AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या 100 रुपयाची पुतिन-ट्रम्प यांच्या देशात काय किंमत? अमेरिका-रशियात किती होतात?

जगभरात त्या त्या देशांचं स्वतंत्र चलन आहे. पण हे चलन जेव्हा एका देशातून दुसऱ्या देशात जातं तेव्हा त्याची किंमत बदलते. अमेरिकेचा एक डॉलरची किंमत भारतात 87.65 रुपये आहे. म्हणजे आपल्या रुपयापेक्षा डॉलर किती वरचढ आहे हे कळतं. चला जाणून घेऊयात सविस्तर

भारताच्या 100 रुपयाची पुतिन-ट्रम्प यांच्या देशात काय किंमत? अमेरिका-रशियात किती होतात?
भारताच्या 100 रुपयाची पुतिन-ट्रम्प यांच्या देशात काय किंमत? अमेरिका-रशियात किती होतात?Image Credit source: TV9 Network
| Updated on: Aug 16, 2025 | 4:14 PM
Share

देशाची आर्थिक स्थिती आयत निर्यातीवर अवलंबून असते. पण अमेरिकेने गेल्या काही महिन्यात टॅरिफ वॉरचा धडाका लावला आहे. अमेरिकेने अनेक देशांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. भारतालाही या टॅरिफ वॉरचा फटका बसला आहे. कारण अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. त्यामुळे भारताच्या निर्यातीवर थेट परिणाम होईल. त्यामुळे भारतीय वस्तूंची मागणी अमेरिकेत घटेल असा अंदाज आहे. भारत रशियाकडून तेल आयात करतो म्हणून हा टॅरिफ लादला आहे, असं ट्रम्प म्हणाले होते. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्या भेटीकडे लक्ष लागून होते. ही बैठक अलास्का येथे पार पडली. पण या बैठकीतून ठोसं असं काही निघालं नाही. त्यामुळे भारताला टॅरिफचा फटका सहन करावा लागणार आहे. कदाचित टॅरिफ आणखी वाढवलं जाऊ शकतं. कारण रशियावर दबाव वाढवण्यासाठी भारताची कोंडी केली जाणार, असं ट्रम्प यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. असं असताना भारताचे 100 रुपये अमेरिका आणि रशियात किती होतात? ते जाणून घेऊयात…

भारताच्या 100 रुपयांची रशियात काय किंमत?

रशियाच्या चलनाला रशियन रूबल म्हंटलं जातं. तसं की आपल्या चलनाला रुपया म्हंटलं गेलं आहे. रशियन चलनासाठी रुबलचा शॉर्टफॉर्म हा RUB असा आहे. सांकेतिक स्वरुपात ₽ असं लिहिलेलं असतं. तर भारतीय चलनावर INR असं लिहिलेलं असतं. सांकेतिक चिन्ह म्हणून ₹ असं लिहिलेलं असतं. भारताचा एक रुपया रशियन 0.91 रशियन रुबल आहे. म्हणजेच भारताचे 100 रुपये रशियात 91.20 रशियन रुबल होतात. यामुळे या दोन्ही देशातील चलनात 8.80 रुपयांचा फरक आहे. हा फरक स्थिती वाढत किंवा कमी होत असतो.

भारताच्या 100 रुपयांची अमेरिकेत काय किंमत?

अमेरिकेचा डॉलर हा जगातील श्रीमंत चलनापैकी एक आहे. अमेरिकेने 2 एप्रिल 1792 मध्ये डॉलरला चलन म्हणून मान्यता दिली. यापूर्वी अमेरिकेत देवाणघेवाणीसाठी सोनं किंवा चांदीचा वापर केला जात होता. पण अमेरिका जागतिक महासत्ता असून तिथल्या चलनाच्या किमतीकडे कायम लक्ष असते. आता भारताचे 100 रुपये अमेरिकेत किती होतात याबाबत जाणून घेऊयात. भारताचे 100 रुपये अमेरिकेतली 1.14 डॉलर आहे. त्यामुळे अमेरिका किती पुढे आहे याचा अंदाज येतो. तिथल्या 100 डॉलरसाठी भारताला 8765 रुपये खर्च करावे लागतील.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा