AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरे ते तर वेठबिगारी मजूर, भारतीयांबद्दल अमेरिकेचे खळबळजनक विधान, थेट..

भारत आणि अमेरिकेचे संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात आहेत. भारताविरोधात सतत अमेरिका भूमिका घेताना दिसत आहे. त्यातच आता भारतीय कामगारांबद्दल अत्यंत धक्कादायक विधान अमेरिकेकडून करण्यात आले.

अरे ते तर वेठबिगारी मजूर, भारतीयांबद्दल अमेरिकेचे खळबळजनक विधान, थेट..
Donald Trump
| Updated on: Oct 09, 2026 | 2:04 PM
Share

भारत अमेरिकेचे संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात आहेत. त्यातच भारतीय कंपन्यांवर थेट कारवाई अमेरिकेने केली. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठा टॅरिफ लावण्याच्या तयारीत अमेरिका आहे. भारतावर मोठी कारवाई केली जाणार आहे. त्यापूर्वीच भारतीय कंपन्यांवर कारवाई करत भारताला मोठा धक्का अमेरिकेने दिला. त्यातच भारतीय कर्मचाऱ्यांबद्दल मोठे विधान अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस यांनी केले. त्यांनी थेट भारतीय कामगारांना वेठबिगारी कामगार म्हटले. भारतीय कामगारांना वेठबिगारी म्हटल्याने मोठा संताप भारताने व्यक्त केला. भारताने स्पष्ट केले की, अमेरिकेमध्ये काम करणारे भारतीय हे अर्थव्यवस्था, इनोवेशन आणि विकासासाठी मोठे योगदान अमेरिकेत देतात. त्यांची भूमिका शब्दात व्यक्त केली जाऊ शकत नाही. त्यांचे योगदान खूप जास्त मोठे आहे. असे शब्द अत्यंत अपमानजनक आहेत.

दोन्ही देशांच्या संबंधांसाठी हे शब्द अजिबात योग्य नाहीत. भारताने स्पष्ट केले की, दोन्ही देशांसाठी हे कामगार फायदेशीर आहेत. भारतीय लोकांच्या योगदानाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. भारताची ही प्रतिक्रिया अशावेळी आली, ज्यावेळी अमेरिकेच्या सरकारने ग्रीन कार्डबद्दल नियम कडक केली आहेत. हेच नाही तर PERM कार्यक्रम बंद केला.

मायक्रोसॉफ्ट, एडोबी, कॉग्रिजेंट, इन्फोसिस, टाटा कंसल्टेंसी सर्विसेस, विप्रो, एचसीएल टेक्नोलॉजी आणि कॅपजेमिनी यात सहभागी आहेत. अमेरिकेच्या प्रशासनाचे म्हणणे आहे की, विदेशी कर्मचारी भरतीमध्ये गडबड आणि अमेरिकेच्या कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण यावर काम केले जातंय. सर्वच कंपन्यांविरोधात काही आरोप सिद्ध झाली नाहीत पण काही आरोप नक्कीच आहेत.

जेडी वेंस यांनी आरोप केला की, काही कंपन्या या अमेरिकेच्या कर्मचाऱ्यांना नोकऱ्यांहून काढून टाकत आहेत. त्याठिकाणी विदेशी कर्मचाऱ्यांना संधी देत आहेत. H-1B व्हिजाचा वापर कमी पैशांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी केला जात असल्याचेही यादरम्यान त्यांनी म्हटले. भारतीय कर्मचारी मोठ्या संख्येने H-1B व्हिसावर अमेरिकेत जाऊन नोकरी करतात. या निर्णयाने भारतातील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला.

Follow Us
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर
Mumbai Heat Wave : मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी