घराच्या अंगणात सापडलं जगातील सर्वात मोठं निलम रत्नं; बाजारपेठेत 700 कोटींचा भाव

Serendipity Sapphire | येथील हिरे व्यापारी गोमेज यांनी आपल्या घराच्या अंगणात काम काढले होते. तेव्हा कामगारांना खोदकाम सुरु असताना एक मोठा दगड मिळाला. हा दगड साधासुधा नसून ते जगातील सर्वाधिक आकाराचे निलम रत्न असल्याचा उलगडा नंतर झाला.

घराच्या अंगणात सापडलं जगातील सर्वात मोठं निलम रत्नं; बाजारपेठेत 700 कोटींचा भाव
जगातील सर्वात मोठा निलम खडा

कोलंबो: अध्यात्मिक गोष्टींवर श्रद्धा असणाऱ्या लोकांच्या आयुष्यात रत्नांचे स्थान महत्वाचे असते. एखादे रत्न धारण केल्यानंतर आयुष्य बदलल्याच्या अनेक गोष्टी आपल्या कानावर पडल्या असतील. यापैकी शनीचं रत्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निलम या रत्नाविषयी अनेकांच्या मनात कुतूहल असते.

श्रीलंकेत एका घराच्या अंगणात खोदकाम करताना जगातील सर्वात मोठ्या आकाराचे निलम रत्नं मिळाल्याची माहिती समोर आली आहे. येथील रत्नपुरा हा परिसर निलम खड्यांच्या साठ्यांसाठीच ओळखला जातो. येथील हिरे व्यापारी गोमेज यांनी आपल्या घराच्या अंगणात काम काढले होते. तेव्हा कामगारांना खोदकाम सुरु असताना एक मोठा दगड मिळाला. हा दगड साधासुधा नसून ते जगातील सर्वाधिक आकाराचे निलम रत्न असल्याचा उलगडा नंतर झाला. या दगडाची किंमत साधारण 700 कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे.

वजन ऐकून थक्क व्हाल

या निलम खड्याचे वजन 510 किलो इतके आहे. रत्नांच्या बाजारात याला Serendipity Sapphire म्हणून ओळखले जाते. 2.5 कॅरेटच्या या खड्याची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.

एका वर्षाने मिळाला क्लीअरन्स

बीबीसीच्या माहितीनुसार, हा दगड गेल्यावर्षी मिळाला होता. मात्र, प्रशासनाने हा नीलम रत्नच असल्याचे जाहीर करण्यासाठी वेळ घेतला. या दगडावर बराच चिखल आणि गाळ होता. हे सर्व हटवून दगड स्वच्छ करण्यास बराच अवधी गेला. श्रीलंकेतील रत्नपुरा हा परिसर विविध रत्नांसाठीच ओळखला जातो. याठिकाणी अनेकप्रकारची रत्न आढळतात. श्रीलंकेतील पाचू, निलम आणि अन्य रत्नं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाखो रुपयांना विकली जातात.

संबंधित बातम्या:

VIDEO: चिनी शहराला 300 फूट उंच वाळूच्या वादळानंच ‘गिळलं’, पाहा भयानक व्हिडीओ

ब्रिटनमध्ये 460 कोटी वर्षांपूर्वीचा ‘खजाना’, पृथ्वीपेक्षाही जुना, जीवसृष्टीची अनेक रहस्य समोर येण्याची शक्यता

PHOTO | Space Tourism : एव्हरेस्टपेक्षा तीन पट उंच पर्वत, ग्रँड कॅन्यनपेक्षा चार पट मोठा दरी, मंगळावरील या आठ ठिकाणी पर्यटकांची होईल गर्दी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI