AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अतिरेक्यांचा मास्टरमाइंड, लादेनचा म्होरक्या, कोण होता अयमान अल जवाहिरी?

9/11 च्या दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्याबाबत बोलताना जो बायडन (Joe Biden) म्हणाले की, जवाहिरीच्या खात्म्याने अल कायदाचे नेटवर्क देखील कमकुवत होईल.

अतिरेक्यांचा मास्टरमाइंड, लादेनचा म्होरक्या, कोण होता अयमान अल जवाहिरी?
अमेरिकेकडून अतिरेकी आयमान अल जवाहिरीचा खात्मा Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 02, 2022 | 7:54 AM
Share

अमेरिकेने दहशतवादाला सर्वात मोठा धक्का दिला असून सीआयएने अल-कायदाचा म्होरक्या अल-जवाहिरीला (Who was Ayman al-Zawahiri) ड्रोन हल्ल्यात ठार मारले आहे (Drone attack). खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अल जवाहिरीच्या मृत्यूची बातमी संपूर्ण जगाला दिली आहे. 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्याबाबत बोलताना जो बायडन (Joe Biden) म्हणाले की, जवाहिरीच्या खात्म्याने अल कायदाचे नेटवर्क देखील कमकुवत होईल. अल-जवाहिरीला ठार मारण्याच्या या यशस्वी कारवाईत कुठल्याही प्रकारे नागरिकांची जीवितहानी झाली नसल्याचा अमेरिकेचा दावा आहे.

अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात जवाहिरीला केले ठार

ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल कायदा या दहशतवादी संघटनेला हा सर्वात मोठा धक्का आहे. अमेरिकेच्या सीआयएने अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये अल-जवाहिरीला लक्ष्य करत ड्रोन हल्ला केला. अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी मोहिमेतील हे अमेरिकेचे सर्वात मोठे यश होते. अल-जवाहिरीच्या डोक्यावर अमेरिकेने $25 दशलक्ष म्हणजेच सुमारे दोन अब्ज रुपयांची घोषणा केली होती. बिन लादेनला अमेरिकेने 11 वर्षांपूर्वी पाकिस्तानातील अबोटाबाद येथे केलेल्या कारवाईत ठार केले होते.

अल-जवाहिरीचा जन्म 1957 मध्ये झाला

अयमान अल-जवाहिरीचा जन्म 19 जून 1957 रोजी इजिप्तमधील एका उच्चभ्रू कुटुंबात झाला. व्यवसायाने सर्जन, अल-जवाहिरीला अरबी आणि फ्रेंच भाषा अवगत होती. जवाहिरीने इजिप्शियन इस्लामिक जिहाद (EIJ) स्थापन केला. 1970 च्या दशकात इजिप्तमधील धर्मनिरपेक्ष राजवटीला विरोध करणारी ही अतिरेकी संघटना होती.  इस्लामिक राजवट कायम ठेवणे हा त्यांचा हेतू होता.

जवाहिरी बिन लादेनशी कसा जोडला गेला?

अल-जवाहिरीने ओसामा बिन लादेनची सौदी अरेबियात भेट घेतली होती. ओसामा बिन लादेन 1985 मध्ये पेशावर, पाकिस्तानमध्ये अल कायदाला प्रोत्साहन देण्यासाठी गेला होता. यावेळी अल जवाहिरीही पेशावरमध्ये होता आणि इथूनच या दोनीही दहशतवाद्यांचे नाते घट्ट होऊ लागले.

लादेन-जवाहिरीने जगाला धक्का देण्याचा कट रचला

2001 मध्ये, अल-जवाहिरीने EIJ चे अल-कायदामध्ये विलीनीकरण केले. यानंतर दोन्ही दहशतवाद्यांनी मिळून जगाला हादरवण्याचा कट रचला. अमेरिकेच्या हल्ल्यात ओसामा बिन लादेनचा मृत्यू झाल्यानंतर जवाहिरीने संघटनेचे नेतृत्व हाती घेतले आणि 2011 मध्ये तो अल-कायदाचा प्रमुख बनला. 9/11 च्या हल्ल्यापासून अमेरिका अल-जवाहिरीचा शोध घेत होती.

9/11 च्या हल्ल्यात अल-जवाहिरीने मदत केली होती

इजिप्शियन डॉक्टर आणि सर्जन अल-जवाहिरीने 11 सप्टेंबर 2001 रोजी युनायटेड स्टेट्समध्ये झालेल्या हल्ल्यात चार विमानांचे अपहरण करण्यात मदत केली होती. यामध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन्ही टॉवरवर 2 विमाने आदळली, त्यानंतर अमेरिकेसह संपूर्ण जगात हाहाकार माजला. तिसरे विमान अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालय पेंटागॉनला धडकले. चौथे विमान शँकविले येथील शेतात कोसळले. या सर्वात मोठ्या दहशतवादी कारवायात सुमारे तीन हजार लोक मारले गेले. सप्टेंबर 2001 च्या हल्ल्यांव्यतिरिक्त, अल-जवाहिरीवर 12 ऑक्टोबर 2000 रोजी येमेनमध्ये यूएसएस कोल या अमेरिकन जहाजावर हल्ला केल्याचा आरोप आहे. यामध्ये अल कायदाच्या दुसऱ्या वरिष्ठ कमांडरचा समावेश होता. या हल्ल्यांमध्ये 17 यूएस मरीन मारले गेले आणि 30 जखमी झाले.

शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.