AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खिडक्या तोडल्या, छतावर बुलडोजर फिरवला, ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये तोडकाम सुरु, कारण काय?

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या महत्त्वाकांक्षी २५० दशलक्ष डॉलरच्या बॉलरूम प्रकल्पासाठी ईस्ट विंगचे तोडकाम सुरू झाले आहे. खासगी निधीतून साकार होणारा हा भव्य बॉलरूम सुमारे ९०,००० चौरस फूट जागेत उभारला जाईल, ज्यात ६५० लोक बसू शकतील.

खिडक्या तोडल्या, छतावर बुलडोजर फिरवला, ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये तोडकाम सुरु, कारण काय?
| Updated on: Oct 21, 2025 | 12:12 PM
Share

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमधून काही धक्कादायक फोटो सध्या समोर आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या महत्त्वाकांक्षी नवीन बॉलरूम प्रकल्पाचा एक भाग म्हणून व्हाईट हाऊसच्या ईस्ट विंगच्या काही भागाचे तोडकाम करण्याचे काम सुरु आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम कर्मचारी उत्खनन यंत्रांच्या मदतीने ईस्ट विंगचे छत, प्रवेशद्वार आणि खिडक्यांचे तोडकाम करत असल्याचे फोटो व्हायरल होत आहे. द वॉशिंग्टन पोस्ट आणि सीएनएनसह अनेक माध्यमांनी या तोडफोडीचे फोटो प्रसिद्ध केले आहेत.

२५० दशलक्ष डॉलरचा भव्य प्रकल्प

सुमारे २५० दशलक्ष डॉलर (₹२,०८५ कोटी) खर्च असलेला हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षातील व्हाईट हाऊसमधील सर्वात मोठ्या बदलांपैकी एक आहे. व्हाईट हाऊसने ‘ट्रुथ सोशल’वर याची पुष्टी केली आहे. यात त्यांनी ईस्ट विंगच्या काही भागांमध्ये उत्खनन आणि तोडफोडीचे काम सुरू आहे. हा बॉलरूम राष्ट्रपती आयोजने, राजनैतिक समारंभ आणि डिनरसाठी बनवला जात आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या १५० वर्षांपासून प्रत्येक राष्ट्राध्यक्षाचे हे स्वप्न होते. हा प्रकल्प करदात्यांवर कोणताही बोजा न टाकता, उदार देशभक्त आणि कंपन्यांच्या खासगी योगदानातून पूर्ण करण्यात येणार आहे.

कसा असेल नवीन बॉलरूम?

हा बॉलरूम सुमारे ९०,००० चौरस फूट (जवळपास ८,३०० चौरस मीटर) क्षेत्रात बनवला जात आहे. जो सध्या ईस्ट विंगच्या जागेवर स्थित आहे. व्हाईट हाऊसने जारी केलेल्या डिझाईन्समध्ये दर्शविले आहे की, या विशाल हॉलमध्ये सोनेरी आणि क्रिस्टल झुंबर, सोनेरी नक्षीकाम केलेले स्तंभ, सोन्याच्या थरांसह छताची रचना, संगमरवरी फरशी आणि तीन भिंतींवर सदर्न लॉनकडे उघडणाऱ्या खिडक्या असतील.

व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांच्या म्हणण्यानुसार, नवीन बॉलरूममध्ये जवळपास ६५० लोकांना बसण्याची सोय असेल. जी सध्याच्या ईस्ट रूमच्या क्षमतेपेक्षा तिप्पट आहे. ईस्ट रूम आतापर्यंत व्हाईट हाऊसचा सर्वात मोठा इवेंट हॉल होता.

ईस्ट विंगची पार्श्वभूमी

ईस्ट विंगचे बांधकाम १९०२ मध्ये झाले होते आणि १९४२ मध्ये राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रूझवेल्ट यांच्या कारकिर्दीत यात शेवटचे बदल करण्यात आले होते. हा भाग दीर्घकाळ ‘फर्स्ट लेडी’ (राष्ट्राध्यक्षांची पत्नी) च्या कार्यालयासाठी वापरला जात आहे. ट्रम्प यांच्या आधुनिकीकरण योजनेनुसार, या विंगला पूर्णपणे नवीन आणि आधुनिक रूप दिले जाईल.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.