AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! इराणच्या मित्र राष्ट्राचा इस्रायलवर मोठा हल्ला; युद्ध पुन्हा भडकणार?

मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे इराणच्या मित्र राष्ट्राकडून इस्रायलवर बॅलेस्टिक मिसाईल हल्ला करण्यात आला आहे. यामुळे पुन्हा एकदा तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोठी बातमी! इराणच्या मित्र राष्ट्राचा इस्रायलवर मोठा हल्ला; युद्ध पुन्हा भडकणार?
Missile AttackImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 28, 2025 | 9:25 PM
Share

इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध झालं, या युद्धामध्ये दोन्ही देशांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अखेर दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे इराणच्या मित्र राष्ट्राकडून इस्रायलवर बॅलेस्टिक मिसाईल हल्ला करण्यात आला आहे. येमेनकडून इस्रायलवर मिसाईल हल्ला करण्यात आला आहे. येमेनच्या सशस्त्र दलाचे प्रवक्ता बिग्रेडियर जनरल याह्या यांनी असा दावा केला आहे की आम्ही इस्रायलच्या ताब्यात असलेल्या बीर शेवामध्ये यशस्वी मिसाईल हल्ला केला आहे.

याह्या यांनी केलेल्या दाव्यानुसार येमेनने इस्रायलवर जोलफागर बॅलेस्टिक मिसाईल डागली, हा हल्ला पूर्णपणे यशस्वी ठरल्याचं याह्या यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, गेल्या आठवड्यात देखील येमनने इस्रायलवर बॅलेस्टिक मिसाईल आणि ड्रोनने हल्ला केला होता. आमचे सर्व हल्ले यशस्वी ठरले आहेत. येमेनने नेहमीच पॅलेस्टिनी लोकांप्रती आपली धार्मिक, नौतिक आणि मानवतावादी कर्तव्य पार पाडण्याची वचनबद्धता अधोरेखील केली आहे, त्यामुळे येमेन गाझाच्या लोकांना पाठिंबा देण्यापासून कधीही मागे हटणार नाही, भलेही आम्हाला त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी आमची तयारी असल्याचंही यावेळी याह्या यांनी म्हटलं आहे.

येमेनने इस्रायलला दिली होती धमकी

इराण, इस्रायल युद्ध सुरू असताना अमेरिकेकडून इराणच्या अणू केंद्रांवर हल्ला करण्यात आला होता, त्यानंतर येमेनने थेट इस्रायला धमकी दिली होती. आमचा इराणला पाठिंबा आहे. आम्ही आमच्या पाठिंब्यापासून कधीही मागे हटणार नाही, अमेरिका आणि इस्रायलने इराणपासून दूर राहावं असं येमेनने युद्ध सुरू असातना म्हटलं होतं. दरम्यान येमेनने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर आता पुन्हा एकदा या क्षेत्रात तणाव वाढण्याची शक्यता आहे.

इराणकडून पुन्हा अणू केंद्रावर काम सुरू? 

अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणच्या अणू केंद्रांचं प्रचंड नुकसान झालं होतं. मात्र नुकत्याच समोर आलेल्या सॅटेलाईट छायाचित्रांमध्ये इराणचं फोर्डो अणू केंद्र असलेल्या भागामध्ये जेसीबी, ट्रक आणि सुरूंग तयार करणाऱ्या मशनरी दिसून आल्या आहेत. त्यामुळे इराणने पुन्हा एकदा आपल्या या अणू तळांवर काम सुरू केल्याचं बोललं जात आहे.

नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.