पाकमधील तलावात उडी, डॉक्युमेंट गिळण्याचा प्रयत्न, अभिनंदन यांचा थरार

पाकमधील तलावात उडी, डॉक्युमेंट गिळण्याचा प्रयत्न, अभिनंदन यांचा थरार

इस्लामाबाद : भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची उद्याच सुटका करु, अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज पाकिस्तानच्या संसदेत केली. शांततेसाठी सदिच्छा म्हणून अभिनंदन यांची सुटका करत आहोत, असे इम्रान खान यांनी म्हटलं. उद्या सकाळी वाघा बॉर्डरवरुन भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांची पाकिस्तानकडून सुटका केली जाणार आहे. तर इम्रान खान यांच्या निर्णायाचं NSA अजित डोवाल यांच्याकडून स्वागत करण्यात आलं आहे. मोठ्या प्रयत्नांनंतर अखेर विंग कमांडर यांची सुटका होणार आहे. साऱ्या देशाची नजर या निर्णयाकडे लागून होती.

विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानने अटक केल्यापासून त्यांची सुटका व्हावी अशी मागणी संपूर्ण देश करत होता. तर सरकारनेही आमचा जवान आम्हाला परत द्या अशी मागणी पाकिस्तानकडे केली होती. त्यानंतर उद्या विंग कमांडर यांची सुटका होणार आहे. ही संपूर्ण देशासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.

भारताच्या या शूर जवानाच्या शौर्याची गाथा भारतच नाही, तर पाकिस्तानही गात आहे. पाकिस्तानच्या जमिनीवर असूनही भारतीय वायूसेनेच्या या विंग कमांडरने आपले शौर्य दाखवलं. विंग कमांडर अभिनंदन यांचे विमान पाकिस्तानात कोसळले तरीही त्यांनी हार मानली नाही. तर त्यांनी आपल्या शौर्याने पाकिस्तानी जनतेलाही आश्चर्यचकित करुन सोडले. पाकिस्तानी वृत्तपत्रांमध्ये या भारतीय वायूसेनेच्या विंग कमांडरच्या शौर्याचे किस्से सांगितले जात आहेत.

पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’च्या वृत्तानुसार, एलओसीजवळ राहणारे समाजसेवक मोहम्मद रज्जाक यांना बुधवारी सकाळी स्फोटाचा आवाज आला. जेव्हा त्यांनी बाहेर येऊन बघितले तेव्हा त्यांना तिथे एका विमानात आग लागलेली दिसून आली. तेवढ्यात त्यांनी एका पायलटला पॅराशूटने उतरताना बघितले. हे पायलट दुसरे कुणी नसून भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान होते. अभिनंदन यांनी तिथल्या तलावात उडी घेतली, ते काही कागदपत्र आणि नकाशे गिळण्याचा प्रयत्न करत होते.

त्यानंतर अभिनंदन यांनी तिथे जमा झालेल्या लोकांना विचारले की, ते भारतात आहेत की पाकिस्तानात, तेव्हा तिथल्या एका लहान मुलाने त्यांची दिशाभूल करण्यासाठी ते भारतात असल्याचं सांगितलं. ते कुठल्या ठिकाणी आहेत, असे विचारल्यावर, तो लहान मुलगा उत्तरला की तुम्ही किलामध्ये आहात. त्यानंतर अभिनंदन यांनी देशासाठी घोषणाबाजी केली. त्यांच्या या घोषणा तिथल्या पाकिस्तानी जनतेला पचल्या नाहीत आणि त्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा केला.

आता मात्र अभिनंदन यांना कळून चुकले होते की ते पाकिस्तानात आहेत. मात्र, ते घाबरले नाहीत. तिथे जमलेल्या लोकांनी अभिनंदन यांच्यावर हल्ला करण्यासाठी हातात दगड घेतले. ते पाहून अभिनंदन यांनी त्यांना घाबरवण्यासाठी हवेत गोळीबार केला. त्यानंतर पुन्हा ते त्या तवालात उतरले आणि त्यांच्याजवळील कागदपत्र नष्ट करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरुन पाकिस्तानच्या हातात काही लागू नये.

त्यानंतर पाकिस्तानच्या लष्कराने त्यांना ताब्यात घेतले. पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांना ताब्यात घेतल्याचा एक व्हिडीओही जारी केला. यामध्ये त्यांचे हात बांधलेले होते आणि त्यांच्या डोळ्यावर पट्टी होती. तसेच ते जखमीही दिसत होते. त्यानंतर पाकिस्तानकडून आणखी एक व्हिडीओ जारी करण्यात आला, यामध्ये विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानात सुरक्षित असल्याचं सांगत होते. तसेच पाकिस्तानी अधिकारी त्यांची चौकशी करतो त्यांना भारताच्या योजनेबाबत विचारतो, मात्र, विंग कमांडर अभिनंदन यांनी ‘मी तुम्हाला काहीही सांगू शकत नाही’, असे नम्रपणे त्यांना सांगितले.

 

‘आमच्या जवानाच्या केसाला धक्काही लागायला नको’, अशी ताकीद भारताने पाकिस्तानला दिली होती. त्यानंतर अभिनंदन यांची उद्या सुटका करण्यात येणार असल्याचं, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज संसदेत सांगितलं. जिनिव्हा काराराअंतर्गत भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

आमच्या पायलटला ताब्यात द्या, भारताची पाकिस्तानकडे अधिकृत मागणी

पाकिस्तान बेपत्ता पायलटच्या केसालाही धक्का लावू शकत नाही

अटी-बिटी काही नाही, पायलटला सोडा, अन्यथा खैर नाही, भारताने पाकला ठणकावलं!

भारतीय विंग कमांडरला उद्याच सोडणार, इम्रान खान बिथरला!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI