
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. अमेरिकेने मोठा टॅरिफ भारतावर लावला. शिवाय भारताबद्दल धक्कादायक विधाने अमेरिकेतून केली जात आहेत. यादरम्यान अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारली आहेत. हेच नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. पाकिस्तान आणि अमेरिकेची वाढती जवळीकता भारतासाठी डोकेदुखी ठरली आहे. भारत आणि अमेरिकेत व्यापार चर्चा सुरू आहे. मात्र, कोणताही ठोस निर्णय होत नाही. उलट अमेरिकेच्या मागून भारतात येत रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी काही महत्वपूर्ण करार भारतासोबत केले. अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये थेट भारतीय बाजारपेठेत प्रवेश हवा आहे. मात्र, त्यामुळे भारतातील शेतकऱ्यांना फटका बसू शकतो. यादरम्यानच पाकिस्तानचे आभार मानताना अमेरिका दिसली आहे.
थेट अमेरिकेने पाकिस्तानचे आभार मानल्याने एकच मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी शुक्रवारी दुजोरा दिला की, गाझामधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय स्थिरीकरण दलात सैन्य पाठवण्याची ऑफर पाकिस्तानने दिली आहे. ही ऑफर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 20 कलमी शांतता प्रस्तावात देण्यात आली होती. ज्याचा उद्धेश फक्त हे युद्ध थांबवणे आणि शांतता आहे.
रुबिओ म्हणाले की, आम्ही पाकिस्तानच्या प्रस्तावाबद्दल विचार करत आहोत आणि त्यांचे आभारी आहोत की, त्यांनी हा प्रस्ताव मांडला. मला वाटते की, त्यांच्याकडून पक्का शब्द घेण्यापूर्वी आपण त्यांना आणखी काही प्रश्नांची उत्तरे घेतली पाहिजेत. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाच्या अमेरिका फेऱ्या वाढल्या आहेत. काहीही करून त्यांना अमेरिकेच्या जवळ राहायचे आहे.
त्यामध्येच त्यांनी मोठा प्रस्ताव अमेरिका दिला असून अमेरिकेने त्यानंतर त्यांचे आभार मानले आहेत. अमेरिका आणि पाकिस्तानची वाढती जवळीकता नक्कीच भारतासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. पुतिन हे दोन दिवसाच्या भारत दाैऱ्यावर आल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट बघायला मिळाला. यासोबतच पुतिन डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून भारताच्या दाैऱ्यावर आले होते. पुतिन यांच्या भारत दाैऱ्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाली होती.