AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Hamas war : हमासला हरविणे बलाढ्य इस्रायलला का जड जात आहे ? काय आहे कारण ?

इस्रायल गाझापट्टी आणि आजूबाजूच्या प्रांतातून हालचाली करणाऱ्या हमास संघटनेशी युद्ध करीत आहे. हमास ही जरी एक अतिरेकी संघटना असली तरी आता ती पहिल्यासारखी राहीलेली नाही. तिच्याकडे देखील आधुनिक शस्रे आहेत.

Israel-Hamas war : हमासला हरविणे बलाढ्य इस्रायलला का जड जात आहे ? काय आहे कारण ?
israel tankImage Credit source: socialmedia
| Updated on: Nov 12, 2023 | 2:46 PM
Share

मुंबई | 12 नोव्हेंबर 2023 : इस्रायल आणि हमास दरम्यान सुरु असलेल्या युद्धाला जवळपास एक महिना होऊन गेला आहे. परंतू इस्रायलला हमासला संपविण्याच्या आपल्या मोहिमेला अद्याप काही यश आलेले नाही. याच इस्रायलने साल 1967 मध्ये केवळ 6 दिवसात तीन अरब देशांच्या सैन्याला अस्मान दाखविले होते. इजिप्त, सिरिया आणि जॉर्डनच्या सैन्याचा इस्रायलने पाडाव केला होता. यास युद्धास सहा दिवसांची लढाई म्हणून ओळखले जाते. त्यामुळे इस्रायलसारखा अत्याधुनिक शस्रास्रे आणि आर्थिक संपन्न देश हमास सारख्या संघटनेला हरवू शकलेला याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

इस्रायल गाझापट्टी आणि आजूबाजूच्या प्रांतातून हालचाली करणाऱ्या हमास संघटनेशी युद्ध करीत आहे. हमास ही जरी एक अतिरेकी संघटना असली तरी आता ती पहिल्यासारखी राहीलेली नाही. तिच्याकडे देखील आधुनिक शस्रे आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी हमासने इस्रायलच्यआ दक्षिण बंदराचे शहर इलियट आणि उत्तर बंदराचे शहर हायफावर लांबपल्ल्याच्या रॉकेटचा मारा केला होता. हमासने गाझापट्टीतील रहिवाशांना मदत करण्याऐवजी हत्यारे तयार केली आणि युद्ध सामुग्री जमा केली आहे. जगापासून ही शस्रसामुग्री लपविली होती. हमासचे स्वप्न गेल्या बऱ्याच दिवसांपासून क्षेत्रीय आणि जागतिक पातळीवर इस्रायलच्या आसपासच्या युद्धाला उपयोगी पडतील असा ठीकाणांना मजबूत बनविण्याचे राहीले आहे. इस्रायलचे सैन्य सध्या गाझापट्टीत उतरले आहे. परंतू इस्रायलच्या सैन्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गाझातील भुयारी मार्गांची अडचण

गाझापट्टीतील भुयारी मार्ग, मशिदी आणि घरातून हमासचे लोक लपून छपून हल्ले करीत आहे. त्यांच्याकडे अनेक प्रकारची अत्याधुनिक शस्रे आहेत. त्यामुळे इस्रायली सैन्याला प्राणाची आहुती द्यावी लागू शकते. अशा वातावरणात हमासच्या विरोधात युद्ध जिंकण्याचे अवघड शिवधनुष्य इस्रायलला पेलावे लागत आहे.

रॉकेट लॉन्चरने हल्ला

एक काळ असा होता जेव्हा पॅलेस्टिनी जनता इस्रायल सैन्यावर दगड फेकून मारायची. परंतू आता काळ बदलला आहे. आता दगड माऱ्यांकडे ऑटोमेटिक पिस्टल, रायफल, गन अशी हत्यारे आली आहे. हे लोक रॉकेट लॉन्चर आणि ग्रेनेड आदी शस्रांनी सज्ज आहेत. गाझापट्टी खूपच जास्त घनतेचे क्षेत्र आहे. हमास सहज लपून छपून इस्रायली सैन्यावर हल्ला करीत त्यांचे बळी घेत आहे.

हमासने एण्टी टॅंक युनिट तैनात केले

इस्रायलच्या गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या बातमीनूसार आता इस्रायलला आता यावेळी अनेक आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. हमास आता सामान्य गॅंग नाही. तर मोठ्या प्रमाणावर शस्रास्रांनी सुसज्ज आहे. हमासने मोठ्या प्रमाणावर एण्टी टॅंक युनिटला तैनात करणे इस्रायलसाठी चिंताजनक आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.