China vs America : अमेरिकेने दाखवलं चीनला पुरुन उरणारं गेमचेंजर अस्त्र PrSM, यात काय खास आहे?
China vs America : अमेरिकेने जगाला असं अस्त्र दाखवलय त्यामुळे चीन सुद्धा दहशतीत येईल. महत्त्वाच म्हणजे अमेरिकेने या शस्त्राची चाचणी मित्र देशात केली आहे. तैवानवर चीनने हल्ला केल्यास हे शस्त्र चीनला पुरुन उरेल असं आहे. त्यामुळे अमेरिकेच हे शस्त्र खूप महत्त्वाच आहे.

चीनच चॅलेंज स्वीकार करत US ने जगाला आपलं सर्वात घातक अस्त्र दाखवलं आहे. हे एक गेम चेजिंग शस्त्र असून तैवानच्या सुरक्षेची गॅरेंटी मानलं जात आहे. हे शस्त्र म्हणजे Precision Strike Missile (PrSM) आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात हे शस्त्र विकसित करण्यात आलय. हे मिसाइल अशा पद्धतीने बनवण्यात आलय की, युद्ध काळात चिनी सैन्याच मोठ नुकसान होऊ शकतं.
चीन मागच्या अनेक वर्षांपासून तैवानवर अतिक्रमण करण्याची धमकी देत आहे. ड्रॅगन नेहमी या भागात सैन्य अभ्यासाच्या नावाखाली चिथावणीखोर कामं करत असतो. याचवरुन अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी इशारा दिलेला की, तैवानवर चीन कधीही हल्ला करु शकतो. सगळ्या जगासाठी हा एक इशारा असल्याच ते म्हणाले होते.
PrSM मिसाइलच वैशिष्टय काय?
अमेरिकेच्या PrSM मिसाइलच नुकतच ऑस्ट्रेलियात परीक्षण करण्यात आलं. या मिसाइलने 190 किलोमीटर पेक्षा अधिक दूर अंतरावर असलेल्या टार्गेटचा लक्ष्यभेद केला. अमेरिकेने बनवलेल्या या मिसाइलची चाचणी दुसऱ्या देशात घेण्यात आल्याची ही पहिलीच वेळ आहे. या मिसाइलच वैशिष्ट्य म्हणजे अमेरिका निर्मित HIMARS लॉन्चर किंवा ब्रिटनच्या MLRS तोपखाना प्रणालीतून डागता येतं. सध्या या क्षेपणास्त्राची क्षमता 190 किलोमीटर आहे. पण डिजायनर्सचा दावा आहे की, या मिसाइलची मारक क्षमता 300 किलोमीटरपेक्षा अधिक आहे.
जॅम करणं शक्य नाहीय
PrSM बाबत खास बाब म्हणजे स्पीड. 4000 किमी प्रतितास या मिसाइलचा वेग आहे. ATACMS मिसाइलच्या तुलनेत हा वेग 300 किमी प्रतितासापेक्षा जास्त आहे. युद्धकाळात चिनी युद्धनौका आणि विमानवाहू युद्धनौका या मिसाइलद्वारे नष्ट करता येऊ शकतात. अमेरिकी सैन्याचे मुख्य प्राद्योगिकी अधिकारी एलेक्स मिलर यांच्या हवाल्याने द सन ने लिहिलय की, हे मिसाइल जॅम करणं शक्य नाहीय. त्यामुळे याची कार्यक्षमता आणि मारक क्षमता वाढते. शत्रुच्या रडारला हे मिसाइल सापडत नाही.
अजून हायटेक
PrSM च्या भविष्याबद्दल काम आधीच सुरु झालय. याची रेंज 300 किमी पेक्षा अधिक करण्याबरोबर त्यात उन्नत सेन्सर आणि आधुनिक वॉरहेड्स जोडण्याची योजना आहे. दुसऱ्याबाजूला चीन उच्च तंत्रज्ञान असलेल्या शस्त्रास्त्रांची जमवाजमव करत आहे. अलीकडेच त्यांनी स्टेल्थ बॉम्बवर्षाव करणारी विमानं, मिसाइल्स आणि ड्रोनमध्ये व्यापक सुधारण्या केल्या आहेत.
