AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिका जगातील सर्वात शक्तीशाली देश, पाहा भारताचा नंबर कितवा?

most powerful country : जगात अनेक असे शेजारी देश आहेत ज्यांचं एकमेकांशी पटत नाही. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये नेहमी वाद सुरु असतात. जगातील असे अनेक बलाढ्य देश आहेत जे एकमेकांचे वैरी आहेत. ज्यामुळे त्यांनी आपल्या सैन्याला ताकदवर बनवलं आहे. जाणून घ्या सैन्याच्या बाबतीत कोणता देश सर्वात ताकदवान आणि कमजोर आहे.

अमेरिका जगातील सर्वात शक्तीशाली देश, पाहा भारताचा नंबर कितवा?
| Updated on: Jan 17, 2024 | 3:51 PM
Share

Powerfull Army : अमेरिकेचे सैन्य हे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य आहे. अमेरिकेनंतर रशिया आणि चीनचा क्रमांक लागतो.  जगभरातील कोणत्या देशाचे सैन्य किती मजबूत आहे याविषयी 2024 ची मिलिटरी स्ट्रेंथ रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भूतान हा देश शेवटच्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान 9व्या स्थानावर आहे. लष्करी शक्ती समजून घेताना अनेक गोष्टी पाहिल्या जातात. त्यामुळे नुसती सैन्याची संख्या जास्त असून चालत नाही. त्यांच्याकडे किती आधुनिक हत्यारे आहेत. सैन्य किती चपळ आहे याचा देखील अभ्यास केला जातो.

भारत कितव्या स्थानावर

भारतीय लष्कराबद्दल बोलायचे झाले तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारतीय लष्कर चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय सैन्य जगातील चौथ्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य आहे. भारतानंतर दक्षिण कोरिया पाचव्या स्थानावर आहे. युनायटेड किंडम सहाव्या स्थानावर आहे.

145 देशांतील सैन्य आणि त्यांच्याकडे असलेली हत्यारे यावर आधारित हा अहवाल तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये सैन्यांची संख्या, लष्करी उपकरणे, आर्थिक स्थैर्य, भौगोलिक स्थान आणि उपलब्ध संसाधने अशा 60 हून अधिक घटकांचा विचार करण्यात आला आहे. हे घटक एकत्रितपणे PowerIndex स्कोअर निर्धारित करतात, जेथे कमी स्कोअर मजबूत लष्करी क्षमता दर्शवतात.

ग्लोबल फायरपॉवरने ही यादी जाहीर केली आहे. यानंतर त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, अधिक तांत्रिकदृष्ट्या प्रगत देशांना मोठ्या आणि कमी विकसित शक्तींशी स्पर्धा करू देतो.

जगातील मोठ्या देशांची आर्थिक ताकद, लष्करासाठी असलेले बजेट याचा देखील समावेश करण्यात आला आहे. या अहवालात जगातील 145 देशांचा अभ्यास करण्यात आला आहे. प्रत्येक देशाची परिस्थिती पुढे कशी बदलत गेली याचा देखील अभ्यास यात करण्यात आला आहे.

जगातील 10 सर्वात शक्तिशाली लष्कर

अमेरिका रशिया चीन भारत दक्षिण कोरिया युनायटेड किंगडम जपान तुर्की पाकिस्तान इटली

जगातील सर्वात कमकुवत सैन्य

भूतान मोल्डोव्हा सुरीनाम सोमालिया बेनिन लायबेरिया बेलीज सिएरा लिओन सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक आइसलँड

जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.