AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतावर टॅरिफ लादण्याचा निर्णय मागे घेणार का? पुतिन भेटीपूर्वीच ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की…

अमेरिकेने गेल्या काही महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर असे काही निर्णय घेतले की त्याचा परिणाम आता संपूर्ण जगावर दिसून येत आहे. भारतावर देखील 50 टक्के टॅरिफ लावला आहे. त्यामुळे भारताचं निर्यातीचं गणितच बिघडणार आहे. त्यात पुतिन आणि ट्रम्प भेटीत काय होतं याकडे नजऱ्या लागून आहेत. असं असताना ट्रम्प यांनी मोठं विधान केलं आहे.

भारतावर टॅरिफ लादण्याचा निर्णय मागे घेणार का? पुतिन भेटीपूर्वीच ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की...
भारतावर टॅरिफ लादण्याचा निर्णय मागे घेणार का? पुतिन भेटीपूर्वीच ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की...Image Credit source: TV9 Network
| Updated on: Aug 15, 2025 | 3:11 PM
Share

अमेरिकेची गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय पातळीवर सत्तेची पकड सैल होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे अमेरिकेने इतर देशांना मुठीत ठेवण्यासाठी आडमुठी भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. खासकरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भविष्यात काय होईल याचा विचार न करता धडाधड निर्णय घेत सुटले आहेत. भारतावरही त्यांनी 50 टक्के टॅरिफ लादला आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करते आणि ते थांबवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. भारताला कोंडीत पकडण्यासाठी अमेरिका सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, चीन रशियाकडून तेल खरेदी करत आहे. पण त्यांच्यावर दबाव टाकण्याची हिंमत ट्रम्प सरकारमध्ये नाही. असं सर्व घडामोडी आंतरराष्ट्रीय पातळीवर घडत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांची भेट होणार आहे. या भेटीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. भारत आणि रशिया यांच्यात मैत्रिपूर्ण संबंध आहेत. या भेटीनंतर टॅरिफबाबत स्पष्ट काय ते समोर येणार आहे.

बीबीसीच्या वृत्तानुसार, रशियन सुरक्षा परिषदेतील वैज्ञानिक सल्लागार मंडळाचे सदस्य अँड्र्यू सुशेंका म्हणाले की, भारत हा मोठ्या देशांपैकी एक आहे आणि वेगाने विकसित होत आहे. तर अमेरिका चीनप्रकरणी एक एक धोरणात्मक भागीदार मानते. त्यामुळे भारताने त्यांचे नेतृत्व स्वीकारावे आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचा आग्रह सोडून द्यावा अशी इच्छा अमेरिकेची आहे. पण अमेरिकेला यात कधीच यश मिळणार नाही हे त्यांना माहिती नाही. येत्या काळात ट्रम्प यांना भारतावर असा दबाव टाकणं मागे घ्यावं लागेल. अमेरिकेचा इतिहास पाहिला तर एखाद्या देशावर दबाव टाकते. पण यात घडताना दिसलं नाही तर ते माघार घेतात. आपला निर्णय देखील बदलतात.

पुतिन यांना भेटण्यापूर्वी ट्रम्प म्हणाले होते की, अलास्का भेटीत कोणता करार होईल असं वाटत नाही. पण पुतिन यांनी ऐकलं नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. ट्रम्प पुढे म्हणाले की, ‘प्रत्येक गोष्टीचा परिणाम होतो. त्यांना हा करार करावा लागेल, हे आम्हाला लवकरच समजेल.’ ट्रम्प पुतिन भेट सकाळी 11:30 वाजता (अलास्का वेळेनुसार) सुरू होईल आणि त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. वेळेच्या फरकामुळे पुतिन आणि ट्रम्प अलास्कामध्ये भेटतील तेव्हा 16 ऑगस्ट रोजी भारतात पहाटे 2 वाजले असतील.

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.