AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने तो निर्णय घेतला तर अमेरिकेत उडेल भडका, जग हादरलं, अमेरिकेत कित्येक पट्ट…

डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून भारताविरोधात भूमिका घेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतापेक्षा अधिक नुकसान अमेरिकेचे होताना दिसत आहेत. आता त्यांनी भारताच्या तांदळाबद्दल मोठे विधान केले आहे. भारताच्या तांदळावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याचे संकेत त्यांनी दिले.

भारताने तो निर्णय घेतला तर अमेरिकेत उडेल भडका, जग हादरलं, अमेरिकेत कित्येक पट्ट...
America
| Updated on: Dec 10, 2025 | 10:55 AM
Share

अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावला. यामुळे दोन्ही देशातील तणाव वाढला. आज भारत आणि अमेरिकेत व्यापार कराराबद्दल महत्वाची बैठक आहे. दोन्ही देशातील व्यापार करार अंतिम टप्प्यात आहे. दोन्ही देशातील शिष्टमंडळातील अनेक गोष्टींवर चर्चा होईल. भारताने अगोदरच स्पष्ट केले की, भारत कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाहीये. भारत आम्हाला फक्त त्यांच्या वस्तू विकतो पण आमच्याकडून काहीच खरेदी करत नाही, अशी अमेरिकेची ओरड होती. शेवटी आता दोन्ही देशांमधील व्यापार करार अंतिम टप्प्यात आहे. व्यापार करार जवळपास पूर्ण होण्याचे संकेत असताना टॅरिफ कमी करण्याबद्दल अमेरिकेने अजिबात भूमिका जाहीर केली नाही. हेच नाही तर उलट भारताच्या तांदळावर टॅरिफ लावण्याचे संकेत त्यांच्याकडून देण्यात आली.

भारत आणि अमेरिकेत व्यापार चर्चा सुरू असतानाच पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या तांदळावर अतिरिक्त शुल्क लादण्याचा विचार करत असल्याचे म्हटले आहे. एकीकडे व्यापार करार अंतिम टप्प्यात आहेत सांगणारे ट्रम्प दुसरीकडे भारताच्या तांदळावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा विचार करत आहेत. याचा थेट फटका भारतातील शेतकऱ्यांना बसेल.

भारत अमेरिकेला अत्यंत कमी किंमतीमध्ये तांदूळ विकत आहे. यामुळे तेथील शेतकऱ्यांचे नुकसान होत असून बाजारपेठेत भारत, व्हिएतनाम आणि थायलंडला तांदूळ वाढला आहे आणि तो स्वस्त भावात मिळत असल्याने ग्राहक त्याची खरेदी करत आहेत. ज्यामुळे अमेरिकन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, असा ट्रम्प यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीची घोषणा करताना ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये हे विधान केले.

भारताने 2024-25 मध्ये अमेरिकेला 23.4 दशलक्ष टन तांदूळ निर्यात केला. भारताच्या एकूण 5.24 दशलक्ष टन बासमती तांदळाच्या 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे. जर भारताने अमेरिकेत निर्यात बंद केली तर अमेरिकेच्या मार्केटमध्ये मोठा भूकंप येईल. अमेरिकेच्या बाजारपेठेत वस्तूंच्या किंमती वाढू शकतात. भारतासोबतचा व्यापार थांबल्यानंतर अमेरिकेला व्हिएतनामसारख्या पुरवठादारांवर अवलंबून राहावे लागेल.

विशेष म्हणजे भारताने अमेरिकेसोबतचा व्यापार जर पूर्णपणे थांबवला तर अमेरिकेच्या तुलनेत भारताचे कमी नुकसान होईल, अधिक नुकसान अमेरिकेलाच सहन करावे लागेल. अमेरिकेला अजूनही काही मोठे धक्के सहन करावे लागू शकतात. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार थांबविल्याने अजून काही क्षेत्रांवरही परिणाम होईल. अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही कमी होईल.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा