फ्रीजमध्ये कधीही ठेवू नयेत ही 5 फळे, तुम्ही देखील ही चूक करत असाल तर थांबा

Fruits not keep in refrigerator : आज प्रत्येक घराघरात फ्रीज आढळतो. कोणतीही वस्ती खराब होऊ नये म्हणून ती फ्रीजमध्ये ठेवली जाते. त्यामुळे फ्रीजचा वापर वाढला आहे. मग फळे ठेवण्यासाठी देखील फ्रीज वापरला जातो. पण कोणती असे फळे आहेत जे फ्रीजमध्ये ठेवू नयेत. जाणून घ्या.

फ्रीजमध्ये कधीही ठेवू नयेत ही 5 फळे, तुम्ही देखील ही चूक करत असाल तर थांबा
Fruits in refrigerator
Follow us
| Updated on: Nov 09, 2023 | 3:02 PM

Don’t keep these 5 fruits in the fridge : अनेक जण सुट्टीच्या दिवशी एक आठवडा पुरतील इतकी फळे घरी घेऊन येतो. ती आठवडाभर ताजे राहावी म्हणून आपण सगळे ती फळे फ्रीजमध्ये ठेवतो. रेफ्रिजरेटर आता घराघरात आला आहे. त्यामुळे कोणतीही वस्तू ही फ्रीजमध्ये ठेवण्याचा कल वाढला आहे. पण अशी काही फळे आहेत जी कधीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेतच. कारण त्यामुळे या फळांमधील पोषक तत्वे नष्ट होतात. नंतर ती फळे खाण्यात कोणताही फायदा नसतो. चला जाणून घेऊया कोणती आहेत ती 5 फळे.

ही 5 फळे फ्रीजमध्ये ठेवू नका

1. केळी

केळी ही सामान्य तापमानावर देखील चांगली राहते. पण ती जर फ्रीजमध्ये ठेवली तर ती काळी पडतात. या फळातून इथिलीन वायू बाहेर पडतो. त्यामुळे केळी सोबत ठेवलेली  इतर फळे देखील लवकर पिकतात.

2. सफरचंद

सफरचंद हे फळ सर्वाधिक फायद्याचे फळ मानले जाते. अनेक जण बाराही महिने घरी सफरचंद घेऊन येतात. पौष्टिक फळ असल्याने त्याची मागणी देखील अधिक असते. पण सफरचंद फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. तुम्हाला तर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचेच असेल तर ते एका कागदात गुंडाळून ठेवा.

3. टरबूज

टरबूज हे अनेकांचे आवडते फळ. यामध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी टरबूज मदत करते. आकार मोठा असल्याने एकाच वेळी ते संपत नाही. म्हणून कापलेला भाग फ्रीजमध्ये ठेवला जातो. पण असे केल्याने या फळातील अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वे नष्ट होऊ शकतात.

4. लिची

लिची हे देखील असे फळ आहे जे फ्रीजमध्ये ठेवले तर ते आतून सडू लागते आणि त्यातील पोषक तत्वे नाहीसे होऊ लागतात. त्यामुळे ते फळ ताजे आहे तेव्हा खा.

5. आंबा

उन्हाळ्यात आंबा खाल्ला नाही तर हा ऋतू अपूर्णच वाटतो. आंबा पिकल्यानंतर लवकर खराब होऊ शकतो, त्यामुळे तो फ्रीजमध्ये ठेवला जातो. परंतु असे केल्याने आंब्यातील पोषक आणि अँटीऑक्सिडंट्स कमी होऊ लागतात.

Non Stop LIVE Update
हिवाळी अधिवेशनात बॉम्ब फोडणार, काँग्रेस आमदाराच्या वक्तव्यानं खळबळ
हिवाळी अधिवेशनात बॉम्ब फोडणार, काँग्रेस आमदाराच्या वक्तव्यानं खळबळ.
दिशा सालियन प्रकरणात हात, शिंदे गटाच्या नेत्याचा आदित्य ठाकरेंवर आरोप
दिशा सालियन प्रकरणात हात, शिंदे गटाच्या नेत्याचा आदित्य ठाकरेंवर आरोप.
शिंदे गटाच्या आमदाराची वैभव नाईकांना पक्षप्रवेशाची थेट ऑफर; म्हणाले...
शिंदे गटाच्या आमदाराची वैभव नाईकांना पक्षप्रवेशाची थेट ऑफर; म्हणाले....
अरे ऐक रे.. शिंदे गट अन ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये 'कोट'वरून जुंगलबंदी
अरे ऐक रे.. शिंदे गट अन ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये 'कोट'वरून जुंगलबंदी.
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?.
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?.
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?.
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?.
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली.
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?.