AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Air Strike : पाकिस्तानचा रात्रीच्या अंधारात एकाचवेळी किती ठिकाणी एअर स्ट्राइक? ती संघटना किती घातक?

Air Strike : पाकिस्तानी वर्तमानपत्र 'द डॉन'ने दोन दिवसांपूर्वी वृत्त दिलं होतं. या वृत्तानुसार दहशतवादी हल्ले करण्यासाठी फंड मिळतो. मसूदच्या कुटुंबाला दर महिन्याला 37 कोटी रुपये अफगाणिस्तानकडून मिळतात. पाकिस्तानात सरकार पाडणं हा 2007 मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेचा उद्देश आहे.

Air Strike : पाकिस्तानचा रात्रीच्या अंधारात एकाचवेळी किती ठिकाणी एअर स्ट्राइक? ती संघटना किती घातक?
Pakistan Air Strike
| Updated on: Feb 17, 2025 | 12:36 PM
Share

पाकिस्तानने रविवारी रात्री अफगाणिस्तानातील चार प्रांतांवर एकाचवेळी एअर स्ट्राइक केला. हा एअर स्ट्राइक दहशतवादी संघटना तेहरीक-ए-तालिबानच्या तळावर करण्यात आला. तहरीक-ए-तालिबानने पाकिस्तानला चांगलचं जेरीस आणलं आहे. तहरीक-ए-तालिबानमुळे पाकिस्तानाता हजारो निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पाकिस्तानात सरकार पाडणं हा 2007 मध्ये स्थापन झालेल्या तहरीक-ए-तालिबानचा उद्देश आहे. 2007 साली पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर बैतूल्ला महसूदने एक संघटना स्थापन केली. त्याचं नाव पुढे तहरीक-ए-तालिबान ठेवण्यात आलं. सध्या नूर वली महमूद या संघटनेचा प्रमुख आहे.

तहरीक-ए-तालिबान एक दहशतवादी संघटना आहे. पाकिस्तानातून सैन्य आणि लोकशाही सरकारला सत्तेतून बेदखल करणं हा तहरीक-ए-तालिबानचा उद्देश आहे. ऑगस्ट 2008 मध्ये या दहशतवादी संघटनेवर पाकिस्तानने बंदी घातली. मात्र, तरीही पाकिस्तानला अजूनपर्यंत या दहशतवादी संघटनेला संपवता आलेलं नाही. टीटीपीमुळे पाकिस्तानचे अफगाणिस्तानसोबत संबंध बिघडले.

आतापर्यंत किती हल्ले केले?

TTP कडे सैन्य स्ट्रक्चर आहे. ही संघटना तालिबानच्या धर्तीवर काम करते. पाकिस्तान सरकारने दिलेल्या माहितीनुसार, तहरीक-ए-तालिबानकडे 10 हजार प्रशिक्षित योद्धे आहेत. ते जिहादसाठी कटिबद्ध आहेत. तहरीक-ए-तालिबानने आतापर्यंत पाकिस्तानात 600 हल्ले घडवून आणले आहेत. लाहोरच्या चर्चमध्ये बॉम्बस्फोट, 2008 साली बार्सिलोना दहशतवादी कट, मलाला युसूफजाईवर हल्ला याच संघटनेने केला. पाकिस्तानी आर्मी तहरीक-ए-तालिबानच्या रडारवर आहे.

पाकिस्तानात किती नागरिकांचा मृत्यू?

तहरीक-ए-तालिबानचे दहशतवादी IED ब्लास्टद्वारे सैन्यासोबत लढतात. ते थेट हल्ले करुन लोकांच्या मनात दहशत निर्माण करतात. दक्षिण आशिया टेररिज्म पोर्टलनुसार, पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यांमुळे वर्ष 2024 मध्ये 600 सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

दर महिन्याला किती कोटी मिळतात?

पाकिस्तानी वर्तमानपत्र ‘द डॉन’ने दोन दिवसांपूर्वी तहरीक-ए-तालिबानबद्दल वृत्त दिलं होतं. या वृत्तानुसार तहरीक-ए-तालिबानला दहशतवादी हल्ले करण्यासाठी फंड मिळतो. टीटीपी नेता मसूदच्या कुटुंबाला दर महिन्याला 37 कोटी रुपये अफगाणिस्तानकडून मिळतात, असं या वृत्तात म्हटलं आहे. या पैशांचा उपयोग पाकिस्तानात दहशतवादी हल्ले करण्यासाठी केला जातो.

कुठे नवीन प्रशिक्षण केंद्र?

डॉनच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानच्या कुनार, नंगरहार, खोस्त आणि पक्तिका (बरमल) प्रांतात तहरीक-ए-तालिबानने नवीन प्रशिक्षण केंद्र सुरु केलय. अफगाणि युवकांना यामध्ये भरती केलं जातय. तहरीक-ए-तालिबान माजिद ब्रिगेड, बलूचिस्तान लिबरेशन आर्मी आणि तहरीक-ए-जिहाद या पाकिस्तान विरोधी संघटनांना सोबत घेऊन रणनिती आखत असतो.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.