
कतार एअरफोर्सच्या जुन्या लढाऊ विमानांना अचानक आंतरराष्ट्रीय मागणी वाढली आहे. भारताने एकीकडे कतारकडून मिराज-२००० जेट्स खरेदी करण्यात रुची दाखवली आहे. तर भारताचा शत्रू असलेला तुर्की देखील कतारकडूनच युरोफायटर टायफून विमाने खरेदी करण्याची इच्छा बाळगून आहे. खास म्हणजे भारत आणि तुर्की दोन्ही देशात अलिकडे संबंध तणावपूर्ण बनले आहेत, तरीही दोन्हीही देश कतारने वापरलेले जेट खरेदी करण्यासाठी रांगेत आहेत.
युरेशियन टाईम्सच्या ७ ऑक्टोबरच्या बातमीनुसार असा दावा केला आहे की तुर्की कतारच्या सोबत सेकंड हँड युरोफायटर टायफून जेट्स खरेदी करण्याच्या करारासंदर्भात विचार करत आहे.या संदर्भात बोलणी अद्याप सुरु आहेत. आशा आहे की ही डील लवकरच अंतिम होऊ शकते. मात्र दोन्ही देशांच्या सरकारने यासंदर्भात कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही.
तुर्कीचे संरक्षण मंत्री यासर गुलर आणि वायू सेना कमांडर जनरल जिआ सेमल कादिओग्लू यांनी अलिकडेच कतारची राजधानी दोहाचा दौरा केला होता. असे म्हटले जात आहे की या दौऱ्याचा उद्देश्य कतारशी १० ते १५ ट्रँच 3A युरोफायटर टायफून विमानाच्या सौद्यावर चर्चा करणे हा होता. कतार सध्या २४ युरोफायटर टायफून ट्रँच 3A जेट संचालित करतो त्याने १२ अतिरिक्त ट्रँच ४ जेट्सची ऑर्डर देखील दिली आहे.या शिवाय कतार वायू सेनेजवळ F-15QA आणि फ्रान्सचे राफेल सारखे अत्याधुनिक जेट देखील आहेत.
तुर्कीकडील अमेरिकन जेट F-16 ताफा आता जुना झाला असल्याने आणि त्याला F-35 विमानाच्या योजनेतून बाहेर केल्याने तुर्कीला कतारही व्यवहार करणे गरजेचे झाले आहे. त्यांचे स्वत:चे KAAN स्टेल्थ फायटर विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. यामुळे कतारकडून मिळणारे हे जेट तुर्कीच्या वायू सेनेसाठी मोठा दिलासा सिद्ध होऊ शकतात.
तुर्की आणिक कतारच्या दरम्यान मजबूत रणनितीक संबंध आहेत. २०१० च्या दशकाच्या सुरुवातीला दोन्ही देशांच्या दरम्यान सैन्य आणि आर्थिक भागीदारी वाढली आहे. तुर्कीचा एक सैन्य स्थळ कतारच्या तारकिया क्षेत्रात असून तेथे ३००० सैनिक तैनात आहेत.कतारने तुर्कीकडून ड्रोन आणि चिलखती वाहने देखील खरेदी केली आहेत. दोन्ही देश संरक्षण उत्पादनात एकमेकांचे सहकारी आहेत.या रणनितीक भागीदारीने कतार त्याच्या जुन्या विमानांच्या विक्रीसाठी तुर्कीसोबत मोकळेपणाने चर्चा करत आहे.
भारतीय वायू सेना गेल्यावर्षी जूनपासूनच कतारच्या सोबत १२ सेकंड हँण्ड मिराज 2000 फायटर जेट्स खरेदीवर चर्चा करत आहे. या विमानात ९ सिंगल सीट मिराज 2000-5EDA आणि तीन ट्वीन सीट मिराज 2000-5DDA यांचा समावेश आहे.ही विमाने १९९० च्या दशकाच्या मध्यावर कतारला मिळाली होती. याचा वापर खूपच मर्यादित झाला होता. यामुळे या विमानाचे एअरफ्रेमची स्थिती चांगली मानली जात आहे. ANI च्या बातमीनुसार कतारने भारताला हे जेट सुमारे ५ हजार कोटी रुपयांत देण्याची तयारी दाखवली आहे.परंतू भारताला ती आणखी कमी करुन हवी आहेत.
मिराज-2000 ही विमाने भारतीय वायूसेनेची अनेक वर्षांपासून कणा आहेत. यांचे मुख्यालय ग्लाल्हैर एअरबेसवर आहे. फ्रान्स निर्मित ही विमाने १९८५ मध्ये भारतीय वायू सेनेत सामील झाली होती. तेव्हापासून अनेक मिशनमध्ये त्यांनी विश्वसनिय कामगिरी केली आहे. भारताकडे सध्या ४५ ते ५० मिराज – २००० जेट आहेत. जर कतार बरोबरचा सौदा झाला तर ही संख्या ६० होऊन जाईल.त्यामुळे वायू दलाच्या ताफ्याची ताकद वाढेल. मिराज विमानांना पाकिस्तानच्या बालाकोट येथे एअरस्ट्राईक केली होती. त्यामुळे त्याचे महत्व वाढले आहे.
भारत आणि तुर्की या एकमेकांचे दुश्मन असलेले देश एकाच देशाकडून जेट खरेदी करु इच्छीत असल्याने ही सौदा आश्चर्यकारक मानला जात आहे. तुर्कीने नेहमीच भारताचा शत्रू पाकिस्तानची बाजू घेतली आहे.तसेच ऑपरेशन सिंदूरच्या वेळी पाकिस्तानला मदतही केली आहे. भारताने अलिकडेच तुर्की विरोधी देश ग्रीस, अर्मेनिया आणि सायप्रस यांच्याशी संबंध वाढवले आहेत.