कोण सेंट्रीफ्यूज एक्सपर्ट, तर कोण रिएक्टर डिझायनर..कोण आहेत इस्रायली हल्ल्यात ठार झालेले 6 इराणी न्यूक्लियर शास्रज्ञ?
इस्रायलने इराणवर मोठा हल्ला केला आहे. त्यात सहा अणूशास्त्रज्ञांचा मृत्यू झाला आहे. यामुळे इराणच्या अणुकार्यक्रमाचे गंभीर नुकसान झाले असून इराणचा अणू कार्यक्रम दीड दोन वर्षे मागे गेला आहे.

इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात 6 अणू शास्रज्ञ ठार झाले आहेत. यात अब्दुल हमीद मिनोउचहर, अहमदरझा झोल्फाघारी, सैय्यद अमीरहोसेन फेक्ही, मोत्लाबीज़ादेह, मोहम्मद मेहदी तहरेनची आणि फेरेदून अब्बासी ठार झाले आहेत. हे इराणच्या आण्विक कार्यक्रमाचे प्रमुख होते. त्यांच्या मृत्यूने इराणचे इस्लामिक आण्विक महासत्ता होण्याचे स्वप्न एक ते दोन वर्षे मागे पडल्याचे म्हटले जात आहे.
इस्रायलने इराणच्या आण्विक कार्यक्रमाला उद्धवस्थ करुन टाकले आहे. इराणच्या नटांझ आण्विक संयंत्र आणि अन्य लष्करी केंद्रांना या हल्ल्या टार्गेट करण्यात आले आहे. ज्यात किमान सहा अणूशास्रज्ञ ठार झाले आहेत. या शास्रज्ञांच्या मृत्यूने अणू कार्यक्रमाला मोठा धक्का बसला आहे. या शास्रज्ञात अब्दुल हमीद मिनोउचहर, अहमदरज़ा ज़ोल्फ़ाघारी, सैयद अमीरहोसेन फेक्ही, मोत्लाबीज़ादेह, मोहम्मद मेहदी तहरेनची आणि फेरेदून अब्बासी यांच्या नावाचा समावेश आहे.
इस्रायलने 13 जून 2025 रोजी नतांज आणि तेहरान येथील अनेक लष्करी केंद्रांवर हल्ला केला आहे, लष्करी केंद्र आणि आण्विक सुविधांना लक्ष्य केले होते.या हल्ल्यात अनेक वरिष्ठ अधिकारी आणि संशोधक ठार झाले आहेत.ज्यात सहा अणू वैज्ञानिकांचा देखील समावेश आहे.इराणने याला इस्रायलचा अतिरेकी हल्ला असे म्हटले असून याचा बदला घेण्याची धमकी दिली आहे.
ठार झालेले इराणी न्युक्लिअर सांयटिस्ट
1. अब्दुल हमीद मिनोउचहर (Abdolhamid Minouchehr)
रोल काय : इराणच्या तेहरान येथील शहीद बेहेश्ती युनिव्हर्सिटीत अब्दुल हमीद मिनोउचहर अणूभौतिकी विषयाचे प्रोफेसर होते. ते यूरेनियम संवर्धन प्रक्रियेचे विशेषज्ञ होते. नतांज संयंत्रात सेंट्रीफ्यूज तंत्राच्या विकास प्रक्रीयेत त्यांचे मोठे योगदान होते.
महत्व: त्यांच्या संशोधनाने इराणला 20% शुद्ध यूरेनियम संशोधन करण्यात यश आले, जे अणू ऊर्जा आणि संशयित अणू बॉम्बचा आधार होता.
विशेष तज्ज्ञ : ते रिएक्टर डिझाईन आणि अणू इंधन उत्पादनात माहीर होते.
2. अहमदरझा झोल्फाघारी (Ahmadreza Zolfaghari)
रोल काय : अहमदरझा देखील शहीद बेहेश्ती युनिव्हर्सिटीत अणू इंजिनिअरिंगचे प्रोफेसर होते. ते नतांज आणि फोर्डो संयंत्रात सेंट्रीफ्यूजचे देखभाल आणि प्रगतीवर काम करीत होते.
महत्व: त्यांच्या कार्यामुळे इराणची सेंट्रीफ्यूज क्षमता दुप्पट झाली, ज्यामुळे संवर्धनाचा वेग वाढला
विशेष तज्ज्ञ: ते उन्नत सेंट्रीफ्यूज (IR-8)च्या रचनेत सामील होते. ज्यामुळे 60% शुद्ध यूरेनियम संवर्धन करण्यात यश आले होते.
3. सैयद अमीरहोसेन फेक्ही (Seyed Amirhossein Feqhi)
रोल काय : सैयद अमीरहोसेन देखील शहीद बेहेश्ती युनिव्हर्सिटीत शिकत होते. अणू रिएक्टरच्या रचनेवर संशोधन करीत होते.
महत्व : त्यांनी अराक जड पाणी रिएक्टरला विकसित करण्यात योगदान दिले होते. त्याचा वापर प्लूटोनियम उत्पादनासाठी होऊ शकतो.
विशेष तज्ज्ञ: ते देखील रिएक्टर सुरक्षा आणि आण्विक इंधन संम्मलनात तज्ज्ञ होते.
4. मोत्लाबीझादेह (Motlabizadeh)
रोल काय : मोत्लाबीझादेह इराणचे अणू ऊर्जा संघटनेत (AEOI) वरिष्ठ इंजिनिअर होते. मिसाईल तंत्रज्ञानाशी आण्विक अस्रे आणि संशोधनात सामील होते.
महत्व: त्यांनी अण्वस्रांसाठी आवश्यक ट्रिगर तंत्र विकासात काम केले होते, जे इराणला “थ्रेशहोल्ड” स्थिती (अण्वस्र तयार करण्याच्या सीमेपर्यंत ) आणले होते.
विशेष तज्ज्ञ: ते मिसाईल आणि आण्विक औद्योगिक संयोजन माहिर होते.
5. मोहम्मद मेहदी तहरेनची ( Mohammad Mehdi Tehranchi )
रोल काय : मोहम्मद मेहदी तहरेनची हे इस्लामिक आझाद युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष होते. भौतिकीशास्रात त्यांनी पीएचडी केली होती.ते अणू संशोधनाला शिक्षणक्षेत्रास जोडण्यासाठी तज्ज्ञ होते.
महत्व: त्यांनी तरुण वैज्ञानिकांना प्रशिक्षित केले होते. इराणच्या आण्विक कार्यक्रमाला त्यांना तांत्रिक रुपाने मदत केली होती.
विशेष तज्ज्ञ: त्यांना अणू रिएक्टरसाठी थर्मल डिझाईनमध्ये रस होता.
6. फेरेदून अब्बासी (Fereydoun Abbasi)
रोल काय : फेरेदून अब्बासी इराणच्या अणू ऊर्जा संघटनाचे (AEOI) माजी प्रमुख होते. शहीद बेहेश्ती युनिव्हर्सिटीत ते प्रोफेसर होते.
महत्व: त्यांना इराणच्या अणू कार्यक्रमाचे वास्तूकार मानले जाते. 2010 मध्ये ते एका बॉम्बहल्ल्यात ठार झाले होते.परंतू या हल्ल्यात ते ठार झाले.