Coronavirus in China: चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा कहर, रुग्णालयासमोर मृतदेहांचे ढीग साचल्याचे व्हिडिओ समोर

झीरो कोविड पॉलिसी राबवल्यानंतरही चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर सुरू झाल्याचे दिसत आहे. चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत असून मृतांचा आकडा लाखोंवर पोहोचल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

Coronavirus in China: चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा कहर, रुग्णालयासमोर मृतदेहांचे ढीग साचल्याचे व्हिडिओ समोर
Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Dec 20, 2022 | 7:49 PM

चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा (Corona virus) विस्फोट झाल्याचे दिसून येत आहे. सरकारने झीरो-कोविड पॉलिसीअंतर्गत (zero-covid policy)लावलेले कडक लॉकडाऊन मागे घेतल्यानंतर चीनमध्ये कोविडची प्रकरणे वाढताना दिसत आहे. एपिडेमिऑलॉजिस्ट एरिक फीगल-डिंगच्या यांच्या सांगण्यानुसार, चीनमधील मृतांचा (deaths in million)आकडा लाखावर पोहोचल्याची शक्यता आहे. चीनमधून समोर आलेले व्हिडिओ हे फिगल-डिंग यांच्या दाव्याची पुष्टी करत आहेत, कारण या व्हिडीओनुसार, रुग्णालये आणि स्मशानभूमीसमोर मृतदेहांचे ढीग जमा होत आहेत.

रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडिया युजर्सकडून शेअर करण्यात आले आहेत. याबाबत सरकारी अधिकाऱ्यांकडून कोणतीही पुष्टी मिळालेली नसली तरीही कोविडमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची नीट व्यवस्था लावण्यासाठी अतिरिक्त शिफ्टमध्ये काम करावे लागल्याचे शवागरातील कामगारांनी नमूद केले आहे.

हे सुद्धा वाचा

तर फीगल-डिंग यांच्या दाव्याला अमेरिकास्थित इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन (IHME) पाठिंबा दिला होता. चीनमध्ये कोविड -19 प्रकरणांचा स्फोट होऊ शकतो आणि 2023 साला पर्यंत 10 लाखांहून अधिक मृत्यू होऊ शकतात, असा अंदाज त्यांनी वर्तवला होता.

दरम्यान रुग्णालयांमधील वैद्यकीय कर्मचारी हे कोविड विरुद्धच्या लढाईच्या अग्रभागी असून त्यांचा सरकारच्या धोरणात बदल करण्याच्या निर्णयाचा फटका बसत आहे. डॉक्टर आणि नर्स यांना कोविड -19 विषाणूंचा संसर्ग होताना दिसत आहे. काही वैद्यकीय कर्मचार्‍यांनी सोशल मीडियावर असे पोस्ट केले आहे की, कोविडची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतरही त्यांच्यापैकी काहींना काम करत राहण्याचे आदेश मिळाले आहेत.

1. 4 अब्ज लोकसंख्या असलेल्या या देशातील रुग्णालये ओसंडून वाहत आहेत, मेडिकल्समधील औषधे संपल्याचे चित्र दिसून येत आहे. तर कोविडचा संसर्ग होऊ नये या भीतीने किंवा काही जण आधीच आजारा पडल्याने कित्येक नागरिक घरातच असून रस्त्यांवर शुकशुकाट पसरला आहे.

काय आहे चीनची प्रतिक्रिया ?

देशभरात विषाणू सैरावैरा पसरत असताना, अधिकारी ‘ताप दवाखाने’ (fever clinics) बांधण्यासाठी धडपडत आहेत. हे दवाखाने अनेकदा रुग्णालयांशी संलग्न असतात व ते चीनमध्ये कॉमन आहेत. एखाद्या सांसर्गिक रोगाचा व्यापक प्रसार रोखण्याच्या दृष्टीने हे दवाखाने डिझाइन केलेले आहेत.

शेकडो ताप दवाखाने एकमेकांशी जोडले आहेत, असे गेल्या आठवड्यात, बीजिंग, शांघाय, चेंगडू आणि वेन्झो या प्रमुख शहरांनी जाहीर केल्याचे रॉयटर्सने सरकारी WeChat खाती आणि मीडिया अहवालांचा हवाला देऊन सांगितले.

दरम्यान कोरोनाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शांघाय आणि इतर अनेक शहरांमधील शाळा पुढील महिन्यासाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत.

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.