जगातील 6 सर्वात उंच पुतळे, यातील दोन तर भारतात आहेत, ‘स्टॅच्यु ऑफ लिबर्टी’ही वाटते खुजे…
अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील 'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' एकेकाळी जगातील सर्वात मोठा पुतळा मानला जात होता. आता जगबदलले आहे. आता जगातील सर्वात उंच पुतळा भारतात आहे.

मानवाला नेहमीच उंच गोष्टीचे आकर्षण राहीलेले आहे. याचे उदाहरण इजिप्तमधील शतकांहून जुने पिरॅमिड्स देत आहेत. यामुळे लोक उंच मिनार, उंच इमारती आणि आकाशाला स्पर्श करणारे पुतळे बांधू लागले आहेत. आता जगातील सर्वात उंच पाच पुतळे पाहूयात आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत हे पाहूयात
जगात जेव्हा उंच पुतळ्याचा विषय यायचा तेव्हा स्टॅच्यु ऑफ लिबर्टीचे नाव नेहमीच घेतले जायचे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील या पुतळ्यास कोणे एकेकाळी जगातील सर्वात उंच पुतळा म्हटले जात होते.परंतू आता असे नाही.आता हा मान भारतातील सर्वात उंच पुतळ्यास मिळाला आहे.
1. भारत में स्टॅच्यू ऑफ यूनिटी
स्टॅच्यू ऑफ यूनिटी गुजरातच्या नर्मदा नदीच्या तटावर असून हा पुतळा देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे. याची उंची ५९७ फूट म्हणजे १८१ मीटर इतकी आहे. जगातील सर्वात उंचीचा हा पुतळा आहे.हा पुतळा जवळपास स्टॅच्यु ऑफ लिबर्टीच्या उंचीचा आहे. याचे उद्घाटन साल २०१८ मध्ये झाले होते. भारतातील संस्थानिकांना एकत्र करुन एक देश बनवण्याचे श्रेय सरदार पटेलांना दिले जाते.
2.चीनचा स्प्रिंग टेम्पलवरील बुद्धाची प्रतिमा
चीनच्या स्प्रिंग टेम्पल स्थित भगवान बुद्धाचा पुतळा जगातील दुसरा सर्वात उंच पुतळा आहे.याची उंची ४२० फूट म्हणजेच १२८ मीटर इतकी आहे.तांब्यांच्या या पुतळ्याला बनविण्यासाठी ११ वर्षे लागले.साल १९९७ ते २००८ वर्षे याची निर्मिती केली गेली. भारताच्या स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या आधी पहिला उंच पुतळ्याचा मान चीनच्या या पुतळ्याकडे होता.
3. इंडोनेशियातील गरुड विष्णु केनकाना (गरुडावर बसलेल्या भगवान विष्णुचा पुतळा )
इंडोनेशियात भगवान विष्णुचा पुतळा जगातील १० उंच पुतळ्यांपैकी एक आहे. यास हिंदू देवतेचा सर्वात उंच मूर्ती असण्याचा मान मिळालेला आहे. या पुतळा इंडोनेशियाच्या बाली येथे आहे. या पुतळा ३९३ फूट म्हणजे १२० मीटर उंच आहे. या पुतळ्याची निर्मिती साल १९९० रोजी सुरु झाली आणि उद्घाटन २०१८ मध्ये झाले. या पुतळ्याच्या डिझाईन ते उभारणी पूर्ण व्हायला २८ वर्षे लागली.
4. जपानचा उशिकु दाइबुत्सु (भगवान बुद्धाचा पुतळा)
जगातील चौथा सर्वात मोठा पुतळा गौतम भगवान बुद्धाचा आहे, तो जपानमध्ये उभारला आहे. याचे नाव उशिकु दाइबुत्सु असे आहे. ही जगातील सर्वात उंच कास्य धातूची आहे.१९९५ मध्ये गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याचे नाव दाखल झाले होते. याची उंची १२० मीटर आहे.
5. म्यानमार येथील लेक्युव सेक्या बुद्धाचा पुतळा
म्यानमार भगवान बुद्धाचा हा पुतळा जगातील पाचवा सर्वाधिक उंच पुतळा आहे. या पुतळ्याला उभारण्यास १२ वर्षे लागली आहे.२००८ रोजी त्याचे अनावरण झाले.याची उंची ३८० फूट म्हणजेच ११५ मीटर आहे.या स्टॅच्यु ऑफ लिबर्टीपेक्षा अडीच पट उंच आहे. जगातील तिसरा बुद्धाचा उंच पुतळा आहे.
6. राजस्थान स्थित विश्वास स्वरूम (भगवान शंकराचा पुतळा )
जगातील सर्वात उंच १० पुतळा भगवान शंकराचा आहे. भारतातील राजस्थानात हा पुतळा तयार केलेला आहे. या पुतळ्याचे नाव विश्वास स्वरुपम आहे. याची उंची ३६९ फूट म्हणजे ११२ मीटर आहे. हे राजस्थानाच्या नाथद्वारमध्ये स्थित आहे. आणि १२ मैल दूरवरुनही दिसतो. याची निर्मिती २०२२ मध्ये पूर्ण झाली.
