AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्रायलने ट्रम्पचे ऐकले नाही! पुन्हा इराणवर केला हल्ला, अनेक ठिकाणी मोठे स्फोट

इराणी प्रसापमाध्यमांनी दिलेल्या नुसार इस्रायलने पुन्हा एकदा इराणवर हल्ला केला आहे.

इस्रायलने ट्रम्पचे ऐकले नाही! पुन्हा इराणवर केला हल्ला, अनेक ठिकाणी मोठे स्फोट
Iran Israel war
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 24, 2025 | 6:17 PM
Share

इराणी प्रसापमाध्यमांनी दिलेल्या नुसार इस्रायलने पुन्हा एकदा इराणवर हल्ला केला आहे. मंगळवारी सायंकाळी इराणची राजधानी तेहरानच्या उत्तरेकडील भागात दोन मोठे स्फोट झाले आहे आहेत. ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केल्यानंतरही इस्रायलने इराणवरील हल्ले थांबवलेले नाहीत. त्यामुळे आता युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे.

इस्रायल आर्मी रेडिओनेहीइस्रायलच्या हवाई दलाने तेहरानजवळील रडारवर हल्ला केला अशी माहिती दिली आहे. आता अरब देशांनी दोन्ही देशांना युद्धबंदीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच ट्रम्प यांनी इस्रायलला इराणवर हल्ला न करण्यास सांगितले होते. मात्र आता इस्रायलने केलेला हा हल्ला पुन्हा एकदा युद्ध पेटवू शकतो.

ट्रम्प इस्रायलवर नाराज

युद्धविराम होण्याच्या आधी इराण आणि इस्रायलने एकमेकांवर हल्ला केला, त्यानंतर ट्रम्प म्हणाले होते की, ” दोघांनीही इतके बॉम्ब टाकले जे मी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. मी इस्रायलवर खूश नाही, पण मला खरोखर दुःख आहे.” ट्रम्प यांनी इस्रायलवर टीका केली आणि म्हटले की, ‘इस्रायल आणि इराणला ते काय करत आहेत हे माहित नाही.’

इस्रायलच्या हल्ल्यांमुळे किती नुकसान?

युद्धविरामानंतर इस्रायलने केलेल्या या हल्ल्यात अद्याप कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झालेली नाही. इराणी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार इस्रायलने तेहरानजवळील जुन्या रडारवर हल्ला केला.

युद्धविराम न मोडण्याचे आवाहन

हल्ल्याच्या काही तास आधी, अ‍ॅक्सिओसच्या एका पत्रकाराने इस्रायली अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले होते की, “डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना फोन करून इराणवर हल्ला करू नये अशी विनंती केली. मात्र नेतन्याहू यांनी ट्रम्प यांना सांगितले की इराण युद्धविरामाचे उल्लंघन करत असल्याने हल्ला करणे आवश्यक आहे.”

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता