अरे आधी माझ्या बायकोला वाचवा… तो जीवाच्या आकांताने ओरडला, पुरात अडकलेल्या जोडप्यांचा हा व्हिडीओ रडवून सोडतोय
मागील काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये पाऊस सुरू असल्याचे बघायला मिळतंय. आता नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांकडून पतीचे काैतुक केले जात आहे.

काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागांमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झालीये. आता याचदरम्यानचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडओमध्ये पुराच्या पाण्यात एक जोडप अडकलंय. मात्र, पती हा आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता बचावकार्यातील लोकांना पत्नीला अगोदर वाचवण्यास सांगतोय. हा व्हिडओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आल्याचे बघायला मिळाले. त्या व्यक्तीला स्वत:ची अजिबात पर्वा नाही तर त्याला पत्नीच्या जीवाची पर्वा आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, पूर आलाय. त्यानंतर एक जोडप पत्र्याच्या शेटमधून बाहेर येताना दिसतंय. पती हा आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी धडपडतोय. तितक्या तिथे बचावकार्य राबवणारे काही लोक पोहोचतात. आपल्या स्वत:ची पर्वा न करता तो ओरडून सांगतो हिला बाहेर काढा, हिची मदत करता…तिला पोहता येत नाही. यावेळी पती पत्नीला अजिबात सोडत नाही.
यासोबतच तो आपल्या पत्नीला पुरापासून वाचवत आहे तर दुसरीकडे बचावकार्यातील जवानांना पत्नीला मदत करण्यासाठी विनंती करतोय. पुढे तो म्हणतो की, माझ्या पत्नीला वाचवा..माझी चिंता अजिबात करू नका…मला पोहता येते पण तिला नाही. त्यानंतर आपण या व्हिडीओमध्ये पुढे बघू शकतो की, बचाव पथक पहिल्यांदा त्या महिलेला सुरक्षित बाहेर काढतात, त्यानंतर तिच्या पतीला. शेवटी पुराच्य पाण्यातून बाहेर आल्यावर दोघे एकमेकांना मिठी मारताना स्पष्ट दिसत आहेत. यासोबतच पत्नीला सुरक्षित बाहेर काढल्यानंतर तो व्यक्ती बचाव दलाचे आभार मानताना देखील दिसतोय.
पुरामध्ये अडकल्याने दोघे पती पत्नी घाबरल्याचे त्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. पण पत्नीला पोहता येत नसल्याने पती तिला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करताना दिला. आता हा व्हिडीओ लोकांना चांगलाच आवडताना दिसतोय. लोक मोठ्या प्रमाणात या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर कमेंट करताना देखील दिसत आहेत. चीनच्या काही भागांमध्ये खूप जास्त पाऊस झाल्याचे बघायला मिळतंय. अनेक ठिकाणी पूर देखील आलाय.
