AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा? भारत-पाकिस्तान कितव्या क्रमांकावर? ताजी क्रमवारी जाहीर

World Most Powerful Passport : अलिकडेच हेनले पासपोर्ट इंडेक्स जाहीर झाली आहे.आज आपण जगात कोणत्या देशाचा पासपोर्ट आघाडीवर आहे? भारताची क्रमवारी किती आहे? हे जाणून घेणार आहोत.

सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा? भारत-पाकिस्तान कितव्या क्रमांकावर? ताजी क्रमवारी जाहीर
Passport RankingImage Credit source: Google
| Updated on: May 03, 2026 | 5:49 PM
Share

जगातील कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असाल. अलिकडेच हेनले पासपोर्ट इंडेक्स जाहीर झाली आहे. यात कोणत्या देशाच्या नागरिकांना व्हिसाशिवाय किती ठिकाणी जाऊ शकतात हे पाहिले जाते. यानुसार क्रमवारी ठरवली आहे. आज आपण जगात कोणत्या देशाचा पासपोर्ट आघाडीवर आहे? भारताची क्रमवारी किती आहे? कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात खराब आहे याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

सिंगापूर आघाडीवर

सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत सिंगापूर पहिल्या क्रमांकावर आहे. सिंगापूरचे नागरिक 192 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. हा आकडा सर्वात कमकुवत पासपोर्ट असलेल्या देशांच्या तुलनेत जवळपास पाचपट जास्त आहे. तर सर्वात कमकुवत पासपोर्ट असलेल्या देशांचे नागरिक 50 पेक्षा कमी देशांमध्ये व्हिसाशिवाय जाऊ शकतात. यावरून एखाद्या देशाचे संबंध दुसऱ्या देशाशी कसे आहेत हे समोर येते.

आशिया आणि युरोपियन देशांचे पासपोर्ट मजबूत

सिंगापूरनंतर दुसऱ्या क्रमांकावर जपान, दक्षिण कोरिया आणि संयुक्त अरब अमिराती आहेत. या देशांचे नागरिक 187 देशांमध्ये व्हिसाशिवाय जाऊ शकतात. संयुक्त अरब अमिरात हा पूर्व आशियाबाहेरील सर्वात मजबूत पासपोर्ट असलेला देश आहे. मात्र, येथील नागरिकांना अमेरिकेत व्हिसा-फ्री प्रवेश मिळत नाही, तर सिंगापूर, जपान आणि दक्षिण कोरिया यांना अमेरिकेत व्हिसा फ्री प्रवेश मिळतो.

यानंतर युरोपमधील देशांचा क्रम लागतो. विशेषतः नॉर्वे आणि स्वित्झर्लंड येथील नागरिक 185 देशांमध्ये व्हिसाशिवाय जाऊ शकतात. युरोपियन युनियनमधील 27 देशांची एक संयुक्त पासपोर्ट प्रणाली असली तरी प्रत्येक देशाची व्हिसा-फ्री रॅकिंग वेगळी आहे. बुल्गारिया आणि रोमानिया येथील नागरिक 177 देशांमध्ये जाऊ शकतात, तर स्वीडनचे नागरिक 186 देशांमध्ये जाऊ शकतात. सरासरी युरोपियन युनियनची ताकद 183 देशांची आहे, जी मलेशिया आणि युनायटेड किंगडमइतकी आहे. त्याखालोखाल कॅनडा (182) आणि अमेरिका (179) यांचा नंबर आहे.

सर्वात कमकुवत पासपोर्ट

सर्वात कमकुवत पासपोर्ट असलेल्या देशांचे नागरिक 50 पेक्षा कमी देशांमध्ये व्हिसाशिवाय जाऊ शकतात. या देशांमध्ये राजकीय अस्थिरता, जास्त स्थलांतर किंवा अलीकडील संघर्ष यामुळे व्हिसा नियम कडक असतात. नायजेरिया (44), सोमालिया (32) आणि काँगो लोकतांत्रिक प्रजासत्ताक (43) यांसारखे आफ्रिकन देश या यादीत खालच्या क्रमांकावर आहेत.

भारत पाकिस्तानची स्थिती काय?

पाकिस्तानचा पासपोर्ट जगातील सर्वात कमकुवत पासपोर्टपैकी एक मानला जातो. हा देश 98व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानी पासपोर्ट धारकांना फक्त सुमारे 31 ते 35 देशांमध्येच व्हिसाशिवाय किंवा ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ने प्रवास करता येतो. तर भारताचा पासपोर्ट यावर्षी 80व्या क्रमांकावर आहे. भारतीय नागरिकांना सुमारे 55 ते 58 देशांमध्ये व्हिसा-फ्री किंवा ‘व्हिसा ऑन अरायव्हल’द्वारे प्रवास करता येतो.

Follow Us
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला मोठा सस्पेन्स
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; वर्धापन दिनी ठाकरे-शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील निवसस्थानी... राजकारणातील हालचालींना वेग
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी..
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी दिली; आता अभिनेत्री...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्... 'ऑपरेशन टायगर'बाबत मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...; खासदार फुटीनंतर दादा भुसेंचं मोठं विधान