AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : आमच्यावर युद्ध…AIR STRIKE नंतर पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं मोठं वक्तव्य

Pakistan Pm shahbaz sharif Operation Sindoor : भारताने मध्यरात्री 1.30 वाजता पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात मिसाइल हल्ला केला. 9 दहशतवादी तळ उडवून दिले. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. थेट युद्धाची भाषा त्यांनी केली आहे.

Operation Sindoor : आमच्यावर युद्ध...AIR STRIKE नंतर पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं मोठं वक्तव्य
| Updated on: May 07, 2025 | 9:32 AM
Share

भारताने एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शहबाज शरीफ यांनी X वर एक पोस्ट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. “पाकिस्तानी भूमीवर पाच ठिकाणी भ्याड हल्ले करण्यात आले. युद्ध लादणाऱ्या या कृतीच ठोस प्रत्युत्तर देण्याचा पाकिस्तानला पूर्ण अधिकार आहे आणि हे उत्तर दिलं जातय. पाकिस्तानी सैन्य आणि जनता एकजूट आहे. संपूर्ण देशाच मनोबल उंचावलेलं आहे” असं शहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे. “शत्रू राष्ट्राचा सामना कसा करायचा ते पाकिस्तानी सैन्याला माहित आहे. आम्ही कधी त्यांचे नापाक इरादे यशस्वी होऊ देणार नाही” असं शहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे. मुरीदके, बहावलपूर येथील नागरिकांना लक्ष्य केल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे. महिला, मुलांसह नागरिक शहीद झाल्याच पाकिस्तानने म्हटलं आहे. भारताच्या या आक्रमक कृतीमुळे व्यावसायिक हवाई वाहतुकीला धोका निर्माण झाल्याच पाकिस्तानने म्हटलं आहे.

“आम्ही भारताच्या या कारवाईचा निषेध करतो. त्यांनी संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय नियमांच उल्लंघन केलं आहे” असं पाकिस्तानी पीएमच म्हणणं आहे. भारताच्या या कृतीमुळे दोन अणवस्त्र संपन्न देश युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे असा पाकिस्तानचा दावा आहे. आम्ही आमची वेळ आणि ठिकाण ठरवून या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ असं पाकिस्तानच म्हणणं आहे.

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री काय म्हणाले?

“पाकिस्तान पूर्ण क्षमतेने या हल्ल्याला प्रत्युत्तर देईल. हे कर्ज तसच फेडू, जसं फेडलं पाहिजे” असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ म्हणाले. “त्यांनी दहशतवादी तळं किंवा नागरिकांना लक्ष्य केलय ते आंतरराष्ट्रीय मीडिया जाऊन पाहू शकते” असं ख्वाजा असिफ म्हणाले. या कारवाईनंतर पाकिस्तानने 48 तासांसाठी आपल्या हवाई क्षेत्रातील सर्व वाहतूक बंद केली आहे. भारताने या कारवाईद्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे, ज्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारताने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करणं, सिंधू जल कराराला स्थगित असे निर्णय घेऊन पाकिस्तानला आधीच दणका दिला होता.

Follow Us
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?