AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel on All eyes on Rafah : 7 ऑक्टोबरला तुमचे डोळे कुठे गेलेले? इस्रायलकडून ‘ऑल आइज ऑन रफाह’ला उत्तर

Israel on All eyes on Rafah : जगभरातून इस्रायलचा निषेध होतोय. 'ऑल आइज ऑन रफाह' नावाने पोस्ट व्हायरल झालीय. त्याला आता इस्रायलने प्रत्युत्तर दिलय. इस्रायलने रफाहवर एअर स्ट्राइक केला. त्यानंतर जगातील अनेक देशात संतापाची भावना आहे.

Israel on All eyes on Rafah : 7 ऑक्टोबरला तुमचे डोळे कुठे गेलेले? इस्रायलकडून 'ऑल आइज ऑन रफाह'ला उत्तर
All eyes on Rafah trend
| Updated on: May 30, 2024 | 1:06 PM
Share

जगभरातून इस्रायलला मोठा विरोध होतोय. ‘ऑल आइज ऑन रफाह’ नावाची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. जगातील नामवंत व्यक्ती, सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया युजर्सनी ही पोस्ट आपल्या इन्स्टास्टोरीमध्ये ठेवली. इस्रायलने रफाहवर एअर स्ट्राइक केला. त्यात अनेक निष्पाप, निपराध नागरिक लहान मुलं, महिला यांना आपले प्राण गमवावे लागले. हमासच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करणं हा या स्ट्राइकमागे उद्देश असल्याच इस्रायलकडून सांगण्यात आलं. पण प्रत्यक्षात निष्पाप जीव मारले गेले. म्हणून ‘ऑल आइज ऑन रफाह’ नावाने ही पोस्ट व्हायरल झालीय. जगभरातून इस्रायलच निषेध होत असताना आता इस्रायलने या पोस्टला प्रत्युत्तर दिलं आहे.

इस्रायलने एक फोटो पोस्ट करुन 7 ऑक्टोबरला तुमचे डोळे कुठे होते? असा प्रतिप्रश्न केलाय. याच दिवशी हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये घुसून नरसंहार केला होता. गर्भवती महिला, मुलं, वुद्ध यांची निदर्यतेने हत्या केली होती. म्हणून रफाहप्रती सहानुभूती व्यक्त करणाऱ्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने 7 ऑक्टोबरला तुमचे डोळे कुठे होते? असा प्रतिप्रश्न पोस्टमधून केलाय. इस्रायलच्या रफाहवरील एअर स्ट्राइकमध्ये 45 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला. AI जनरेटेड ‘ऑल आइज ऑन रफाह’ च्या पोस्टमधून इस्रायलच्या अमानवीय कृत्याकडे जगाच लक्ष वेधलं जातय.

हमासच्या हल्ल्यात किती इस्रायली ठार?

इस्रालयने पोस्ट केलेल्या फोटोमधून 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याची भीषणता दाखवण्यात आलीय. हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये घुसून केलेल्या हत्याकांडात 1160 नागरिकांनी आपले प्राण गमावले. हमासने त्या शिवाय 250 जणांना बंधक बनवलं होतं. नोव्हेंबरमध्ये करार झाला, त्यानंतर काही जणांची सुटका करण्यात आली. 99 बंधक अजूनही हमासच्या ताब्यात असल्याचा इस्रायलचा दावा आहे. काही बंधकांची हत्या सुद्धा करण्यात आली.

Follow Us
हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले
Abhijeet Dipke | हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले; नेमकं काय घडलं?
रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात...
Ramesh Mhatre | रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात हायकोर्टाचा मोठा आदेश
मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...
एकच खळबळ! मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...
पोल्ट्रीत कोंबडीने अंडी उबवली आणि त्यातून 40 आमदार बाहेर आले...
Sanjay Raut on Eknath Shinde | पोल्ट्रीत कोंबडीने अंडी उबवली आणि त्यातून 40 आमदार बाहेर आले!; राऊतांचा शिंदेंना टोला
मुंबई लोकलमध्ये महिलेला मारहाण! पुरुषाने बेल्ट काढून धमकावलं
Mumbai Local | मुंबई लोकलमध्ये महिलेला मारहाण! पुरुषाने बेल्ट काढून धमकावलं; बाकीचे प्रवासी फक्त बघतच राहिले
मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या ब्रेकफास्ट बैठकीत काय घडलं?
मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या ब्रेकफास्ट बैठकीत काय घडलं? शिवसेनेच्या 7 फुटीर खासदारांना नेमक्या काय दिल्या सूचना?
शिव्या देण्याचा अधिकार फक्त भाजपालाच आहे का? ठाकरेंचा सरकारवर घणाघात
Raj Thackeray | शिव्या देण्याचा अधिकार फक्त भाजपालाच आहे का? राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
प्रधानांच्या मुलीचा शिक्षण व्यवस्थेवर विश्वास आहे का? राज ठाकरेंनी...
Raj Thackeray | प्रधानांच्या मुलीचा शिक्षण व्यवस्थेवर विश्वास आहे का? NEET पेपरफुटीपासून परदेशी शिक्षणापर्यंत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं
नागपूरच्या डॉक्टरचा सांगलीत अपघाती मृत्यू; रुग्णालयातून घरी जाताना...
Nagpur | नागपूरच्या डॉक्टरचा सांगलीत अपघाती मृत्यू; रुग्णालयातून घरी जाताना काळाचा घाला
जिथे दिसेल तिथे कानशिलात लगावणार; हाके संतापले...
जिथे दिसेल तिथे कानशिलात लगावणार; हाके संतापले, प्रसाद लाड यांना थेट इशारा!