Marathi News International Why Donald Trump is desperately chasing the Nobel Peace Prize again in 2025 know five reason
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळवण्याची इतकी घाई का? जाणून घ्या त्या मागची पाच कारणं
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर नोबेल शांतता पुरस्काराच्या मागे हात धुवून पडले आहेत. त्यांना नोबेल पुरस्काराची इतकी हाव लागली आहे की मागचा पुढचा कसलाही विचार करत नाहीत. वारंवार या विषयी बोलून ते नॉर्वेवर दबाव आणत आहेत. कारण इथली संसद या पुरस्कारासाठी नावे ठरवणारी समिती स्थापन करते.
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळवण्याची इतकी घाई का? जाणून घ्या त्या मागची पाच कारणं
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्यासाठी काहीही करण्यास तयार आहेत. वारंवार त्याच्या बोलण्यातून नोबेल पुरस्काराबाबत चर्चा होत आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प नोबेल शांतता पुरस्काराच्या मागे का लागलेत? तेच अनेकांना कळत नाही. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासारखं त्यांना आपली छाप सोडायची आहे. ओबामा यांच्यासारखेच ते दोनदा राष्ट्राध्यक्ष झाले. आता त्यांना नोबेल पुरस्कारची आस लागली आहे. यासाठी त्यांना पाकिस्तान आणि इस्राईल या देशांचा पाठिंबा मिळाला आहे. इतकंच काय तर मिडिया रिपोर्टनुसार, ट्रम्प यांनी नॉर्वेच्या अर्थमत्र्यांना फोन करून नोबेल शांतता पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे काही कारण असल्याशिवाय ट्रम्प इतके टोकाचे प्रयत्न करणआर नाही. ट्रम्प हा पुरस्कार मिळण्यासाठी उत्सुक का आहेत ते जाणून घेऊयात
ही पाच कारण आहे कारणीभूत
अमेरिकेच्या मागच्या चार राष्ट्राध्यक्षांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आहे. बराक ओबामा, टी. रुझवेल्ट, वुड्रो विल्सन आणि जिमी कार्टर यांच्या नावाचा समावेश आहे. आता डोनाल्ड ट्र्म्प यांनाही या पंगतीत बसायचं आहे. त्यामुळे ते काहीही करण्यास तयार आहे. त्यांना पुरस्कार मिळावा यासाठी पाकिस्तान आणि इस्राईलचा पाठिंबा मिळाला आहे.
डोनाल्ड ट्रम्प आणि बराक ओबामा यांच्या एक छुपी स्पर्धा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी तसंच होण्याच्या सर्वोतोपरी प्रयत्न केला. दोनदा राष्ट्राध्यक्ष होत त्यांच्या पंगतीत बसले. आता ट्रम्प यांना नोबेल पुरस्काराची ओढ लागली आहे. त्या काळात अमेरिका अनेक युद्धात गुंतलेली असताना ओबामांना पुरस्कार मिळाला. तर आपल्याही हा पुरस्कार 10 सेकंदात मिळाला पाहीजे, असं ट्रम्प यांचं मत आहे.
पाकिस्तान, कंबोडिया आणि इस्राईल हे देश स्वार्थापोटी ट्रम्प यांना महान घोषित करण्यात गुंतले आहेत. अमेरिका इस्राईलला सर्वोतोपरी मदत करत आहे. त्यामुळे गाझा पट्टीवर हल्ले करण्यास समर्थन मिळत आहे. इतकंच काय तर गाझामधील ओलिसांना सोडण्यास अमेरिकेची मदत झाली होती. त्यामुळे ट्रम्प यांना शांतीदूत करण्यासाठी खटाटोप सुरु आहे.
ट्रम्प यांनी शांतता पुरस्कारासाठी दर महिन्याला सरासरी एक शांतता करार किंवा युद्धबंदी घडवून आणली आहे. भारत पाकिस्तान युद्ध रोखल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला आहे. पण हा दावा भारताने वारंवार फेटाळून लावला आहे. असं असूनही ट्रम्प यांनी हा उल्लेख वारंवार केला आहे.
ट्रम्प हे स्वत:च्या प्रेमात पडले आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या स्तुतीशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. नोबेल पुरस्काराबाबात अजून काही स्पष्ट नसताना शांतीदूत म्हणून स्वत:ला जगासमोर प्रदर्शित करत आहेत. सोशल मीडियावर त्यांचा मी पणा दिसून येतो. काँगो रवांडा करार, भारत पाकिस्तान युद्धजन्य स्थिती, इजिप्त इथिओपिया, सर्बिया कोसोवो असे अनेक शांतता करार केल्याचा दावा सोशल मीडियावर त्यांनी केला आहे.
नोबेल पुरस्काराची प्रक्रिया काय?
नोबेल पुरस्कारासाठी दरवर्षी 1 फेब्रुवारीला नामांकन केलं जाते.
देशांचे राष्ट्राध्यक्ष, नोबेल शांतता पुरस्कार विजेता यासाठी नाव सूचवतात.
यासह विश्वविद्यालयातील प्राध्यापक, संसद सदस्य आणि न्यायाधीश यांचाही समावेश असतो.
सदर व्यक्ती नोबेल शांतता पुरस्कारासाठी मानकरी का आहे ते सांगावं लागतं.
दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात नोबेल पुरस्कारची घोषणा केली जाते.
10 डिसेंबरला नॉर्वेच्या ओस्वोमध्ये नोबेल पुरस्काराचं वितरण केलं जातं.