AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel and Iran War : जगात तिसऱ्या महायुद्धाची नांदी, नेमकं काय घडतंय?

इस्रायलनं लेबनॉनमधल्या हिजबूल्लाहच्या मुख्यालयाला नेस्तनाबूत केल्यानंतर इराणनं इस्रायलवर 180 बॅलेस्टिक मिसाईल्स डागल्या आहेत. इराणनं इस्रायलवर केलेला हा इतिहासातला सर्वात मोठा हल्ला ठरलाय. त्यामुळे जगात पुन्हा एकदा तिसऱ्या महायुद्धाच्या नांदीबद्दल बोललं जातंय.

Israel and Iran War : जगात तिसऱ्या महायुद्धाची नांदी, नेमकं काय घडतंय?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Oct 02, 2024 | 10:45 PM
Share

लेबनॉनवरच्या ह्ल्लयानंतर इराणनं इस्र्यालवर आजवरचा सर्वात मोठ हल्ला केलाय. काही तासात एक-एक करत इस्रायलवर 180 बॅलेस्टिक रॉकेट्स इराणनं डागले. त्यापैकी काही रॉकेट हल्ले इस्रायलच्या एअर बॅलेस्टिक सिस्टिमनं हवेत नेस्तनाबूत केले. पण काही इराणी रॉकेट्स इस्रायलचं आर्यन डोम भेदून कोसळले. तेल अवीव शहरातल्या इस्रायली 2 मिलिट्री बेस आणि मोसादचं मुख्यालय ही ३ ठिकाणं इराणनं टार्गेट केली होती. इराणनं एकाचवेळी केलेल्या हल्ल्यांमुळे इस्रायलच्या आकाशात रॉकेटहल्ल्यांच्या धुळीचे लोट दिसत होते. सेकंदा-सेकंदाला मिसाईल्स आदळत होत्या. किती लोक मारले गेले याची अद्याप कोणताही अधिकृत आकडा आलेला नाही.

काही दिवसांपूर्वी इस्रायलनं लेबनॉनमधल्या हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्लाहला ठार केलं. त्यावर इराणनं जशास तसं उत्तर देण्याचा इशारा इस्रायलला दिला होता. आता इराणच्या या हल्ल्यानंतर पुन्हा इस्रायलनं इराणला धमकी देत त्यांच्या तेलसाठ्यांवर हल्ला करण्याची तयारी सुरु केल्याचं बोललं जातंय. तसं झाल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे भाव गडगडून जागतिक आर्थिक संकट ओढावण्याचीही शक्यता आहे.

इस्रायलनं लेबनॉनच्या बैरुत शहरामधल्या हिजबुल्लाहच्या हेडक्वॉर्टरवर बॉम्ब टाकले होते. त्यानंतर इराण देखील इस्रायलची गुप्तचर संघटना मोसादच्या हेडक्वॉर्टवर मिसाईल डागण्याचा प्रयत्न केला. मात्र माहितीनुसार तो अपयशी ठरला.

जमिनी आणि तेलसाठ्यावरचं वर्चस्व यातून शेकडो वर्षांपासून मध्यपूर्वेतले अनेक देश एकमेकांचे वैरी बनले आहेत. इस्रालयी जिथं राहतात, तिथला बहुतांश भूभाग हा पॅलेस्टिनींचा असल्याचा दावा शेजारच्या अनेक देशांचा आहे. सीरिया, लेबनॉन, इराण अनेक देश पॅलेस्टिनला पाठिंबा देतात. तर अमेरिका ती भूमी इस्रायलची असल्याचा दावा करत आलाय. याच भूभागावरुन आजवर अनेकदा युद्धं झाली आहेत.

आकाशातून अनेक रॉकेट जमिनीवर पडले. त्यांना हवेतच उद्धवस्त करण्यासाठी इस्रायलनं २ रॉकेट सोडून उत्तर दिलं. मात्र लक्ष्य चुकल्यानं इराणच्या अनेक रॉकेट्स टार्गेटवर पोहोचले. टार्गेटवर आदळताना या मिसालईनं तर थेट जमिनीत खड्डा केला. हवाईहद्दीत शत्रूची रॉकेट्स शिरताच इस्रायलमध्ये अलार्ट वाजू लागतात. हा अलार्म वाजताच लोक सुरक्षितस्थळी किंवा इस्रायलनं बनवलेल्या तळघरांमध्ये लपतात. हवेतच ड्रोन नष्ट करणाऱ्या यंत्रणेलाच इस्रायलचं आयर्न डोम म्हटलं जातं.

आयर्न डोम काम कसं करतं?

रडार युनिट, टार्गेट युनिट आणि फायर युनिट असे ३ भाग मिळून इस्रायलने आयर्न डोम बनवलं. हे तिन्ही उपकरणं इस्रायलची हवाई सुरक्षा करतात. समजा शत्रूनं इस्रायलवर रॉकेट हल्ला केला, त्याच्या काही सेकंदातच रडार युनिट त्या रॉकेटला ट्रॅक करतं. टार्गेट युनिट त्याचा वेगाचा अंदाज घेऊन लक्ष्य करतं आणि फायर युनिटमधून निघणारी मिसाईल हवेतच शत्रूच्या हल्ल्याला नष्ट करते.

गेल्यावर्षी हमास संघटनेनं पहिल्यांदा इस्रायलची आर्यन डोम यंत्रणा भेदली होती. फक्त 20 मिनिटात हमासनं जवळपास 5 हजार रॉकेट्सचे हल्ले केले. ज्यांना इस्रायलची आर्यन डोम रोखू शकली नाही. अनेक परराष्ट्र संबंधांचे जाणकार इराण-इस्रायलच्या या युद्दाला तिसऱ्या महायुद्धाची ठिगणी मानत आहेत. अमेरिकेने यात इस्रायलची बाजू घेवून प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची तयारी दाखवल्यामुळे ही ठिणगी आगीत बदलू शकते.

Follow Us
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी: धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
नीट परीक्षा आणि तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार