने ज्याप्रकारे टेक्नॉलॉजीमध्ये झपाट्याने जी प्रगती केली ती जगाने बघितली. अनेक देश भारतात गुंतवणूक करताना दिसत आहेत.