ट्रम्प यांच्याकडून इम्रान खानची भर पत्रकार परिषदेत खिल्ली

पाकिस्तानच्या एका पत्रकाराने जम्मू काश्मीरमध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन होत असल्याचा प्रश्न अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Trump Insult Imran Khan) यांना विचारला. यावेळी ट्रम्प यांनी इम्रान खान यांची खिल्ली उडवली आणि 'असले पत्रकार तुम्ही कुठून आणता?' असा सवालही केला.

ट्रम्प यांच्याकडून इम्रान खानची भर पत्रकार परिषदेत खिल्ली

न्यूयॉर्क : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Trump Insult Imran Khan) जातील तिथे त्यांना अपमानाचा सामना करावा लागतो. अमेरिकेतही हाच प्रकार घडला. पाकिस्तानच्या एका पत्रकाराने जम्मू काश्मीरमध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन होत असल्याचा प्रश्न अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Trump Insult Imran Khan) यांना विचारला. यावेळी ट्रम्प यांनी इम्रान खान यांची खिल्ली उडवली आणि ‘असले पत्रकार तुम्ही कुठून आणता?’ असा सवालही केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पाकिस्तानला ट्रोल केलं जातंय.

डोनाल्ड ट्रम्प आणि इम्रान खान माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी पाकिस्तानी पत्रकारांनी वारंवार काश्मीरवर प्रश्न विचारले. पण ट्रम्प त्याकडे दुर्लक्ष करत होते. वारंवार प्रश्न करणारा हा पत्रकार तुमच्या शिष्टमंडळात आलाय का, असंही ट्रम्प यांनी इम्रान खान यांना विचारलं. काश्मीरविषयी विचारणाऱ्या एका पत्रकाराच्या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले, “तुम्हाला असले पत्रकार कुठे सापडतात?”

मोठ्या काळापासून सुरु असलेला काश्मीर हा गुंतागुंतीचा प्रश्न झालाय, असं ट्रम्प म्हणाले. मला मदत करणं शक्य असेल तर नक्की मदत करेन, असंही त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे यापूर्वी एक दिवस अगोदरच ट्रम्प यांनी हॉस्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाग घेतला होता.

इम्रान खान यांच्या उपस्थितीतच ट्रम्प यांनी हॉस्टनमधील कार्यक्रमाचं कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आक्रमक वक्तव्य ऐकलं, असंही ते म्हणाले. हॉस्टनमधील हाऊडी मोदी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरोधात निर्णायक लढाई लढण्याचं आवाहन केलं होतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *