कोण आहेत मोजतबा खामेनेई ? आयातुल्लानंतर इराणची सर्वोच्च ताकदवान व्यक्ती, ट्रम्प यांच्यासाठी मोठा धोका ?

CIAच्या एका माजी अधिकाऱ्याने दावा केला आहे की इराणवर मिलिट्री एक्शनची तयारी केली जात आहे. प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहराणवरील हल्ल्याच्या फाईलवर सही देखील केली आहे.मात्र, ट्रम्प यांचा खरा शत्रू खामेनेई यांचा वारसदार आहे.

कोण आहेत मोजतबा खामेनेई ? आयातुल्लानंतर इराणची सर्वोच्च ताकदवान व्यक्ती, ट्रम्प यांच्यासाठी मोठा धोका ?
Mojtaba Khamenei
| Updated on: Feb 22, 2026 | 9:05 PM

अमेरिका आणि इराणच्या दरम्यान तणावात वाढ होत आहे. एका माजी सीआयएच्या अधिकाऱ्याच्या दुजोऱ्याने अमेरिकन मीडियाने वृत्त दिले आहे. पुढच्या आठवड्यापासून ट्रम्प प्रशासनाने इराणवर हल्ला करण्याच्या बेतात आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या फाईलवर सही देखील केली आहे. ज्यानूसार तेहरानला नष्ट करण्याची योजना तयार केली आहे. या फाईलमध्ये एका अशा व्यक्तीचे नाव आहे,जी व्यक्ती खामेनेई यांच्यानंतर ट्रम्पसाठी मोठा धोका मानले जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार पेंटागनने इराणच्या विरोधात कारवाईसाठी अनेक पर्याय समोर ठेवले आहेत. ज्यात एक पर्याय आयातुल्ला अली खामेनेई आणि त्यांचा मुलगा मोजतबा खामेनेई ( Mojtaba Khamenei )  यांना समाप्त करण्याची योजना आहे. मोजतबा इराणे दुसरे सर्वात मोठे ताकदवान नेते मानले जात आहेत. खामेनेई यांच्या नंतर त्यांना देशाचे सर्वोच्च नेते म्हणून मानले जात आहे.

कोण आहेत मोजतबा खामेनेई

ट्रम्प प्रशासन ही गोष्ट समजून चुकले आहे की जर खामेनेई यांना जरी संपवले तरी ते इराणवर कब्जा करु शकणार नाहीत. त्याचे मोठे कारण मोजतबा खामेनेई आहेत. कारण मोजतबा हे इराणची सर्वात आक्रमक सैन्य दल रिव्होल्यूशनरी गार्ड्स (IRGC)ला कंट्रोल करतात. याशिवाय देशाची सर्वात मोठी आर्मी बसीज मिलिशिया देखील त्यांच्याच नियंत्रणाखाली आहे. त्यांच्या एका इशाऱ्यावर इराणचे ९ लाख सैनिक मरण्यास तयार असते.

पडद्यामागून राहून काम करणे पसंद

अधिकृतपणे हे दोन्ही सैन्यबल देशाच्या सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांना रिपोर्ट करतात. परंतू वास्तविक त्यांचे नियंत्रण त्यांचे पुत्र मोजतबा यांच्याकडे आहे. मोजतबा हे पडद्यामागून राहून काम करणे पसंद करत असतात. बातम्यानुसार इराणी सैन्यातील टॉप अधिकाऱ्यांच्या नियुक्तीपासून ते धोरणात्मक तयारी असो की, कोणताही निर्णय मोजतबा खामेनई यांच्या मर्जीविना होत नाही.

अमेरिकेच्या अटी मानणे म्हणजे आत्मसमर्पणच !

मोजतबा यांचा विचार करण्याची पद्धत त्याचे पिताश्री आयतुल्ला खामेनेई यांच्यासारखी आहे. त्यांचे मानणे आहे की अमेरिकेच्या मागण्यांना मान्य करणे म्हणजे आत्मसमर्पण करण्यासारखे आहे. कारण अमेरिकेच्या अटींनुसार त्यांना युरेनियम इनरिचमेंटना संपवणे आणि बॅलेस्टिक क्षमतांना कमी करणे, शेजारील देशातील उपस्थित सशस्र गटांना समर्थन करण्यापासून रोखणे यासाठी जाचक अटी आहेत. खामेनेई यांचे म्हणणे आहे की या गोष्टींना त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नाही. या गोष्टी इराणच्या व्यवस्थेचा अविभाज्य घटक असून त्याच्या सुरक्षेसाठी महत्वाच्या आहेत.

इराणच्या सुरक्षेचा कणा

इराणवर निर्बंध असतानाही या गोष्टी त्यांनी मिळवल्या आहेत. इराणने सहयोगी सशस्र समुहाचे नेटवर्क देखील याच साठी तयार केले आहे की इराणशी केव्हा कोणी युद्ध करेल त्यावेळी ते मदतीला धावतील. IRGC मध्ये दोन लाख आणि बसीज मिलिशियात सहा ते सात लाख सैनिक आहेत. ही तेच सैन्य आहे जे इराणच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा कणा मानले जाते. याच सैन्यदलाच्या ताकदीच्या बळावर डोनाल्ड ट्रम्प यांनी इतक्या धमक्या देऊन इराण झुकायला तयार नाही. आयातुल्ला खामेनेई यांनी धमकीच दिली आहे की अमेरिकेने हल्ल्याचा प्रयत्न जरी केला तरी तो अमेरिकेला जन्माची अद्दल घडवण्यास तयार आहे.