भारतातील अशा 5 जागा जेथे जीवाचा होतो थरकाप, तरीही पर्यटकांचे आवडते डेस्टीनेशन, पाहा कोणत्या ?
जर तुम्ही हिवाळ्यात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी काही पर्याय घेऊन आलो आहोत. येथे थंडीत तापमान -20 डिग्री सेल्सिअसच्या खाली जाते. चला तर पाहूयात कोणती आहेत ही ठिकाणे ?

तुम्ही हिवाळ्यात फिरायला जाण्याचे प्लानिंग करत असाल तर वेळ आली आहे. भारतात हिवाळ्यात फिरण्यासाठी अनेक जागा आहेत. या ठिकाणांवर जगभरातून पर्यटक येत असतात. आपण असे ठिकाण पाहाणार आहोत जेथे बर्फाची चादर जणू पांघरलेली असते. जर तुम्ही आईसी वंडरलँड (Icy Wonderlands) पाहणार असाल तर या ठिकाणी जाण्याचा प्लान करु शकता. चला तर पाहूयात कोणती ही ठिकाणे…

१ – द्रास, लडाख
भारतातील लडाखचे द्रास शहर संपूर्णपणे बर्फाने झाकलेले आहे. यास ‘गेटवे ऑफ लडाख’ देखील म्हटले जाते. ही पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाण म्हटले जाते. थंडीच्या महिन्यात येथे तापमान -20 डिग्री सेल्सिअसच्या खाली जाते. हे छोटेसे शहर थंडीत बर्फाचा स्वर्ग बनते. येथील तापमान अतिथंड आहे. येथे भारतीय सैन्याचे करगिल वॉर मेमोरियल देखील आहे. श्रीनगरहून लेहपर्यंत रस्ते मार्गाने तुम्ही द्रास पर्यंत पोहचू शकता.त्यानंतर तुम्ही कारगिल वॉर मेमोरियलला जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्र.1 द्वारे श्रीनगरवरुन नियमित बसेस आणि टॅक्सी करु शकता.

२ – गुलमर्ग, जम्मू आणि कश्मीर
जम्मू- कश्मीरच्या गुलमर्ग येथे बर्फ कोसळण्यास ऑक्टोबर महिन्यापासून सुरुवात होते. गुलमर्ग भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथे दरवर्षी हजारो पर्यटक येतात. येथील पांढरे पर्वत पाहून यास मिनी स्वित्झर्लंड म्हटले जाते. येथे थंडीत स्कीईंग करण्याची सोय आहे. येथे आशियातील सर्वात उंच गोंडोला राईड देखील आहे. थंडीत येथे तापमान -5 ते -10 डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरते. त्यामुळे लोकरीचे कपडे घालूनच येथे यावे लागते.

३ – स्पीति खोरे, हिमाचल प्रदेश
जर तुम्हाला एडव्हेंचर करण्याचा शौक असेल तर मनाली पासून काही अंतरावर असलेल्या स्पीती खोऱ्यात तुम्ही जाऊ शकता. हे जगातीस सर्वात उंचीवरील ठिकाणांपैकी एक आहे. स्पीती खोरे समुद्र सपाटीपासून 4270 मीटर (14000 फूट) उंचावर आहे. येथे हिवाळ्यात तापमान-10 ते -30 डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरते. येथे बर्फाळी वारे वाहतात. टुरिस्ट येथे बाईकने येणे पसंत करतात. येथील चंद्रताल पाण्याचे सरोवर थंडीत गोठते. येथे येण्यासाठी ट्रेक करावा लागतो.

४ – औली, उत्तराखंड
उत्तराखंड येथीस औली एक बजेट फ्रेंडली डेस्टीनेशन आहे. येथे लोक हनिमून किंवा कुटुंबियांसह सहलीला येतात. ही जागाही तुम्हाला निराश करणार नाही. थंडीत येथे निसर्ग सुंदर दिसतो.येथे स्कायकिंगची (SkyKing) सोय आहे. एडवेंचर एक्टीव्हीटी येथे करता येतात. येथील तापमान -2 ते -8 डिग्री सेल्सिअस असते.

५ – तवांग, अरुणाचल प्रदेश
पूर्व हिमालयात वसलेले तवांग थंडीत बर्फाने आच्छादलेले असते. येथे हिवाळ्याती सुट्टीत पर्यटक गर्दी करतात.नोव्हेंबर महिन्यात येथे बर्फवृष्टी सुरु होते. येथे अनेक टुरिस्ट स्पॉट आहेत. थंडीत येथे तापमान 5 ते -15 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. तुम्ही थंडीत तवांगला जाऊ इच्छीत असाल तर स्थानिक ट्रॅव्हल एजन्सीशी चौकशी करुन स्नोफॉलचे वेळापत्रक पाहून प्लान करु शकता.
