AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आले आणि गोळीबार करत सुटले… किती राऊंड फायर? किती जण होते? व्हाइट हाऊस परिसरात नेमकं काय घडलं?

डोनाल्ट ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचून व्हाईट हाऊस परिसरात गोळीबार करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. आता नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर...

आले आणि गोळीबार करत सुटले… किती राऊंड फायर? किती जण होते? व्हाइट हाऊस परिसरात नेमकं काय घडलं?
Donald Trump Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 24, 2026 | 8:10 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. रविवारी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथील ‘व्हाईट हाऊस’च्या अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या परिसराबाहेर मोठा गोळीबार झाला. विशेष म्हणजे, ज्यावेळी हा गोळीबार झाला तेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व्हाईट हाऊसमध्येच उपस्थित होते. प्राथमिक अंदाजानुसार हा ट्रम्प यांच्या हत्येचा कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

अचानक २५ ते ३० गोळ्या झाडल्याचा आवाज

‘रॉयटर्स’ आणि ‘सीबीएस न्यूज’ने दिलेल्या माहितीनुसार, व्हाईट हाऊसच्या अगदी जवळ असलेल्या १७ वी स्ट्रीट आणि पेनसिल्व्हेनिया अव्हेन्यू नॉर्थवेस्ट या भागात एका संशयिताने गोळीबार सुरू केला. एका प्रत्यक्षदर्शी पत्रकाराच्या मते, घटनास्थळी अचानक २५ ते ३० गोळ्या झाडल्याचा मोठा आवाज आला. यानंतर अमेरिकेच्या ‘सीक्रेट सर्विस’च्या जवानांनी तत्काळ जवाबी कारवाई केली. जवानांनी केलेल्या गोळीबारात संशयित हल्लेखोर गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या चकमकीत एका सामान्य नागरिकालाही दुखापत झाली आहे, मात्र सुदैवाने कोणताही जवान किंवा सुरक्षा रक्षक जखमी झालेला नाही.

गोळीबाराच्या या घटनेनंतर सीक्रेट सर्विसच्या स्नाइपर पथकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून तत्काळ व्हाईट हाऊसच्या छतावर पोझिशन घेतली आणि संपूर्ण परिसरावर उंचावरून नजर ठेवली. याशिवाय, व्हाईट हाऊसचा ‘नॉर्थ लॉन’ परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला आणि तिथे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह सशस्त्र जवान तैनात करण्यात आले. बाहेरील पत्रकारांना तातडीने आत बोलावून ‘प्रेस ब्रीफिंग रूम’ बंद करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.

सोशल मीडियाद्वारे ‘एफबीआय’चे संचालकांची माहिती

‘एफबीआय’चे संचालक काश पटेल यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या गोळीबाराच्या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, एफबीआयचे एक विशेष पथक घटनास्थळी पोहोचले असून ते सीक्रेट सर्विसला तपासात मदत करत आहेत. हा गोळीबार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चालून आलेला थेट हल्ला होता का, या दिशेने सध्या कसून तपास सुरू असून तपासातील नवीन माहिती लवकरच जनतेसमोर मांडली जाईल, असेही पटेल यांनी सांगितले आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ