अमेरिकेचा ‘या’ देशांना दणका, आयातीवर 30 टक्के कर आकारण्याचा निर्णय
अमेरिकेने आता युरोपियन युनियन आणि मेक्सिकोवर 30 टक्के आयात कर लावण्याची घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाची झोप उडवली आहे. अमेरिकेने आता युरोपियन युनियन आणि मेक्सिकोवर 30 टक्के आयात कर लावण्याची घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, 1 ऑगस्टपासून युरोपियन युनियन आणि मेक्सिको या दोन्ही देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 30 टक्के यूएस कर लादला जाणार आहे. त्यामुळे या देशांची चिंता वाढली आहे.
अमेरिकेने याआधी जपान, दक्षिण कोरिया, कॅनडा आणि ब्राझीलसह अनेक देशांवर कर लादले आहेत. जे 1 ऑगस्टपासून लागू होणार आहे. युरोपियन युनियनमध्ये 27 देशांचा समावेश आहे. युरोपियन युनियनला आशा होती की करबाबत अमेरिकेसोबत एक व्यापार करार होईल, मात्र तसे झाले नाही, आता ट्रम्प यांनी कर लादण्याची घोषणा केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोला एक पत्र लिहिले आहे, यात ट्रम्प यांनी मेक्सिकोने अमेरिकेत बेकायदेशीर होणारे स्थलांतरित आणि फेंटानिल रोखण्यास मदत केल्याचे मान्य केले आहे. मात्र ट्रम्प यांनी असेही म्हटले की, मेक्सिकोने उत्तर अमेरिकेला नार्को-तस्करीचे स्थळ बनण्यापासून रोखण्यासाठी पावले उचलली नाहीत. त्यामुळे अमेरिकेने मेक्सिकोवर कर लादण्याचा निर्णय घेतला आहे.
युरोपियन युनियनला अमेरिकेसोबत व्यापार करार होईल अशी अपेक्षा होती, मात्र करार न झाल्यामुळे युनियनमधील देशांना धक्का बसला आहे. मात्र आता भविष्यात याबाबत करार होण्याची या देशांनी आशा आहे. जर्मनीसारख्या मोठ्या देशांना उद्योगांना नुकसान होऊ नये म्हणून जलद करार हवा आहे. मात्र फ्रान्स आणि इतर काही देशांनी युनियनने अमेरिकेच्या अटींपुढे झुकू नये आणि एकतर्फी करार टाळावा अशी मागणी केली आहे.
अमेरिकेच्या तिजोरीत वाढ
डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांनी राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर बऱ्यांच देशांवर कर लावला आहे. त्यामुळे अमेरिकन सरकारला दरमहा अब्जावधी डॉलर्सचा महसूल मिळत आहे. या आर्थिक वर्षात जूनपर्यंत अमेरिकेला सीमाशुल्कातून 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. यामुळे अनेरिकेन तिजोरीत चांगली भर पडली आहे. आता आगामी काळात आणखी देशांवर कर लावला जाणार आहे. त्यामुळे तिजोरीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
