AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Election 2020 LIVE : दोन विशाल राज्य गमावूनही ट्रम्पना विजय शक्य, 2016 च्या रणनीतीची पुनरावृत्ती होणार?

2016 मध्ये, हिलरी क्लिंटन यांना अधिक लोकप्रिय मते मिळाली, परंतु ट्रम्प यांनी जास्त राज्ये जिंकली होती

US Election 2020 LIVE : दोन विशाल राज्य गमावूनही ट्रम्पना विजय शक्य, 2016 च्या रणनीतीची पुनरावृत्ती होणार?
| Updated on: Nov 04, 2020 | 12:05 PM
Share

2020 US election results | वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे (US President Election) सर्व जगाचं लक्ष लागलं आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन (Joe Biden) यांनी बहुमताच्या दिशेने वाटचाल केली असली, तरी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असलेले विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) टफ फाईट देताना दिसत आहे. गेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या तत्कालीन उमेदवार हिलरी क्लिंटन (Hillary Clinton) यांना जास्त मतं मिळूनही ट्रम्प विजयी झाले होते. त्याचप्रमाणे यंदाही ट्रम्प यांनी विजयाची रणनीती आखल्याचं जाणकार मानतात. (US President Election Live Update Donald Trump rallies could help win electoral votes)

रिपब्लिकन पक्षाने गेल्या वेळी नवमतदारांना टार्गेट केले होते. म्हणजे, ज्या मतदारांनी पूर्वी कधीच मतदान केले नव्हते. 2016 मध्ये ट्रम्प यांनी ओहायो, मिशिगन, विस्कॉन्सिन, पेनिसिल्वेनिया आणि फ्लोरिडामध्ये विजय मिळवला होता. यावेळी सर्वांचे लक्ष या राज्यांकडे आहे.

प्यू रिसर्च सेंटरच्या मते, अमेरिकेतील 67% मतदार श्वेतवर्णीय आहेत. ट्रम्प समर्थक असलेल्या बिगर महाविद्यालयीन सुशिक्षित मतदारांची टक्केवारी 40% आहे. देशातील हिस्पॅनिक मतदार लोकसंख्येच्या 13% आहेत. तर फ्लोरिडामधील क्यूबान समुदायाव्यतिरिक्त इतर मतदार सामान्यत: डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थक असतात. कृष्णवर्णीय मतदार हे डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थक असतात.

अशा परिस्थितीत रिपब्लिकन पक्ष अशा विशिष्ट पद्धतीने मतदान न करणाऱ्या मतदारांना आकर्षित करण्याची रणनीती आखते. यातील बहुतांश मतदार श्वेतवर्णीय श्रमिकवर्गातील असतात. रिपब्लिकन पक्षाने रॅलीमध्ये सर्वसाधारणपणे मतदान न करणार्‍या वर्गाला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला.

2016 मध्ये असे दिसून आले होते की ट्रम्प यांना व्हाईट इव्हॅंजेलिकल प्रोटेस्टंट (White Evangelicals Protestants) वर्गाचे 80% मतं मिळाली होती. दक्षिणेकडील राज्यांमध्ये 21%, मिडवेस्टमध्ये 14%, पश्चिमेमध्ये 13% आणि ईशान्येकडील 8% इतके मतदार स्वत:ला इव्हँजेलिकल प्रोटेस्टंट मानतात. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे सहन्यायमूर्ती अ‍ॅमी कोनी बॅरेट यांच्या नियुक्तीमुळे ट्रम्पना अधिक पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा आहे. गर्भवती महिलांना गर्भपात करण्याच्या स्वातंत्र्यावरील घटनात्मक हक्काबाबत कोर्टाच्या निर्णयावर बॅरेट यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

हिलरी क्लिंटन पराभूत का झाल्या?

अमेरिकेचे अध्यक्ष इलेक्टोरल व्होट्सच्या माध्यमातून निवडले जातात. त्यामुळे लोकप्रिय मतदानाच्या (पॉप्युलर वोट्स) टक्केवारीच्या बाबतीत कोणता उमेदवार आघाडीवर आहे, याने फरक पडत नाही. 2016 मध्ये, हिलरी क्लिंटन यांना अधिक लोकप्रिय मते मिळवण्यात यश आले. म्हणजेच संपूर्ण देशात हिलरी यांना मतदान करणार्‍यांची संख्या अधिक होती. (US President Election Live Update Donald Trump rallies could help win electoral votes)

फ्लोरिडासारख्या काही प्रमुख राज्यांमध्ये (जिथे इलेक्टोरल व्होट्स अधिक आहेत) जास्त मतदारांनी ट्रम्प यांना मतदान केले. ज्या उमेदवाराला विशिष्ट राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय मते मिळतात, ते सर्व इलेक्टोरल मतांची कमाई करतात. त्यामुळे हिलरी यांना अधिक पॉप्युलर व्होट्स अधिक मिळूनही ट्रम्प यांना 2016 मध्ये जास्त राज्ये जिंकता आली होती आणि ते अध्यक्षपदाच्या खुर्चीत विराजमान झाले होते.

संबंधित बातम्या :

अमेरिकेत सत्ताबदलाचे संकेत!, बायडन यांची आघाडी, तर ट्रम्प पिछाडीवर!, हिंसेच्या शक्यतेनं न्यूयॉर्कमध्ये तगडा बंदोबस्त

 ट्रम्प आणि बायडन यांचं भवितव्य ‘या’ 12 राज्यांच्या हातात

(US President Election Live Update Donald Trump rallies could help win electoral votes)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.